माझे बालपण मराठी निंबध | Majhe Balpan Marathi Nibandh

निबंध 1

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो माझे बालपण मराठी निंबध या निबंधामध्‍ये बालपणीच्‍या रम्य प्रसंगाचे वर्णन केले आहे बालपणीचे मित्र, दिवस दिवसभर खेळलेले खेळ, परीक्षा झाल्‍यानंतर असलेला दिनक्रम या गोष्‍टी वाचल्‍यानंतर तुम्‍हाला तुमचे बालपण आठवल्‍याशिवाय राहणार नाही. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. 

माझे बालपण मराठी निंबध सुरूवात करताच बालपणातील खुपश्‍या गमतीदार ताज्‍या होतात. शालांत परीक्षेचा शेवटचा पेपर देऊन घरी आलो आणि मला हलके हलके वाटू लागले. गेले दोन-चार महिने मी अभ्यासाने अगदी झपाटून गेलो होतो. आता मी संपूर्ण मोकळा झालो होतो. सुट्टीतील वेळ घालविण्यासाठी बाबांनी अनेक पर्याय माझ्यापुढे ठेवले होते; पण ते सारे मला नकोसे वाटत होते. एकदम मला आठवला तो आमचा वाडा-बालपण जिथे घालविले तो वाडा.

तो वाडा आमचा होता, म्हणजे माझ्या आजोबांचा होता. बाबांना कधीच त्याच्याविषयी आपलेपणा वाटला नाही. म्हणून तर आजी-आजोबांच्या पश्चात बाबांनी तो वाडा विकला आणि हा प्रशस्त बंगला बांधला, पण त्या वाड्यातील मजा हया बंगल्यात कधीच अनुभवता आली नाही. वाड्याचे आम्ही मालक होतो आणि शिवाय इतर दहा भाडेकरू होते; पण बंगल्यात येईपर्यंत मला हे कधी माहीतच नव्हते. कारण वाड्यात दहा चुली पेटत होत्या, तरी सर्व माणसे एकाच कुटुंबातील असल्याप्रमाणे वागत होती. त्यामुळे बालपणी वाड्यात हुंदडताना कधी कोठे हा आपला, तो परका असे जाणवलेच नाही.

त्यावेळी या वाड्यात माझे दहा-बारा सवंगडी होते. सकाळी सूर्य वर आला की आमच्या खेळाला सुरुवात होत असे. आम्ही खेळात इतके रमून जात असू की, कशाचे म्हणून आम्हांला भान राहत नसे. मग आठ वाजता गोखले गुरुजींची हाक आली की पुढच्या ओटीवर 'शिकवणी' सुरू व्हायची; पण या खाजगी वर्गालाही वाड्यातील सगळी मुले येत असत. गोखले गुरुजी अगदी तन्मयतेने शिकवीत असत. त्यामुळे दोन तास अभ्यास झाला तरी कंटाळा येत नसे. जेवणे उरकली की वाड्यातील सगळेजण मिळून शाळेला जात असू. संध्याकाळी खेळानंतर कवितागायनाने वाडा नुसता दुमदुमून जायचा.

majhe balpan marathi nibandh
majhe balpan marathi nibandh

सुट्टीच्या दिवसांत तर वाड्यातील त्या बालपणाला आगळा रंग यायचा. सकाळच्या वेळी विहिरीवर पोहणे, दुपारी अंगण खेळांनी दुमदुमवून टाकणे, संध्याकाळचे फिरायला जाणे आणि रात्री भुताखेतांच्या गप्पा मारणे हा कार्यक्रम ठरलेलाच. सुट्टीमध्ये पाहुणेमुलांची भर असे. मग उन्हाळा म्हणून अंगणात अंथरुणे पडत. भेळ, आंब्याचा रस, आइस्क्रीम असे बेत आखले जात. दरवर्षी वाड्यातील कोणाकडे तरी कार्य निघेच. मग ते कार्य त्या घरापरतेच मर्यादित न राहता संपूर्ण वाड्याचेच होत असे. सगळी बालसेना त्या कार्यात एकजुटीने रंगलेली असे.

अशा त्या आगळ्यावेगळ्या आनंदात मी केव्हा मोठा झालो हे मला कळलेच नाही. आज मात्र जाणवते की
'अहा ते सुंदर दिन हरपले

मधुभावांचे वेड जयांनी जीवाला लाविले.' 
बालपणातील त्या दिवसांचे वर्णन करावयास कवयित्री शांता शेळके यांच्या या पंक्तींचा आधार घ्यावा लागेल
'अवनी गमली अद्भुत अभिनव जिये सुखाविण दुजा न संभव घरी वा दारी वात्सल्याचे मळे नित्य बहरले॥'

मित्रांनो बालपण एकदा मिळाल्‍यानंतर कधीही न मिळणारी गोष्‍ट आहे. बालपणातील ते रम्‍य क्षण कोणीही विसरू शकत नाही. तुम्‍ही तुमच्‍या बालपणातील झालेल्‍या खट्याळ गोष्‍टी कमेंट करून सांगु शकता माझे बालपण मराठी निंबध हा तुम्‍हाला कसा वाटला कमेंट करून जरूर सांगावे.

निबंध 2

my childhood essay in marathi

बालपण म्हणजे जीवनातील सकाळ, जीवनातील वसंत ऋतू, साऱ्या जीवनाला जो प्रसन्न, प्रफुल्लित बनवतो. या वसंतऋतूत प्रत्येक कळीला फुलायचा मोह होतोच! माझ्या जीवनाची कळीही अशीच जन्मली, उमलली-आनंदपुरात !  खरोखरच तिथे आनंदाचा पूर वाहत होता. लहानपणी आम्ही एका मोठ्या वाड्यात राहायचो. 

आमचा वाडा-शांतीसदन! परंतु आम्ही सर्व मुलांनी या वाड्याला अगदी 'अशांती सदन'च बनवून टाकलं. सूर्यदेव उगवल्यापासून ते निरोप घेईपर्यंत आम्ही जो धुडगूस घालायचो...सीता, गीता, संजय, सुनील, पप्पू... आठवतायत ह्या बालमूर्ती... 'बालपणीचे सखे सोबती, आठवणींना अजून झोंबती!' आठवतोय, चिंचा काढण्यासाठी पाटलांच्या मळ्यातील चिंचेच्या झाडावर चढलेला समीर! कैऱ्या खाल्ल्या म्हणून माळ्याकडून मार बसलेला बंडू! टिपऱ्यांच्या खेळात सतत भांडणारी अबोली-अगदी विरोधाभासच! नंतर रोज सकाळी आम्ही सर्व जण हातात हात घालून शाळेत जायचो. 

शिस्तीने थोडीशी चुणूक दाखवायला सुरुवात केली. गुरुजींचा प्रेमळ हात पाठीवरून आजही फिरतोय असंच वाटतं. दुपारी घरी यायचो, जेवायला. अन् एकदा का जेवण झालं की घराबाहेरच धूम ठोकायचो. मग विहीरीवर पोहायला जायचो. आमच्या वाड्यातील काकांचा मुलगा ‘अभय' खूप भित्रा होता. त्याला विहिरीत उतरायला लावायचंच असं एकदा आम्ही सर्वांनी ठरवलं. 'अभय' असूनही त्याला पाण्याचं मात्र भय वाटत असे. आम्ही असंच काहीतरी सांगून त्याला रमत गमत नेला, तो विहिरीच्या काठावरच आणून उभा केला.

खाली पाण्यात संजय, अजय होतेच. वरून गर्जना झाली-बजरंगबली की जय! अन् 'अरे, मेलो मेलो ! वाचवा, वाचवा!... 'असं म्हणणाऱ्या अभयच्या बटुमूर्तीनं थेट जीवनाला आलिंगन दिलं. इतकं, की त्याच्या प्रेमभारानं तो गुदमरू लागला. संजय, अजयनी त्याला वर आणलं. दोन महिन्यातच अभय-निर्भय तर बनलाच पण पट्टीचा पोहणाराही !

संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी मात्र आमचं पाऊल उंबरठ्याच्या आतच असे. हात-पाय-तोंड धुवून आम्ही सर्वजण परवचा म्हणायचो, अन् मग आम्हाला रामकृष्णाच्या गोष्टी सांगायचे-बुद्धिसागरकाका !
किती छान होते ते दिवस !... फुलपाखरालाही लाजवेल असे ते स्वच्छंदी जीवन... मनाला षड्रिपूंचा स्पर्शही झाला नव्हता. जिज्ञासा, कुतूहल, उत्सुकता, नवलाई म्हणजेच जीवन होते. ते माझं बालपण म्हणजे अवखळपणे वाहणारा निर्मळ झराच! 'बाळपणीचा काळ सुखाचा आठवतो घडी घडी' असं म्हणता म्हणता,

'अहा ते सुंदर दिन हरपले,
मधुभावांचे वेड जयांनी जीवा लावले,' 

असं म्हणण्याची पाळी आली आहे. बालपणानंतर तरूणपण आलं, वृद्धत्वही डोकावू लागेल, परंतु जीवनातील वसंत ऋतू मात्रा माझ्या हातातून निसटला आहे. पण काळाची गती कोणाला रोखता आली आहे ? तो पुढे धावणारच ! मग आणि म्हणूनच प्रौढत्वातही बालपणाला जपणं, एवढंच आज माझ्या अन् तुमच्या हातात आहे.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 3

ramya te balpan composition in marathi

हिरवे हिरवे गार गालिचे, 
हरिततृणांच्या मखमालीचे।
त्या सुंदर मखमालिवरती,
 फुलराणी ही खेळत होती।। 

बालकवींची ही हरिततृणांची मखमल आणि या मखमलीवरती खेळणारी फुलराणी ! शून्यातून विश्वात आलेली ! नवनिर्मात्याच्या निर्माण कार्यातील नवनिर्मितीच म्हणावे तिला ! मग ते हिरवे गार गालिचे असोत की बाभळीचे काटे, उजाड डोंगरवाट वा रखरखते ऊन, परंतु या सर्वांचा मनसोक्त, मनमुराद

आनंद - सुख अनुभवून अलौकिक-असामान्य परिपूती साधणारा ही फुलराणी म्हणजे आयुष्यातील प्रत्येक क्षण मग तो बालपणीची चिमुकली पावले टाकणारा काळ असो वा तारुण्याचा मखमली चादर असो हे सर्व अनुभवणारी एक समृद्ध अभिव्यक्तीच नव्हे काय ? 

मनोमयी विश्वातील प्रत्येक व्यक्तिरेखा कमी-जास्त प्रमाणात का होईना पण विश्वाच्या प्रत्येक इवल्याशा कोपऱ्यात सुखाची झालर शोधत असते, कारण तिला हवे असतात ते सुंदर दिन ! बालपणीच्या निरागस बोबड्या बोलांचे, किशोरावस्थेतील त्या अद्भुत बदलांचे व यौवनातील सुखद स्वप्नांचे ! ते सर्वच दिन ! ते सुखद दिन ! आज कुठेतरी हरपलेले ते सुंदर दिन !

सौंदर्यनिर्मितीच्या कर्तृत्वातून सौंदर्यशीलता फुलते, असे कवी कुसुमाग्रजांनी समजावून सांगितले आहे. 'जीवन' हा शब्दच सुंदर, संपन्न व सार्थ आहे आणि हे जीवन जगण्याची कला जाणणारा कलाकार हा जीवनाचा भाष्यकार ठरतो. 

कसेतरी रडतकुढत जीवन रेटणे म्हणजेच जीवन जगणे नव्हे. जगणे म्हणजेच जीवनाला अर्थ प्राप्त करून देणे होय, आणि या अर्थातच बालपण, किशोरावस्था, यौवन व प्रौढत्व वा वृद्धत्वाचेही मर्म सामावलेले असते. 

नदीच्या प्रत्येक टप्प्यातील - प्रत्येक वळणावरील अनुभवांतून साकारलेला समुद्र म्हणजेच जीवन होय. पण या मनमुराद कल्पना, ते स्वातंत्र्य, नी चंचलता, निरागसता व खळखळत्या पाण्यासारखी अवखळता असे ते दिन आजच्या या जागतिकीकरण, प्रदूषण, दहशतवाद व यांसारख्याच अनेक वादांमध्ये हरविल्याची संवेदना कुठेतरी सतत जाणवत राहते.

आज जीवनात प्रचंड अस्थिरता, अशांतता, अनिश्चितता भरतीच्या उफाळलेल्या सागरात सापडलेल्या नावेप्रमाणे हेलकावे खाते आहे. सिमेंटच्या जंगलात मार्ग शोधता शोधता आबालवृद्ध अनेक ठिकाणी ठेचाळत आहेत.

स्वतःचे स्वत्वममत्व विसरलेली आजची आधुनिक स्त्री पाश्चात्त्यीकरणाच्या नावाखाली उगाचच गल्लीबोळांतून फिरताना दिसते आहे. या सर्व अंदाधुंदीत, संवेदनशील मनुष्य मात्र आमराईतील आंबे चोरून खाण्याचे ते दिन,

परकरात बोरीचे गुच्छ जमविण्याचे ते दिन, सागरी वाळूत दिवसभरात एकदा तरी जाणे कित्येकवेळा पण किल्ले बांधण्याचे ते दिन, त्या व अशा सुखद दिनाच्या पायऱ्या वर्तमानकाळाच्या उंबरठ्यावर बसून मोजतो आहे. 

कारण आजच्या आधुनिकतेच्या व उद्योगीकरणाच्या गलबलात त्याची दृष्टी संवेदनशील वृत्ती अधू होत चालली आहे. या परिस्थितीत त्याला भविष्यातील अंधकार स्पष्ट दिसतो आहे.

जीवनाच्या वाटेवर, पाऊल टाक जपून। पायात रुतण्यासाठी काटे आहेत टपून॥ या व अशा परिस्थितीतही आजचा रसिक मात्र गुलमोहराची ती मनोहारी स्वप्न, स्पर्शाची ती सुखद अनुभूती, पापण्याच्या अर्धकलमामध्ये त्या सुंदर दिनांच्या आठवणी जपून ठेवणार आहे.कारण तो खराखुरा रसिक आहे. 

जीवनाच्या वाटेवरील प्रत्येक अनुभव तो निर्मिकाची भेट म्हणून जपून ठेवणार आहे. कारण या आठवणींशिवाय जीवनात रस नाही. रूप तर येणारच नाही मग रंग कुठला भरणार ? हे ती जाणून आहे. आणि म्हणूनच हरपलेल्या त्या सुंदर दिनांच्या आठवणी आजचा हा रसिक हृदयाच्या पिंपळावर कोरून ठेवणार आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

टीप : वरील निबंध माझे बालपण या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते
  • majhe balpan prasang lekhan marathi