शाळेतील माझा पहिला दिवस मराठी निबंध | Shalecha Pahila Divas In Marathi Essay

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आमच्‍या ब्लॉगवर तुमचे स्‍वागत आहे, आज आपण शाळेतील माझा पहिला दिवस मराठी निबंध | Shalecha Pahila Divas In Marathi Eassy या विषयावर निबंध  बघणार आहोत. शाळेच्‍या पहील्‍या दिवसाची उत्‍सुकता सर्वानाच असते तेथील वातावरण, इमारत परिसर हे सर्व पहील्‍या दिवशी नवीनच असते, त्‍या परीस्‍थीतीसोबत जुळवुन घेण्‍यात वेगळीच गंमत असते अश्‍याच प्रंसगाचे वर्णन या निबंधात करण्‍यात आले आहे. चला तर मग निबंधाला सुरूवात करूया.    

माझे बालपण, माझे बालपण अगदी खेडेगावात गेल्यामुळे बालोदयान, शिशुविहार, के. जी. वगैरे शिक्षणक्षेत्रातील पांढरपेशी प्रकार माझ्या वाट्याला कधी आलेच नाहीत. चांगली पाच वर्षे पूर्ण होऊन सहावे लागल्यावर मला शाळेत घालण्यात आले. मे महिन्यात माझा जन्मदिवस असल्याने जूनच्या पहिल्या दिवशी शाळेचे नवीन वर्ष सुरू होताना मी शाळेत जाऊ शकलो.  त्या घटनेला इतकी वर्षे होऊन गेली तरी ती घटना, तो दिवस माझ्या डोळ्यांसमोर जसाचा तसा उभा आहे.

माझा शालेय प्रवेशाचा दिवस पंचांग पाहून ठरविण्यात आला होता. भल्या सकाळीच आमचे गुरुजी आले. थोड्या प्रमाणात होमहवन करण्यात आले आणि मग मी आईवडिलांच्या दृष्टीने शाळेत जाण्यास पात्र ठरलो. तोपर्यंत शाळा म्हणजे काय याची मला काहीच कल्पना नसल्यामुळे मी मोठ्या खुषीत होतो. घरात चालणाऱ्या विविध समारंभांपैकी हाही एक काहीतरी समारंभ असावा, असे मला वाटत होते. वरणापुरणाचे जेवण झाले. मला नवीन कपडे घालण्यात आले. माझ्या पायांतील चप्पलही नवी कोरी होती. नवे दप्तर, नवी कोरी पाटी, नवी पेन्सिल या नवेपणाच्या धुंदीत बाबांचे बोट धरून मी शाळेच्या दारात केव्हा येऊन पोहोचलो ते मलाच कळले नाही.

SHALETIL MAZA PAHILA DIVAS
SHALETIL MAZA PAHILA DIVAS

एका जुन्या वाड्यात आमची शाळा होती. एका मोठ्या दालनात दोन-दोन वर्ग भरले होते. दोन दालनांत मिळून चार वर्ग होते; आणि दोन गुरुजी शाळा सांभाळत होते. बाबांनी मला गुरुजींच्या स्वाधीन केले आणि बाबा परत फिरले तेव्हा खरोखर मला ब्रहमांड आठवले. बाबांशी बोलताना जो गुरुजींचा आवाज मधाळ वाटत होता, तो बाबांची पाठ फिरल्यावर एकदम कठोर झाला आणि कोपऱ्यात ठेवलेली वेताची छडी गुरुजींनी हातात घेतली. ते पाहून मला कापरेच भरले. गुरुजी शरीरयष्टीने धिप्पाड होते. डोक्यावरच्या टोपीतून त्यांची शेंडी बाहेर डोकावत होती. खरे पाहता, त्यांची ती शेंडी पाहून मला हसूच येत होते; पण हसण्याचे धाडस नव्हते. उकडत असूनही गुरुजींनी कोट घातला होता. तेव्हापासून माझी पक्की समजत झाली होती की, गुरुजी म्हटले म्हणजे त्यांच्या अंगावर कोट हवाच! मुंबईला प्रशालेत आल्यावर मात्र ही समजूत पुसली गेली.

आमचे हे गुरुजी एकाच वेळी दोन वर्ग सांभाळत होते. एरवी वानराप्रमाणे उड्या मारणारे आम्ही पंचवीसजण गुरुजी वर्गावर आले की शेळीसारखे बसत होतो. गुरुजी सतत फेऱ्या मारीत चौथीच्या वर्गाला गणित घालत होते, तर पहिलीच्या मुलांना शब्द घालत होते. एकाही अक्षराची अदयापि मला ओळख नाही हे समजल्यावर त्यांनी माझ्या बावन्न पिढयांचा उद्धार केला असावा.

तीन-चार तास एका जागी बसण्याची मला सवय नव्हती. अपरिचित जागा, अनोळखी माणसे! भीतीने माझ्या डोळ्यांतून गंगा-यमुना वाह लागल्या; तसे मास्तर कडाडले, "रडायला काय झालंय?" आता फक्त छडीच मारायची उरली होती. डोळयांतले पाणी मी पुसून टाकले आणि मोठ्या निग्रहाने अक्षरे गिरवू लागलो.या घटनेला आज बरीच वर्षे होऊन गेली, तरी तो शाळेतील पहिला दिवस मी विसरू शकत नाही. त्याच छडीच्या धाकाखाली शाळेतील चार वर्षे पार पडली आणि पाचवीसाठी मी शहरात आलो.

मित्र-मैत्रिणींनो तुमच्‍या जिवनातील शाळेतील पहील्‍या दिवसाचा अनुभव कसा होता हे कमेंट जरूर कळवावे . Shalecha Pahila Divas In Marathi Essay हा निबंध तुम्‍हाला नक्‍की आवडला असेल अशी आशा करतो. धन्‍यवाद 

टीप : वरील निबंध शाळेतील माझा पहिला दिवस मराठी निबंध या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते

 • shalecha pahila divas in marathi Essay
 • shalecha pahila divas marathi nibandh
 • mazya shalecha pahila divas in marathi
 • marathi nibandh shalecha pahila divas in marathi
 • shalecha pahila divas nibandh marathi madhe
 • majha shalecha pahila diwas nibandh
 • sayesha pahila divas marathi nibandhशाळेतील माझा पहिला दिवस मराठी निबंध | Shalecha Pahila Divas In Marathi Essay

 • sayesha pahila divas marathi nibandhकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत