माझा आवडता छंद मराठी निबंध | My Favourite Hobby Essay In Marathi
निबंध 1

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा आवडता छंद मराठी निबंध बघणार आहोत. आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला सुखाचे चार क्षण मिळतात ते त्याला आवडत असलेल्या छंदापासून म्हणून प्रत्येकजण कोणता ना कोणता छंद जोपासत असतो. अश्याच सुखकर छंदाविषयी आपण पुढील 7 वेगवेगळ्या निबंधामध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

प्रत्‍येक जण आपल्‍या आवडत्‍या छंदातुन आनंद शोधण्‍याचा प्रयत्‍न करत असतो. कुणाला छंद असतो शिकारीचा, तर कुणाला छंद असतो गडकिल्ले हिंडण्याचा. कुणाला छंद असतो पोस्टाची तिकिटे, नाणी किंवा विविध जुन्या वस्तू गोळा करण्याचा. कुणी मित्र गोळा करून पत्ते कुटत बसतात.

तर कुणी एकटेच सतार छेडत बसतात. कुणी पुस्तकांना आपले मित्र करतात; तर कुणी कागदावर कुंचल्यांनी चित्रे खेचतात. माझा छंद तसा जगावेगळा आहे. मला लहानपणापासून आवड आहे ती माणसे जोडण्याची आणि जसजसा मी मोठा होत गेलो तसतशी माझी ही आवडही वाढत गेली.

तसे पाहता आमचे कुटुंब फार छोटे आहे. आई, बाबा आणि मी. पण अगदी लहानपणापासून मला आपल्या घरी खूप माणसे यावीत, गर्दी व्हावी, गडबड उडावी असे वाटे. आई सांगते की, मी लहानपणी आपल्याकडे 'हळदीकुंकू' कर, 'सत्यनारायणाची पूजा' कर असा नेहमी हट्ट करीत असे. कारण त्यामुळे घरात खूप माणसे येत. सुट्टीचा वार रविवार वा सुट्टीचा 'मे' महिना मला फार प्रिय आहे. कारण सुट्टीमुळे खूप पाहणे घरी येतात. सुट्टी येण्यापूर्वीच मी माझ्या आप्तांना, मित्रांना आमंत्रणे पाठवितो. त्यांना वाटते की किती विनम्र, लाघवी मुलगा आहे. पण माझे माणसवेड त्यांना 'अनभिज्ञ' असते.

मला आवडतात ती माणसे फक्त नात्यागोत्याचीच अथवा आपल्या योग्यतेची असतात असे नाही हं! मला कोणतीही माणसे आवडतात. आम्ही राहतो त्या कॉलनीत आमचा बंगला पहिला बांधला गेला. इतर सतरा बंगले नंतर आमच्या देखत बांधले गेले. तेव्हा मी प्राथमिक शाळेत होतो; भरपूर मोकळा वेळ असे. त्यावेळी बांधकाम करणाऱ्या माणसांशीही मी दोस्ती करीत असे. बांधकामावर खूप स्त्रिया असत. त्यांच्याबरोबर त्यांची लहान मुले असत.

या मुलांबरोबर मी खूप खेळत असे. त्यांच्याकडूनच मी विटीदांडूचा खेळ शिकलो. ही मुले लहान वयातही आपल्या आईवडिलांना केवढी मदत करीत. आज ती मुले वयाने मोठी होऊन पुरुष झाले आहेत, त्यांच्यातील कित्येकजण स्वतंत्र कामे करू लागले आहेत.

maza avadta chand marathi nibandh 

मी मोठ्या शाळेत जाऊ लागलो, तसा माझा हा छंद वाढतच गेला.
वर्गातील दोस्तच काय, पण शाळेतील सगळी मुले माझे मित्र बनले. तसा माझा स्वभाव बडबड्या आहे. मला बोलायला खूप आवडते, पण तितकेच मला इतरांचे विचारही ऐकायला आवडतात. त्यामुळे दूरचा प्रवासही मला कधी कंटाळवाणा होत नाही. प्रवासात अनेक ओळखी होतात, अनेक अनुभव ऐकावयास मिळतात, अनेक दोस्त मिळतात,

गाडीत माल विकणाऱ्या फेरीवाल्यांबरोबरही मला गप्पा मारायला आवडतात. माझे वडील म्हणतात, "अरे, यांच्याशी तू कसल्या गप्पा मारतोस?" मी फक्त हसतो. पण मला आठवते ते काणेकरांनी सांगितलेले, 'सामान्याचे असामान्यत्व.' काणेकर त्यांचा अनुभव सांगतात की, ज्या माणसाजवळ डोके कमी त्याच्याजवळ माणुसकी मोठी असते. मलाही हा अनुभव आलेला आहे. 'बोलघेवड्या मित्रांपेक्षा साधेभोळे, कष्टकरी मित्रच आपल्या जास्त उपयोगी पडतात.'

माझा हा माणसे जोडण्याचा छंद आहे ना, त्याचेही मी एक शास्त्र तयार केले आहे. मला जेव्हा नवीन मित्र भेटतात तेव्हा मी त्या मैत्रीची नोंद ठेवतो. त्या मित्रांचे पत्ते लिहून ठेवतो. वेळोवेळी त्यांना पत्रे लिहितो. त्यांची पत्रे मला येत असतात. त्यामुळे जीवघेणा कंटाळा मला कधीही ग्रासू शकत नाही. मी कधीही एकटा नसतो. मी जोडलेली असंख्य माणसे, मित्र सदैव माझ्याभोवती असतात-कधी प्रत्यक्ष, तर कधी पत्ररूपाने किंवा फोटोरूपाने.

तुम्ही विचाराल या छंदात मला कधी नुकसान सोसावे लागले नसेल का? नाही असे नाही, पण फारच अल्प. काही लोकांनी माझ्याशी दोस्ती केली पण ती खरी दोस्ती नव्हती, ते केवळ दोस्तीचे नाटक होते. काहींनी तेवढया ओळखीवर माझ्या काही मौल्यवान गोष्टी हडप केल्या; पण असे अनुभव फार विरळ. माझ्या या माणसांसाठी मला तनमनाने झिजावे लागते.

अगदी परीक्षेच्या दिवसांतही एखादयासाठी वेळ खर्चावा लागतो.
पण त्यात मला आगळा आनंद मिळतो. माझे सारे सुखच या छंदात सामावलेले आहे.
मित्रांनो तुम्हाला माझा आवडता छंद मराठी निबंध कसा वाटला , आपला आवडता छंद कोणता आहे हे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद.

निबंध 2

maza avadta chand marathi nibandh

माझा आवडता छंद संगीत आहे, संगीत ही अखिल मानवाची खरी भाषा आहे! ती देवरूप आहे. “जिथे संगीत तिथे पावित्र्य'- असं थोर तत्त्वज्ञ म्हणतो. “संगीतप्रेमी राजाच्या राज्यात सुखाची रेलचेल असते.” असं मेनसियस म्हणतो. यात नक्कीच तथ्य आहे.

घराच्या वातावरणातून व्यक्तित्व घडते. माझं कुटुंब संगीतप्रेमी म्हणून मीही संगीताच्या तालावर वाढलो. सुरात म्हटलेल्या कविता, भजन, सिनेमाची गाणी यांनी मी 'तानसेन' झालो. रविशंकरांची सतार, बिस्मिल्लांची शहनाई, शिवकुमारांची संतुर यांच्या सुरांच्या बरसातीत मी चिंब भिजू लागलो. शास्त्र कळत नसे पण सौंदर्य जाणवत असे. समाधी लागत असे. पेटीवर बोटे फिरवू लागलो. एरवी सामान्य वाटणारी बोटे पेटीवर जादूची वाटू लागत. वाढत्या वयाबरोबर संगीताचं ज्ञानही वाढू लागलं.

संगीत हा सर्वांत स्वस्त छंद. पण म्हटलं तर तितकाच महागडा. म्हणूनच कुठल्याही स्तरावरचा माणूस त्याचा आनंद लुटू शकतो. संगीताला ना स्थळांचे बंधन ना वेळेचे. न्हाणीघरही उत्तम जागा तर मध्यरात्रही उत्तम वेळ ! व्यक्तिगत तसेच सार्वजनिक मनोरंजनाचे एकमेव साधन-संगीत ! शुभकार्य- लग्न, बारशी, सण उत्सव- गणपती, नवरात्र, सभा-संमेलने या सर्वांना आनंदाचा, उत्साहाचा, शुचितेचा स्पर्श देत ते संगीतच! विलापालाही कारुण्याची किनार देतं ते संगीतच!... संगीतविरहित नृत्य किंवा सिनेमातील भावनांचा उत्कट प्रसंग रंगूच शकत नाही.

संगीत ही कोण्या एका वर्गाची मक्तेदारी नसते. लोकलमधून पैशासाठी गाणारा दरिद्रीनारायण इतका सुरेल असतो की त्यापुढे लक्ष्मीनारायणाच्या पैशाचा आवाज बदसूर वाटू लागतो... शास्त्र, कला व वाणिज्य या जीवनाच्या विद्यापीठाच्या तिन्ही शाखांचा अधिष्ठाता म्हणजे संगीत ! पेशकश ही कला, लहरींचं शास्त्र आणि उदरनिर्वाहाचं साधनही बनणारं संगीत म्हणूनच मला वामनाची पावलं वाटतात.

राष्ट्रीय गीत, वेदमंत्र ही संगीतात असतात. शब्द संपतात तिथे सूर जन्म घेतात. निसर्गाची भाषा सुरांचीच! झऱ्याचं गाणं, सागराचं गरजणं, पक्षांचे आवाज, ढगांचे आवाज... सारे आपल्याला संगीत शिकवतात. पण भौतिक सुखामागे कानात बोळे घालून धावणाऱ्या आम्हाला “छन्ऽछन्ऽऽ" या नगद नारायणाच्या शिवाय दुसरा आवाज ऐकू येत नाही.. चालायचंच! अभ्यासाने कंटाळलेल्या मला संगीताचे सप्तसूर संजीवन प्राप्त करून देतात.
खरंच, संगीत हा माणसानं निर्माण केलेला स्वर्ग आहे. या क्षणभंगुर आयुष्यामध्ये तेच एक शाश्वत सुख आहे...!

निबंध 3

My Hobby Essay in Marathi

छंद ! या शब्दाची व्याख्या अनेक विद्वानांनी वेगवेगळ्या शब्दांत केली आहे. माझ्या मते, आपल्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टी म्हणजे छंद नव्हे, छंद म्हणजे नेहमीच्या गोष्टींशिवाय दुसऱ्याच काही गोष्टींची आवड निर्माण होऊन ती गोष्ट शिकणे किंवा त्या गोष्टीबद्दल माहिती जमवणे किंवा ती गोष्ट आणखी मिळविण्याचा प्रयत्न करणे.

छंद म्हणजे एक प्रकारचे वेडच असते. कुणाला छंद असतो वाचण्याचा, कोणाला काव्य करण्याचा, कोणाला शिकारीचा, कोणाला ग्रीटिंग जमा करण्याचा, तर कोणाला मित्रांसमवेत काही खेळ खेळण्याचा, तर कुणाला गाण्याचा, संगीताचा छंद असतो. 'व्यक्ती तितक्या प्रकृती' या उक्तीला अनुसरून व्यक्ती तितके छंद असतात. प्रत्येकालाच वेगवेगळ्या प्रकारचे छंद असता.

मला छंद आहे वाचनाचा. लहानपणापासूनच मला वाचायचे वेड निर्माण झाले. का कुणास ठाऊक आमच्या आईने बाजारातून पुडी बांधून काही समान आणले, तरी त्या पुडीचा कागदही मी वाचून काढत असे. ग्रंथ हे मानवाचे खरे गुरू आहेत असे म्हणतात. स्वतःजवळचे ज्ञान ते कोणताही आडपडदा न ठेवता भरभरून दोन्ही हातांनी वाटत असतात. पण ते केवळ गुरूच असतात असे नाही बरं का ! माता-पिता, पुत्र, पत्नी, मित्र यांसारख्या सर्व नात्यांतून ते आपल्याला वेळोवेळी योग्य सल्ला देतात.

वाचनाच्या छंदामुळे आपले व्यक्तिमत्वही संपन्न होते. जगातील विविध संशोधकांची चरित्रे आपण वाचली तर आपल्या लक्षात येईल की, माणसे जाती, धर्म, देश, भाषा, चालीरीती या सर्व बाबतीत पूर्णपणे भिन्न होती; पण त्यांच्यातील एक सवय समान होती आणि ती म्हणजे वाचनाची. वाचनामुळे माणूस आपले ज्ञान अद्ययावत ठेवू शकतो आणि त्याच्या प्रगतीचा मार्गही सुकर होतो. ग्रंथवाचनाने आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. हे ज्ञान आपल्याला फुकट मिळत असते.

'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन' या गीतोक्तीप्रमाणे ते निरिच्छ वृत्तीने आपली सेवा करतात. आपल्या जीवनात आनंद व समाधान यांचा जीवनरस ओततात. मात्र, त्या रसाची अवीट गोडी चाखण्याची रसिकता अंगी हवी. अनेक थोरामोठ्यांची चरित्रे, आत्मचरित्रे आपल्याला स्फूर्तिदायक ठरतात. आपल्या जीवनातील अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य वाचनातून निर्माण होते. म्हणून मी माझा हा छंद कायम जोपासण्याचा प्रयत्न करतो.

वाचनाच्या छंदामुळे मला संतांचा परिचय झाला. त्यांचे खडतर जीवन समजले. अनेक लेखकांच्या वाचनामुळे मला त्यांच्या जीवनाचा प्रवास समजला. खांडेकरांच्या 'ययाती' आणि 'अमृतवेल' या कादंबऱ्या वाचून जीवन जगण्याचा मार्ग समजला. फडक्यांच्या कलावादी दृष्टिकोनाने मन कलावादी बनले.

माटेंचे 'उपेक्षितांचे अंतरग वाचुन मला गलबलले कुसुमाग्रजांचा 'विशाखा' काव्यसंग्रह वाचून मातृभूमीविषयी अतूट नाते निर्माण झाले. तर अत्र्यांच्या उधळलेल्या झेंडु फुलांनी मला अगदी खदखदून हसविले. खरंच, मला या छंदामुळे खूप काही मिळविता आले. मला सर्वजण वाचाड्या' असे म्हणत, पण खरच मला ते मनापासून आवडत होते. कारण मला माहीत होते की, माझ्या छंदामुळे माझ्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. मला आत्तापर्यंत खूप बक्षिसे मिळाली ती कशामुळे वाचना मुळेच, म्हणजेच काही छंद माणसाला प्रसिद्धीच्या शिखरावर नेतात. त्यांत मी वाचनाच्या छंदाला अग्रक्रम देतो.

मला वाचाड्या हे टोपणनाव का पडले असावे ? कारण एकदा गंमतच झाली. मी रणजित देसाईंची 'श्रीमान योगी ही कादंबरी रेल्वेमध्ये वाचत होतो. मला तळेगावला जायचे होते. माझी कादंबरी वाचून संपली तेव्हा रेल्वे शिवाजीनगरला आली होती. विचारांती समजले की, मी त्याच लोकलने लोणावळ्याला जाऊन परत आले. ज्या कामासाठी जायचे होते ते काम बाजूला राहिले, पण माझी श्रीमान योगी' वाचून झाली. ही गंमत जेव्हा मी सर्वांना सांगितली तेव्हापासून मला हे टोपणनाव पडले आणि माझा जो वाचनाचा छंद होता तो चांगलाच गाजला.

कोणी काय काय बोलले ते सांगत नाही. तरीसुद्धा माझ्या मते, ग्रंथांचा सहवास आपल्यावर स्वर्गीय आनंदाची बरसात करतो. तो मन धुंद करतो आणि त्या धुंदीतून आपल्याला सर्व काही चांगले मिळते. वाचनाने विचाराला, चिंतनाला वाव मिळतो, म्हणून मला माझा हा गाजलेला छंद सर्वात जास्त आवडतो.

निबंध 4

माझा आवडता छंद short marathi nibandh
मुद्दे :

  • छंदाचा फायदा
  • छंद कसा लागला?
  • संग्रह
  • मिळणारा आनंद
  • बदललेल्या सवयी
  • होणारे इतर फायदे.

माणसाला कोणता ना कोणता चांगला छंद हवा कारण छंद माणसाला कष्टांतून विसावा देतो. माझा छंद जरा वेगळा आहे. त्याचे बीज माझ्या लहानपणीच रोवले गेले. आई नोकरी करत असल्यामुळे आजी माझा सांभाळ करत असे. आजी काम करत असताना नेहमी चांगल्या चांगल्या कविता म्हणत असे. त्यामुळे लिहा-वाचायला येण्यापूर्वीच अनेक कविता, काव्यपंक्ती माझ्या तोंडपाठ होत्या.

लिहायला यायला लागल्यापासून मी चांगल्या कविता उतरवून ठेवू लागलो. अशा अनेक वह्या आज भरलेल्या आहेत. त्या पुन:पुन्हा वाचायला मला आवडतात. आवडत्या कविता माझ्या ओठांवर सतत असतात.

या पाठांतराचा मला फायदा होतो. काव्यवाचनाच्या स्पर्धेत किंवा अंताक्षरीमध्ये मी नेहमी यशस्वी होते. आमच्या बाई कधी कधी ‘पावसावरच्या कविता', 'चांदण्यावरच्या कविता' किंवा 'आईवरील कविता' असा उपक्रम घेतात. त्या वेळी मीच आघाडीवर असते. निबंध लिहितानाही मला या छंदाचा उपयोग होतो. असा हा माझा कविता जमवण्याचा छंद मला खूप आवडतो.

निबंध 5

सत्य , शिव आणि सुंदरता यांचा मिलाफ म्हणजे कविता . माझे वडील उस्फूर्त कवी होते. सहकारी मंडळांच्या सभेत त्यांचे तोंडी काव्योद्गार बाहेर पडत . लेखणी व कागद यांचीही गरज नाही. साहजिकच मलाही कवितेचा छंद जडला यात नवल नाही. छंद विविध प्रकारचे असतात. वाचन , पक्षी-निरीक्षण, पिसे , तिकिटे, नाणी यांचा संग्रह करणे, चित्रकला , सुविचार-संग्रह इत्यादी . छंद आणि कला यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. आपल्या भावनांचे, विचारांचे, संस्कृतीचे, आत्म्याचे प्रकटीकरण म्हणजे कला. जोसेफ मॅझिनी म्हणतात
" कविता ही चेतना आहे. कविता ही गति आहे.

भविष्याचा मार्ग प्रकाशित करणारी ती चांदणी आहे.'' बालपणापासूनच मी अनेक कवींच्या कविता वाचत मोठा झालो. मला निसर्ग खूप खूप आवडतो. त्याचे नर्तन , त्याचे गर्जन , त्याचे दर्शन सारेच मला मंत्रमुग्ध करते. नकळत मी निसर्गाच्या कुशीत भावनांना शब्दबध्द करतो व माझी कविता जन्म घेते. निराश मन लेखणानंतर हलकं होत तर आनंदी मन लिखाणानंतर सुखावतं. भावनांना शब्दरूप देताना वेळ कसा निघून जातो ते कळतही नाही . वर्तमानपत्र, शालेय मासिके तसेच आकाशवाणी या माध्यमांद्वारे माझ्या कविता वाचकांना सोपविताना खूप आनंद होतो.

माझ्या या छंदाने मला खूप खूप समृद्ध केलंय. हिरवंगार मन त्यानेच मला दिलंय. शब्दांचे सामर्थ्य काय असते हे मला त्यामुळेच पटले आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा 'किनारा' काव्यसंग्रह तसेच प्रसिद्ध कवयित्री पद्मा गोळे यांचा 'श्रावणमेघ' काव्यसंग्रह असे अनेक काव्यसंग्रह माझ्या संग्रही आहेत. मला कविता वाचायलाही खूप आवडते . माझ्या अनेक कवितांचा सुंदर संग्रह मी करून ठेवला आहे. शब्दांची जुळणी, सुंदर कल्पनांचा आविष्कार , जीवनाचे मर्म यांचा मिलाफ म्हणजे खरी कविता होय. वर्डस्वर्थ यांनी म्हटलेच आहे
"कविता हे सर्व ज्ञानपुष्पांचे अत्तर आहे." मोजक्या शब्दात आशय मांडण्याचे कसब कवितेत आहे.

हृदयातील भावना कागदावर चित्रित होतात. छंद म्हणून मी कवितेला जिवापाड जपतो. तिच्याशिवाय माझी लेखणी अधुरी आहे . या छंदाने मला विविध कल्पना दिल्या आहेत . मी दिवाळी , संक्रांत , नाताळचा सण , नववर्ष यानिमित्त मित्र व नातेवाईक यांना शुभेच्छा पत्रे देतो. ही शुभेच्छा पत्रे मी घरीच बनवतो. छान कवितेतुन संदेश त्यावर लिहितो . मला माझ्या छंदाने खूप शाबासकी मिळवून दिली आहे, माझे खूप कौतुक झाले आहे. असा माझा आगळा-वेगळा छंद मी अखेरपर्यंत जपणार आहे. देवी सरस्वतीचा वरदहस्त लाभो हीच प्रभूचरणी प्रार्थना आहे.

मानवी जीवन क्षणभंगुर आहे. काळ कोणासाठी थांबत नाही. प्रत्येक क्षण सार्थकी लावला गेला पाहिजे . म्हणूनच जीवनात छंदाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. फावल्या वेळेत छंद म्हणून केलेला उद्योग कधी कधी नकळत व्यवसायही बनतो. रिकामे बसण्यापेक्षा ज्या गोष्टीची आवड आहे त्यातून काही निर्मिती करण्याचा आंनद खूप मोठा आहे. म्हणून छंद हा हवाच! तो आपल्या जीवनाचा अनमोल ठेवा आहे, मनाची मरगळ घालविणारा तो सुखद स्पर्श आहे. तो विरंगुळा असा आहे की, जो आपल्यास ताजेतवाना करतो.
"माझ्या छंदाबरोबर मी जगतच गेलो

निबंध 6

माझा आवडता छंद | "व्यक्ती तितक्या प्रकृती" असे म्हटले आहे. अर्थात प्रत्येकाची आवड निवड ही वेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाला वेगवेगळ्या कृतीत गोडी वाटत असते. फावल्या वेळेचा सदुपयोग जर एखादा छंद जोपासण्यासाठी केला गेला तर काहीतरी नवीन निर्मिती होवू शकते. त्यातून स्वत:ला आनंद तर होतोच परंतु इतरांना सुद्धा त्याचा फायदा होवू शकतो. म्हणून छंद असणे ही चांगली बाब आहे.

मला बालपणापासून वाचनाचा छंद आहे. पाठ्य पुस्तकांव्यतिरिक्त इतर पुस्तके वाचण्याचा छंद, मला ५ वी पासून आहे. बाल वांड:मयातील कित्येक पुस्तके मी वाचून काढली. त्यामध्ये परीकथा, साहस कथा, चातुर्य कथा, बोध कथा इत्यादी पुस्तके वाचली. तसेच महापुरुषांच्या कार्याची ओळख करुन देणारी पुस्तके वाचली. 'इसापनीती' व 'जातक कथा' ही दोन पुस्तके मला अतिशय आवडली. इसापनीती व जातक कथा मध्ये वेगवेगळ्या प्राण्यांचा आधार घेवून अनेक मानवी मूल्य शिकविली आहेत.

ह्या कथा वाचनाने वाचक निश्चितच सदगुणी बनतो. त्याचप्रमाणे जीवनात केंव्हा कोठे व कसे वागावे ह्याची जाणीव येते. परीकथा किंवा साहस कथांनी काही काळ आपण स्वप्नाच्या जगात रमतो परंतु वास्तव जीवन व स्वप्नाचे जग यात खूप अंतर आहे. म्हणून अशा कथा व्यावहारिक दृष्टीकोनातुन फारशा उपयोगाच्या वाटत नाहीत. परंतु विरंगुळा म्हणून साहसकथा किंवा परीकथा वाचायला हरकत नाही.

वाचनाचा हा छंद ज्ञान वाढविणारा आहे. करमणूकी शिवाय आपले ज्ञान वर्धित करणारा आहे. वाचन म्हणजे फावल्या वेळेचा सदुप पुस्तके वाचल्याने आपला शब्द साठा वाढतो व आपले भाषा ज्ञान समृद्ध है त्याचप्रमाणे कल्पनाशक्ती विकसित होते. वाचन सुधारते. विविध मुल्ये अंगी रुजतात. वाईट व्यसनांपासुन आपण दूर राहतो. पुस्तके मित्रांप्रमाणे दुर्गुणांपासून वाचतो. वाचनाने विचार क्षमता विकसित होते. बऱ्या वाईटाची जाणीव होते. योग्य अयोग्य गोष्टींची जाणीव येते. विवेक बुद्धी वाढीस लागते. एवढे सारे फायदे वाचनाने होतात. म्हणून हा छंद मी जोपासतो.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका 

निबंध 7 

छंद म्हणजे कोणत्या तरी चांगल्या गोष्टीची आवड असणे, नाद असणे. माणसाला कोणता ना कोणता छंद असावा; म्हणजे त्याचा वेळ चांगला जातो. माझा छंद आहे उत्तम विचार असलेल्या उताऱ्यांचा संग्रह करणे.' लहानपणापासून मला वाचनाची खूप आवड आहे. 

याच माझ्या आवडीतून माझ्या या छंदाचा जन्म झाला. वाचनाची माझी आवड माझ्या बाबांच्या लक्षात आली होती. त्यामुळे ते मला उत्तम पुस्तके आणून देत असत. माझा दहावा वाढदिवस होता, तेव्हा बाबांनी मला एक सुंदर डायरी भेट दिली. 

बाबांनी ती डायरी दिल्यापासून मी वाचलेल्या प्रत्येक पुस्तकातील सुंदर वाक्ये, सुंदर कल्पना माझ्या डायरीत लिहू लागलो. पाहता पाहता माझी डायरी सुंदर विचारांनी व सुभाषितांनी भरू लागली. मग माझ्या बाबांनी मला दुसरी डायरी दिली... तिसरी डायरी दिली. आज या चार वर्षांत माझ्याजवळ अशा सात डायऱ्या झाल्या आहेत.

उत्तम गदय उताऱ्यांबरोबर मी त्यात मला आवडलेल्या काही सुंदर कविताही लिहून ठेवल्या आहेत. 'आई' या विषयावरच्या कितीतरी सुंदर ओळी माझ्याजवळ आहेत. आपल्याजवळचे फोटोंचे आल्बम जसे आपण पुनःपुन्हा पाहत असतो, त्याप्रमाणे माझा हा विचारसंग्रह मी पुनःपुन्हा वाचत असतो. हाच माझा आनंद आहे. 

हा विचारसंग्रह, या डायऱ्या म्हणजे माझा खजिनाच आहे. माणसांना विविध प्रकारचे छंद असतात. कुणी देश-विदेशांची नाणी गोळा करतात, कुणी स्टॅम्प्स गोळा करतात. कुणी प्रवासाला जातात; तर कुणी गिर्यारोहणाला जातात; तर कुणी देश-विदेशांतील दुर्मीळ वस्तू गोळा करतात. 

माणसाला छंद अवश्य असावा; पण माणसाने छांदिष्ट असू नये. आपल्या छंदामुळे दुसऱ्यांना त्रास न होता, त्यांच्या आनंदात भर कशी पडेल हे आपण पाहिले पाहिजे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

[शब्दार्थ : विचारसंग्रह - collection of thoughts. वियारसंग्रह. विचारों का संग्रह। खजिना-treasure. नी. खजाना। छांदिष्ट- slave of hobby. शोजनो गुवाम. सनकी (शौक का गुलाम)।]