हुंडाबळी तरुणीची आत्मकथा मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक

hunda bali tarunichi atamkatha essay in marathi

हुंडाबळी तरुणीची आत्मकथा मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक : “थांबा, आतापर्यंत तुम्ही सर्वांनी खूप चर्चा केली. आता मला बोलू दया. कारण आता मी फारच थोड्या तासांची सोबतीण आहे. तेव्हा या सुंदर जगातून जाण्यापूर्वी मला माझे मनोगत व्यक्त करू दया. मला माहीत आहे, मी खूपच भाजले आहे; आणि या शेवटच्या क्षणीही मला जाणवत आहे की, हे जग सुंदर आहे. 

मग सांगा बरे, अशा या सुंदर जगाचा निरोप घेण्याचा प्रयत्न मी कशी करणार पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न' अशी माझ्यासंबंधी आपल्या अहवालात नोंद केली आहे; आणि वार्ताहरांनी त्यावरून वृत्तपत्रात तशाच प्रकारची बातमी दिली आहे. पण मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ओरडून सांगेन की, 'मी आत्महत्येचा प्रयत्न केला नाही. मला पेटवून दिले आहे. मी झोपेतून जागी झाले तेव्हा माझे कपडे पेटलेले होते. घरात सर्व माणसे हजर होती, पण कोणीही मला वाचविण्याचा यत्न केला नाही. कारण त्यांना मी नकोच होते. त्यांच्या डोळ्यांसमोर चमकत होते 'चकचकीत रुपये'.“अतिलोभी आहेत ती माणसे! पण खरंच, त्यांना माणसे तरी कसे म्हणायचे? राक्षसालाही लाजवील अशी त्यांची वृत्ती आहे. मी या घरात आले तेव्हा भरपूर सोने, चांदी, रुपये घेऊन आले होते. घरच्या लक्ष्मीत मी भरपूर भर घातली होती. माझ्या पूर्वी आलेल्या माझ्या तीन जावांनीही आपापल्या माहेराहून भरपूर धनदौलत आणली होती. पण माझ्या सासरच्या मंडळींचे एवढयावर समाधान नव्हते. 

सूना या संपत्ती मिळविण्याची साधनेच असे ही मंडळी मानतात. या सर्व गोष्टींचा परिणाम माझ्या मोठ्या जावेच्या मनावर झाला आहे आणि ती आता वेड्यांच्या इस्पितळात आहे. तिचे पती म्हणजे माझे मोठे भाऊजी मात्र दुसरे लग्न करण्याच्या तयारीत आहेत. कारण त्यांना माहीत आहे की येणारी नवी बायको आपल्याबरोबर रुपयांच्या राशी घेऊन येईल.

“काय म्हणता? या माणसाला मुलगी कोण देईल? अहो मुलगी म्हणजे उरावरचे ओझे मानणारे वधुपिते काय कमी आहेत? ही माणसे आपल्या मुलीचे एकदाचे लग्न करून टाकून मुक्त होण्यास उतावीळ झालेली असतात. कारण त्यांना आपल्या मुलीचे वय वाढत असल्याचीच भीती वाटत असते. 

मला आठवते ना, माझे पूर्वजीवन ! शाळा-कॉलेजातील ते दिवस किती रम्य होते! फुलपाखरासारखी मी भिरभिरत होते. अभ्यास, पुस्तके, खेळ, नृत्य, नाट्य, वक्तृत्व यांत मी रमलेली असताना शालेय शिक्षण संपून महाविदयालयात केव्हा गेले तेही कळले नाही. मैत्रिणींच्या सहवासात महाविदयालयातील मखमली दिवसही केव्हा भुर्रकन उडून गेले तेही लक्षात आले नाही. आवळयाजावळया आपल्या दोन मुलींना म्हणजे आम्हा दोघी-बहिणींना आईवडिलांनी फुलासारखे जपले. गूलाबाच्या सुगंधाने भरून गेलेल्या मार्गाने मी पाकळयांवर पावले टाकत सासरी आले पण येथे वाट्याला आले केवळ काटेच!

"खरं पाहता, माझ्या सासरी काहीच कमी नव्हते. लक्ष्मी व सरस्वती दोघींचा वरदहस्त या कुटुंबावर आहे. पण माझ्या सासूच्या रूपाने ‘आक्काबाईचा' घरात प्रवेश झाला आहे. एक स्त्रीच इतर स्त्रियांच्या दुःखाला कारण होत आहे. स्त्री-मुक्तीच्या वातावरणात वाढलेली मी सासुबाईंना निर्धाराने तोंड देत होते. पण दुर्दैवाने मला माझ्या पतीची साथ मिळाली नाही. शेवटी हे फळ माझ्या वाट्याला आले. या क्षणी वाईट वाटते माझ्या छोटया राणीसाठी. तिच्या वाटयाला हेच दुःख येणार का? कारण ती पण एक स्त्री आहे. स्त्रीवरील हा अन्याय केव्हा मिटणार, याचे कोणीतरी उत्तर देणार आहे का?"

वरील निबंध हुंडाबळी तरुणीची आत्मकथा मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

टीप : या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते  • hunda ek samajik samasya marathi essay
  • hunda bali nibandh in marathi

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत