पावसाळयावर  मराठी निबंध |  Rainy Season Essay In Marathi

नमस्‍कार मित्रांनो पावसाळयावर  मराठी निबंध  Rainy Season Essay In Marathi विषयावर निबंध पाहणार आहोत. 

पावसाळा अर्थातच वर्षा ऋतु हा बालपणातील आठवणी ताज्‍या करून देणारा असतो , कागदाची होडी पावसाच्‍या पाण्‍यात सोडण्‍याची विलक्षण गंमत असते . शालेय जिवनामध्‍ये पावसाळा निबंध मराठी या विषयावर निबंध लेखन करायचे असते. हा वर्णणात्‍मक निबंध असतो, त्‍या अनुशंगाने आपण विस्‍तुत निंबध लेखन करणार आहोत चला तर निबंधाला सुरूवात करूया.

पावसाळ्याचे दिवस असूनही नेमेची येणारा पावसाळा जेव्हा दडी मारतो, तेव्हा माणूस अगदी मेटाकुटीला येतो. माणसे पाण्यासाठी वणवण भटकत असतात आणि त्यांचे डोळे वरचेवर आकाशाकडे वळलेले असतात. पण वर्षाराणीचे इमानी सेवक असलेले काळे ढग आसमंतात कुठेही दिसत नाहीत. कारण वर्षाराणी रुसलेली असते. परंपरेचे अंधपजक असलेल्या कविमंडळींनी आजवर 'ऋतुराज', 'ऋतुराज' म्हणून वसंताला श्रेष्ठ गणले, गौरविले, म्हणूनच ही राणी रुसली असावी की काय!

ऋतुराज्ञी वर्षा मराठी निबंध किंवा सर्व ऋतुंची राणी वर्षा ऋतु मराठी निबंध

सदोदित वसंताचे गुणगान करणाऱ्या लोकांना जेव्हा वर्षाराणीचे महत्त्व उमगले, तेव्हा त्यांनी तिचे राज्ञीपद तिला बहाल केले. कारण वर्षा नसेल तर वसंताचा साजशृंगार तरी कसा झाला असता? जाई, जुई, चमेली वर्षेच्या प्रेमळ वर्षावात भिजून निघतात म्हणून तर वसंताचा साजशृंगार होत असतो. ग्रीष्माने पोळून निघालेली धरतीमाताही वर्षेचे पाणी पिऊन तृप्त होते. तिच्या तृप्ततेचा तो मृद्गंधी निःश्वासही किती मोहक असतो!

वर्षाराणी ही खरोखरच आपली जीवनदात्री आहे. पण या सम्राज्ञीचा रोषही तापदायक असतो, याचा अनुभव कधी ओल्या दुष्काळाने, तर कधी कोरड्या दुष्काळाने येतो. कधी ही राणी रुसून बसते आणि मग सर्वांच्या तोंडचे पाणीच पळते, तर कधी रागारागाने ही दिवसरात्र बरसतच राहते आणि त्यामुळे या वर्षाराणीचे आगमन नकोसे होऊन जाते.जाळणाऱ्या ग्रीष्माच्या पाठोपाठ या वर्षाराणीचे होणारे आगमन केवढे सुखद असते! स्वास्थ्य आणि समृद्धता यांची त्यात हमी असते. वर्षाराणीच्या या आगमनाचे वर्णन करताना कवी निकुब  म्हणतात

'विजेचे नर्तन,

मेघांचे गर्जन मृद्गंध,

विशाल समृद्ध शेते,

अमृतवर्षाव सांगाती घेऊन हिरवा आपुला शृंगार लेऊन,

येई वर्षादेवी.'

आकाशातील काळ्या रंगाचे डोंगर या ऋतुराज्ञीच्या आगमनाची द्वाही फिरवू लागतात. आकाशातील ढगांची ही वादये वाजू लागली की, त्याच तालावर मोर आपले गायन व नर्तन सुरू करतात. धुंद वारा वाहू लागतो आणि शेवटी आकाशातून टपोरे थेंब पृथ्वीवर बरसू लागतात. तहानलेली धरा ते पाणी जणू घटाघटा पिऊन टाकते आणि आनंदाने पुलकित होते. त्यामुळे तिचा मृद्गंध सगळीकडे दरवळतो.

असा हा वर्षाऋतू चैतन्याची सनद आहे. तो सृजनशीलतेचा संहारावरचा विजय आहे वर्षाऋतू हा विपुलतेचा ऋतू. वसुंधरेला सस्यश्यामला करणारा हा ऋतू धरतीपुत्रालाही उदात्ततेची शिकवण देतो. वर्षाराणी ही सर्व सजीवांची गंगोत्री आहे, सृष्टीचे सौभाग्य आहे. आमच्या जीवनात जे काही सुंदर आहे तो तिचाच आशीर्वाद आहे. म्हणून वर्षा ही ऋतुचक्रातील सम्राज्ञी आहे.

मित्रांनो तुम्‍हाला पावसाळयावर  मराठी निबंध |  Rainy Season Essay In Marathi हा निबंध कसा वाटला व तुमचा आवडता ऋतु कोणता आहे हे कमेंट करून जरूर कळवा, धन्‍यवाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत