माझी आई मराठी निबंध  MAJHI AAI MARATHI NIBANDH 
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझी आई मराठी निबंध मराठी (मोठा )बघणार  आहोत. या लेखामध्‍ये 6  पुर्ण  वेगवेगळे निबंध देण्‍यात आले आहे. या निबंधामधे आईचे आपल्‍या मुलाविषयी व्‍यक्त होणारे प्रेम व मुलांच्‍या फायद्यासाठी स्‍वता केलेला त्‍याग, आईचे मुलासोबत असलेल्‍या प्रेमळ नात्‍याचे वर्णन यात निबंधात केले आहे. चला तर मग सुरूवात करूया माझी आई मराठी निबंधाला. आईपुढे स्वर्गाचीही महानता  कमी  पडते. आईच्या प्रेमाची बरोबरी कोणीही करू शकत नाही. कवी मोरोपंत आईचे माहात्म्य सांगताना म्हणतात, इतरांनी कितीही प्रेम केले, माया केली तरी ते हे कमी ठरतात. तसे आईचे नसते. तिची माया कधी आटत नाही. अगदी आपल्या कुपुत्रालाही ती दुर करत नाही." माझी आईही अगदी अशीच आहे. आजचे माझे यश पूर्णपणे माझ्या आईमुळेच आहे. परवाच शाळेतील विविध स्पर्धांत मला बक्षिसे मिळाली. माझे हस्ताक्षर हे सर्व विदयार्थ्यांच्या हस्ताक्षरापेक्षा उत्कृष्ट ठरले, याचे संपूर्ण श्रेय माझ्या आईकडे जाते. लहानपणी अनेकदा मी लिहिलेला अभ्‍यास पसंत पडला नाही की आई मला तो परत लिहायला लावी. परत परत लिहिल्यामुळे माझे अक्षर घोटीव व वळणदार झाले. 

हे  निबंध पण वाचा  

mazi-aai-essay-marathi
mazi-aai-essay-marathi

मला आठवतेय, मी चौथीत असताना माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळी परीक्षेला जाण्यापूर्वी मला अचानक माझी तब्‍येत बिघडायची. मी परीक्षेला घाबरायचो. कशीबशी परीक्षा संपवून मी घरी आलो. आईने ओळखले, याला परीक्षेची भीती वाटते.

 मग पाचवीपासून तिने मला अनेक परीक्षांना बसवले आणि आता कोणत्याही परीक्षेचे मला अजिबात भय वाटत नाही. असे घडवले मला माझ्या आईने. म्हणूनच मनात येते, 'न ऋण जन्मदेचे फिटे.' माझ्या आईने माझ्यासाठी स्वत:च्या 'करीअर'चा कधीच विचार केला नाही. (हे पण वाचा माझे बाबा मराठी निबंध)ती स्वतः एम्. एस्सी.(M.Sc) असूनही मी लहान असताना तिने कधी नोकरीचा विचार केला नाही. मी आठवीत गेल्यावर तिने पीएच्. डी.(Ph.D) केली, तीही शिष्यवृत्ती मिळवून. अभ्यास करतानाही ती घरातील सर्व कामे स्वतः करत होती.

माझ्या आईचे माझ्या प्रत्येक गोष्टीकडे अगदी बारीक लक्ष असते. मी काय वाचावे. कोणकोणत्या स्पर्धांत भाग घ्यावा याकडे तिचे लक्ष असते. तिच्या वाचनात काही चांगले आले की ती आवर्जून मला वाचायला सांगते; पण माझे निर्णय मीच घ्यावेत याबाबत ती आग्रही असते.

आई या शब्द साधा सरळ असुनसुध्दात त्यात पुर्ण जगाची माया ममता दडलेली आहे. बालपणापासुन लाडाने खाऊ पिऊ घालणारी आई ही साक्षात अन्न‍पुर्णा देवी आहे. आपण आजारी पडल्यावर आई रात्रभर जागुन आपली सेवा करत असते. आईचा स्वभावच वेगळा असतो ती कधी प्रेम करते तर कधी रागावते पण नेहमीच आपल्यात मुलांच्या भल्याचाच विचार करते . खरोखरच आई आपल्या मुलासाठी किती करत असते. जिजाऊने शिवाजीला स्वराज्याची प्रेरणा दिली. महात्मा गांधीजींच्या मनात सत्याचा आग्रह त्यांच्या आईने शिकवला, तर भूदानाची कल्पना विनोबांना सुचली ती आईच्याच शिकवणुकीतून. विनोबांची आई म्हणे, ‘विन्या, आपल्याजवळ पाच घास असतील, तर त्यातील एक तरी दुसऱ्याला दयावा.'

आई हा थोर गुरू आहे. म्हणून तर बापूजी म्हणत, 'एक आई शंभर गुरूंहूनही श्रेष्ठ आहे.' आजच्या काळातला दहशतवाद, भ्रष्टाचार या गोष्टींविषयी बोलत असताना परवा आई म्हणाली, “प्रत्येकाने लक्षात ठेवावे की, प्रत्येकालाच असते आई." खरेच एवढा विचार केला तर हिंसकांचे हात हिंसा करताना थांबतील.(मोफत वाचा 100 हुन अधिक मराठी निबंध)

आईने आपल्यासाठी केलेल्या या सर्व गोष्टी आठवल्या की मनात येते, ज्याला लहानपणापासून आईची माया मिळाली नसेल त्याचे केवढे दुर्भाग्य ! म्हणून कवी यशवंत म्हणतात,

'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी'

मित्रांनो तुम्‍हाला माझी आई मराठी निबंध हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगायला विसरू नका कारण तुम्‍ही दिलेला प्रत्‍येक प्रतिसाद आम्‍हाला उत्‍साह देऊन जातो. व आपण खाली दिलेले बाकीचे ३ निबंध वाचु शकता.  धन्‍यवाद .

MAJHI AAI MARATHI NIBANDH क्रंमाक २ 420 शब्‍दात

कवी यशवंतांनी आईची थोरवी गाताना म्हटले आहे की, “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी।" खरं आहे ते! या मातेच्या प्रेमाला कशाची तुलना नाही. सत्ता, मत्ता, विद्वत्ता सारे हया आईपुढे व्यर्थ आहेत. म्हणून तर जग जिंकलेल्या सिकंदरालाही मातेची ओढ लागली होती. 

स्वराज्यसंस्थापक शिवबाच्या जीवनातही मातेला सर्वश्रेष्ठ स्थान होते. मातेचा प्रेमभाव सर्वत्र सारखाच आढळतो. त्यात गरीब-श्रीमंत, श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव करता येत नाही. एखादी श्रीमंत आई आपल्या मूलाचे जेवढे लाड करील, त्याला जेवढ्या उंची किमती वस्तू आणून देईल तेवढया भारी वस्तू गरीब आई आपल्या लेकराला देऊ शकणार नाही. पण म्हणून काही तिच्या प्रेमाची प्रत कमी ठरणार नाही. मातृप्रेमाची अनेक उदाहरणे आपल्याला भोवताली नेहमी दिसत असतात. चार घरी हिंडून भाकर-तुकडा गोळा करून आणणारी भिकारीण स्वतः उपाशी राहते; पण आपल्या लेकराला ती ओला-कोरडा तूकडा आधी भरविते. आपल्या लेकरासाठी आई केवढे साहस करू शकते याचा पुरावा म्हणजे रायगडावरील हिरकणी बुरूज.

आई आपल्या लेकरासाठी काय करीत नाही? ती जन्म देते एवढेच नव्हे तर सर्वस्वी परावलंबी असलेल्या आपल्या बाळाला ती सर्वतोपरी सांभाळते. ती त्याला खाऊपिऊ घालून त्याचे संगोपन करते व त्याबरोबरच त्याला नीतिकथा, चातुर्यकथा सांगून ती त्याचे मन फुलविते आणि मनाचा विकासही घडविते. 

मातेचा विशेष सहवास न लाभलेल्या बालकाला हया साऱ्या सौभाग्याला वंचित व्हावे लागते. शिवबा, विनोबा, बापूजी या साऱ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या मातेलाच दिले आहे. बापूजी तर आपल्या आत्मवृत्तात सांगतात, “एक नाना ही सहस्र शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ आहे." अपंग, मंदबुद्धी कसेही बालक असले तरी माता आपली माया पातळ करीत नाही. (हे पण वाचा आई संपावर गेली तर निबंध मराठी )

मातेच्या या श्रेष्ठत्वाची कसोटी लागते ती कुपुत्राच्या बाबतीत. कारण अशा दुर्गुणी मुलाचा वाली मातेशिवाय कोणी नसतो. घरीदारी सर्वत्र त्याला अपमान सोसावा लागतो. प्रत्यक्ष जन्मदाता पिताही त्याला घराबाहेर काढतो. अशा वेळी ती माता मात्र आपल्या कुपुत्रालाही जवळ करते. म्हणून तर कवी मोरोपंत म्हणतात

 • "प्रसाद पट झाकती परि परा गुरूंचे थिटे
 • म्हणून म्हणती भले न ऋण जन्मदेचे फिटे." 

आपल्या जीवनात अशी अनेक उपकारांची गाठोडी आपल्या मस्तकी असतात, त्यांचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही. म्हातारपणी वृद्ध मातापित्यांची सेवा करणे ही काही अंशाने त्या ऋणांची फेड होईल. पण ती फारच थोडी. कारण तो आपल्या कर्तव्याचाच भाग असतो. काहीजण कृतघ्न होऊन ती फेड पैशाने करू पाहतात आणि वृद्ध मातापित्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवितात. 

म्हातारपणी मातापिता आपल्या मुलांच्या प्रेमासाठी आसुसलेली असतात. ते त्यांना मिळाल्यास, त्यांना आपल्या जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटेल. अनेकदा ‘अतिपरिचयात् अवज्ञा' या उक्तीप्रमाणे आपल्याकडून मातेची महती ओळखली जात नाही. पण हे कृपाछत्र एव मोठे आहे. 

हे उपकार एवढे अगणित आहेत की सात वेळा काय, शंभर वेळा जन्मुुनही ते फिटणार नाहीत. जननी हे दैवत असे असामान्य आहे की, कोणत्याही फळाची अपेक्षा न करता ते आपल्यावर कृपाप्रसादाची खैरात करीत असते. म्हणून तर प्रत्यक्ष भगवान रामचंद्रांना स्वर्गापेक्षाही माता श्रेष्ठ वाटते. उगाचच नाही कवी म्हणत की, “आईसारखे दैवत साऱ्या जगतामधी नाही.

MAZI AAI ESSAY IN MARATHI क्रंमाक ३ 223 WORDS 

एकत्र कुटुंबात मी लहानाचा मोठा झालो. आमच्या घरात भरपूर माणसे आहेत आणि ती एकमेकांशी 'नात्याच्या रेशमी धाग्यांनी ' जोडलेली आहेत. माझी आई ही या घराची कर्णधार आहे असे म्हणायला हरकत नाही. चाळीशी ओलांडलेल्या माझ्या आईचा या घरात प्रेमळ वावर आहे. माझ्या आजीचा आणि माझ्या आईचा एकमेकींवर पूर्ण विश्वास आहे व परस्परांमध्ये दाट जिव्हाळा आहे.

अशी ही माझी आई दिवसातून फारच थोडा वेळ माझ्या वाट्याला येत असली, तरी तिचे माझ्या अभ्यासाकडे, माझ्या आवडीनिवडीकडे पूर्ण लक्ष असते. केवळ माझ्याच नव्हे तर आमच्या घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना स्वावलंबनाचे वळण लावण्यामागे, माझ्या आईचाच मोठा सहभाग आहे.

सुट्टीच्या दिवसांत आई घरातील सर्व मुलांना उत्तम पुस्तके वाचून दाखवते. त्यातून स्वाभाविकच आमच्यात वाचनाची आवड निर्माण झाली आहे. आईचे हस्ताक्षर उत्तम आहे. सुलेखन कसे करावे हे मला माझ्या आईनेच शिकवले. घरातील प्रत्येकाची आवडनिवड आईने लक्षात ठेवलेली आहे, त्यामुळे प्रत्येकजण तिच्यावर खूश असतो. नीटनेटकेपणा हा तिचा खास गुण आहे. त्यामुळे घरातल्या कुणालाही काही हवे असले की, त्याला माझ्या आईची आठवण येते आणि माझी आई त्याची नड तत्परतेने भागवते.

माझी आई उत्तम गृहिणी आहे. आल्यागेल्यांचे हसतमुखाने आतिथ्य कसे करावे, ते माझ्या आईकडुुन शिकावे. स्वंंयंंपाक करण्यात ती कुुशल आहे. माझे आजोबा व आजी आपल्या सूनबाईला 'अन्नपूर्णा' असे संबोधून सतत कौतुक करत असतात. शेजारच्या सर्व स्त्रिया अडीनडीला माझ्या आईकडे धावत येतात व आई त्यांना शक्य ती सर्व मदत करते. सदा हसतमुख असणारी ही माझी आई आमच्या घरची 'लक्ष्मी' आहे, असे सारेजण म्हणतात ते उगाच नाही!

तुम्‍हाला हे lekhan (लेखन) कार्य कसे वाटले हे कमेंट करून सांगु शकता. हा निबंध 4th std to 10 std पर्यत उपयोगात येऊ शकतो. 

माझी आई निबंध मराठी क्रंमाक (essay on mother in marathi) ४ 273 शब्‍दात

कवी यशवंतांनी आईची महत्‍व सांगताना म्हटले आहे, 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी!' अगदी खरे आहे ते ! मातेचे प्रेम अतुलनीय आहे. सत्ता, मत्ता, विद्वत्ता सारे या जन्मदेपुढे व्यर्थ आहेत. म्हणून तर कुणापुढेही न वाकलेला जगज्जेता सिकंदर आपल्या मातेसमोर नतमस्तक होत असे. महाराष्ट्राचे स्वराज्यसंस्थापक शिवाजी महाराज हेही श्रेष्ठ मातृभक्त होते.मातेच्या वात्सल्याचे स्वरूप सर्वत्र सारखेच आढळते. मातेच्या वात्सल्याची अनेक उदाहरणे आपल्या सर्वांच्या परिचयाची आहेत. चार घरी हिंडून भाकर-तुकडा गोळा करून आणणारी भिकारीण स्वतः उपाशी राहते; पण आपल्या लेकराला तो ओला-कोरडा तुकडा आधी भरवते. प्रसंगी अपत्याच्या वात्सल्यापोटी माता आपल्या प्राणांचीही बाजी लावते. इतिहासातील याचे जिवंत स्मारक म्हणजे रायगडावरील हिरकणी बुरूज!माता आपल्या लेकरासाठी काय करत नाही? ती त्याला जन्म देते. एवढेच नव्हे, तर सर्वस्वी परावलंबी असलेल्या आपल्या बाळाला ती नयनांचा दिवा व तळहातांचा पाळणा करून सर्वतोपरी सांभाळते. ती त्याचे संगोपन करते, त्याला नीतिकथा, चातुर्यकथा सांगन ती त्याचे कसमकोमल मन फुलवते. त्यावर सुसंस्कार घडवते. शिवबा, विनोबा, बापूजी यांसारख्या थोर व्यक्तींनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या मातेलाच दिले आहे. बापूजी तर आपल्या आत्मवृत्तात सांगतात, “एक माता ही सहस्र शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ आहे." मातेचे हे उपकार आपण कधीही फेडू शकत नाही. आपल्या वृद्ध मातापित्यांची सेवा करणे, ही काही अंशाने त्या ऋणांची फेड म्हणता येईल. खरे तर तो आपल्या कर्तव्याचाच एक भाग असतो. काही कृतघ्न करंटे ही फेड पैशाने करू पाहतात आणि वृद्ध मातापित्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतात. म्हातारपणी मातापिता आपल्या मुलांच्या प्रेमाच्या सावलीत विसावण्यासाठी आसुसलेले असतात. तसे झाल्यास ते त्यांना आपल्या जीवनाचे सार्थक वाटते.

मातेचे कृपाछत्र एवढे विशाल आहे, हे उपकार एवढे अमाप आहेत की शंभर वेळा जन्मूनही ते फिटणार नाहीत. जननी हे दैवत असे असामान्य आहे. ते आपल्यावर सदैव कृपाप्रसादाची खैरात करत असते. म्हणून तर प्रत्यक्ष भगवान रामचंद्रांना स्वर्गापेक्षाही माता श्रेष्ठ वाटते. म्हणूनच कवी म्हणतो, 'आईसारखे दैवत साऱ्या जगतामधि नाही.' त्‍यामुळे majhi aai maza adarsh (माझी आई माझा आदर्श आहे )

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.   आईचे माहात्‍म सांगाणारा हा निबंध शेअर करून तुम्‍ही आई या नावाला उच्‍च स्थान प्राप्‍त करून द्या 
.

निबंध 5 

सूर्यकिरणांच्या स्पर्शान कमळं उमलावीत तशीच मातेच्या वात्सल्य स्पर्शान बालकाची जीवनकळी उमलते. आकाशाहून अथांग अन् सागराहून विशाल असे जीवनाचे धडे ती बालकाला शिकविते. माता बालकाचे सर्वस्व आहे. पहिला स्पर्श, पहिली नजर यात बालक व माता दोघे गुंफले जातात. त्यांचं अनंत नातं सुरू होतं. जन्मानंतर संस्काराची शिदोरी माता बाळाला देते. जगात पावलो पावली येणाऱ्या संकटातून मार्ग काढण्याची, ध्येय गाठण्याची चिकाटी ती बाळाला देते .अपयशातून परत यश गाठण्याचा मार्ग ती त्याला दाखविते. मज वाटते,

आई म्हणजे विश्वातलं सर्वोच्च सुख आहे. नयनाचा दिवा व तळहाताचा पाळणा करून बालकाचे संगोपन फक्त तीच करू शकते.  तिच्या प्रेमात भेदभाव नाही. रायगडावरील 'हिरकणी बुरूज' वात्सल्यप्रेममय आईचे प्रतीक आहे. अपत्यासाठी प्रसंगी प्राणाचेही मोल द्यायला आई तयार असते. कष्ट व त्याग तिच्या रक्तातच आहे. परोपकार , त्याग, सहनशीलता, संयम, अपार माया या बळावर ती मार्गक्रमण करते. 

'आई' ही दोनच अक्षरे. 'आ' म्हणजे 'आत्मा' आणि 'ई' म्हणजे 'ईश्वर'. आत्मा आणि ईश्वर यांचा मिलाफ म्हणजे आई. मुलांना उत्तम संस्कार , उत्तम शिक्षण आणि उत्तम आरोग्य देण्यासाठी आई धडपडत असते. ती हळवी आहे, प्रसंगी वज्राहूनही कठीण आहे. गरजू, वृद्ध , दुःखी लोकांचा ती आधार आहे. बालकाचे सहस्त्र अपराध ती पोटात घालते व त्याला योग्य मार्गदर्शन करते.

काळ बदलत चालला आहे. 'चूल - मूल' या मर्यादेतून आता आई अधिक प्रगल्भ झाली आहे. ती स्वतः सुशिक्षित, सुसंस्कृत, युगंधरा झाली आहे. विज्ञान , वैद्यकीय क्षेत्रातील्या नवीन घडामोडींची ओळख तिला होत आहे. साहजिकच अधिक सुजाण माता उत्कृष्ट शिल्पकार ठरली आहे. बालकाचं मूर्तिमंत शिल्प घडविण्यात ती मग्न झाली आहे.

मुकेपणाने असंख्य काव्ये आई जगते. तिच्या अणूंचे मोल करताच येत नाही. तिला सुख - समाधान देणे हे अपत्याचे पहिले कर्तव्य आहे. जिजाऊंनी शिवबा घडविला. मातृप्रेम जपलेही शिवबांनी. जन्मदात्री व शिक्षणदात्री अशा आईची सर कोणालाच येत नाही. प्रेम , सुसंगती , मित्रत्व , मार्गदर्शन, आदर्श हे सारं आईकडूनच मिळतं.

आज या मातेला वृद्धपणी वृद्धाश्रमाचा मार्ग दाखविणारे महाभागही आहेत. जिने जन्म दिला, जिने दुनिया दिली , जिने जीवन दिले, जिने घर दिले, तिला 'बेघर' करू नका . 'न ऋण जन्मदेचे फिटे!' तिच्या दुधाची शपथ आहे प्रत्येकाला की तिच्या प्रेमाची कदर करा. या जीवनात तिचा आदर्श अवलंबून जीवनाचे मार्गक्रमण करा. निबंध 6 

जगातील सर्वात पवित्र व सर्वश्रेष्ठ नात्याला 'आई' म्हणून संबोधतात. 'आई' ह्या शब्दाला अत्यंत पवित्र शब्द म्हणून मान्यता आहे. आईची थोरवी कित्येक कवींनी आपल्या शब्दात व्यक्त केली. कित्येक लेखकांनी आईविषयी भरभरुन लिहले. आईची महती आहेच तेवढी की प्रत्येकाने आपला वेगळा अनुभव लिहावा. प्रत्येकाच्या जीवनात आईचे महत्व वेगळे आहे. प्रत्येकाच्या सुख दुःखात पहिल्यांदा आठवणारे नाते हे आईचे असते. माता,माय,जननी, जन्मदा, जन्मदात्री,मा, अशी अनेक संबोधनेआईकरिता आहेत. तिची थोरवी पुढील काही ओळींनी स्पष्ट करण्याच्या प्रयत्न मी सुद्धा करु इच्छितो.

लेकरांची छत्रछाया असणारी आईच त्यांचा कायापालट करु शकते. परिवाराचा आनंद अबाधित ठेवण्यासाठी ती दिवस रात्र झटत असते. चंदनाचे लाकूड झिजून इतरांना जसे सुगंध देते त्याचप्रमाणे आई सुद्धा स्वतः झिजून परिवाराला आनंद देत असते. स्वत:चे दु:ख बाजूला ठेवून परिवाराला आनंदी ठेवण्याचा ती प्रयत्न करते. परिवाराच्या सुखात आणि दु:खात दुःख मानणारी ती केवळ आईच असते.

वात्सल्य, प्रेम, ममता, माया आणि करुणेने भरलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आई. आई म्हणजे,
प्रेमाचा झरा , लहान थोरा ,पुरवी घरा, निरंतर। घरासाठी, घरातील सर्व सदस्यांसाठी सतत प्रेमाचा झरा सुरु ठेवणारी आई स्वत:ला हरवून कुटुंब सदस्यांची काळजी घेत असते. सर्वांच्या चुका क्षमा करणारी, इतरांचे ऐकून घेणारी आई. तिचे हृदय सागरापेक्षाही अथांग असते 

पहाटेपासून सुरु होणारी आई तुझी दिनचर्या रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवणारी आई तू कामाने थकून जातेस. परंतु कुटुंबातील सर्वांच्या गरजा भागविण्यात तू थकवा सुद्धा निमुटपणे सहन करतेस आणि या कामाच्या मोबदल्यात तुला कोणतीही अपेक्षा नसते. म्हणून हे आई,
“धन्य तुझी कृती, नि:स्वार्थी वृत्ती, जगात कीर्ती,सदासर्वदा। कर्तव्याची जाण,आरामाचे न भान ,जगी तुझा मान, युगानुयुगे।"

जगातील सर्व संपत्ती एकवटून आईच्या चरणी अर्पण केली तरी तिने केलेल्या उपकाराची परतफेड करणे शक्य नसते. कुटुंबातील सदस्यांचे प्रेम हीच आईची संपत्ती असते. घराला घरपण आणणारी, कोणतीही अपेक्षा करीत नाही.

धन संपत्तीची तीला अपेक्षा नसते, फक्त प्रेमाची तिला भूक असते। घराला मंदिर बनविणारी आई, काट्यातून नंदनवन फुलविणारी आई वात्सल्याची खाण असणारी आई तुला माझे कोटी कोटी प्रणाम!

टीप : वरील निबंध माझी आई या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते
 • beautiful marathi essay on mother

माझी आई मराठी निबंध | MAJHI AAI MARATHI NIBANDHमाझी आई मराठी निबंध  MAJHI AAI MARATHI NIBANDH 

३ टिप्पण्या:

 1. प्रत्येक पुरुषाच्या यशस्वी जीवनाची सुरवात ही आईचे त्यागाने कष्टानेच होते,मुलगा लहानाचा मोठा होतांना जी काळजी आई घेते तशी कोणीच घेत नाही.मुलांचे लग्न झाल्यावर जी काळजी आईला असते ती त्यांच्या बायकोला नसते,मुलगा किती ही म्हणत असला की आई मी आता लहान राहलो नाही,तरी आई योग्य वेळी काळजी पोटी योग्य जबाबदारी पार पाडतेच,तेव्हा मुलगा फक्त चेहऱ्यावर आनंद व्यक्त करतो,मनात कुठे चुकल्याची जाणीव ठेवतो,शेवटी आईच असते

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. धन्यवाद. तुमच्या अमूल्य प्रतिसादाकरीता आम्ही आभारी आहोत.

   हटवा
 2. मला येवढच म्हणायचे, आई ला आपण कोणत्याच शब्दात लिहु शकत नाही,
  कारण :- तिनेच आपल्या सर्वाना खुप चागल्या शब्दात लिहीलेले आहे.....

  उत्तर द्याहटवा