यंत्रे संपावर गेली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक | Yantra Sampavar Geli Tar Marathi Nibandh

यंत्रे संपावर गेली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक | Yantra Sampavar Geli Tar Marathi Nibandh आज आपण पावलोपावली यंत्रांवर अवलंबून असतो. ही यंत्रे आता आपल्या नित्य व्यवहारात एवढी एकरूप झाली आहेत की ती यंत्रे आहेत व त्यांच्याविना आपले अडेल हे आपल्याला उमगतही नाही. कळले तरी वळत नाही. मग अनेकदा आपण त्या यंत्रांना अतिशय निष्काळजीपणे वागवतो. एकदा काय झाले, ही यंत्रे रागावली आणि त्यांनी आपली संघटना स्थापन केली. या संघटनेने संपाचा आदेश दिला. एका मध्यरात्री सारी यंत्रे संपावर गेली. मग जो गोंधळ उडाला तो काय वर्णावा!

सकाळी नेहमीप्रमाणे घड्याळाने आपला गजरच केला नाही. त्यामुळे सर्वांना जाग आली ती उन्हं वर आल्यावरच. धावत धावत आई नळाजवळ गेली; पण नळातून एक थेंबही पाणी येत नव्हते. घरातला फ्रीज बंद पडला होता. रेडिओ बोलत नव्हता. पंखा फिरत नव्हता. घराबाहेर आलो तर लिफ्टही चालत नव्हती. सगळेजण हवालदिल झाले. रोज सकाळी सकाळीच वृत्तपत्रे वाचायची सवय. सवय कसली, व्यसनच म्हणा ना! पण आज त्या वृत्तपत्रांचाही पत्ता नव्हता.

रस्त्यावर एकही गाडी धावत नव्हती. बस नाही, स्कूटर नाही, साधी सायकलही नाही. रस्त्यावर फक्त दिसत होती माणसेच माणसे. सारीच गोंधळून गेलेली. हे काय आहे? असे कशामुळे झाले? जरा चौकशी करा, वृत्तपत्रांकडे विचारा. पोलिसांना कळवा. कुणीतरी कल्पना काढली . फोन करा, फोन उचलला गेला, पण त्यातून कसलाच आवाज आला नाही. फोनही बंद. आता पायी चालण्याशिवाय पर्याय नव्हता. लोक हिंडू लागले, अदमास घेऊ लागले.

yantra sampavar geli tar marathi nibandh

नेहमी यावेळी गजबजलेली स्टेशने आज शांत होती. म्हणजे माणसे जा-ये करीत होती; पण गाड्याच धावत नव्हत्या. 'पूतळ्याच्या' खेळातल्याप्रमाणे त्या जागच्या जागी उभ्या होत्या. बेकरीत ब्रेड नव्हता. मार्केटात भाजी नव्हती. शहरातील सारे जीवन विस्कळीत झाले होते. पाण्याच्या अभावामुळे लोकांच्या तोंडचे पाणी पळाले होते.
सहज एका रुग्णालयात डोकावलो, तेथे तर हाहाकार उडाला होता.

 यंत्रे थांबल्यामुळे शल्यविशारद शस्त्रक्रिया पार पाडू शकत नव्हते. त्यामुळे रोग्यांचे विलक्षण हाल होत होते. पंखे फिरत नव्हते. रक्त, सलाईन देता येत नव्हते. एका कमी वजनाच्या बाळाला दिवे लावून विशिष्ट उबेत ठेवले होते. पण तो दिवाच बंद पडला होता. त्यापेक्षा शोचनीय गोष्ट म्हणजे-एका हृदयविकाराच्या रुग्णाला कृत्रिम श्वासोच्छ्वासाचे यंत्र लावून ठेवले होते, ते यंत्र बंद पडल्याने तो रोगी गतप्राण झाला होता!  

सारे वातावरण बेचैन, अस्वस्थ होते. यंत्रविशारद यंत्रांशी झगडत होते; पण यंत्रे चालूच होत नव्हती. अशा अस्वस्थ वातावरणात दिवस तर संपला. यंत्रे चालू होत नव्हती; पण आकाशातील सहस्ररश्मीचे यंत्र मात्र व्यवस्थित चालु होते. ठरलेल्या वेळी भास्कर अस्ताचलावर गेला आणि सर्वत्र काळोख पडला. नेहमी विजेच्या दिव्यांनी झगमगणारे ते शहर! पण त्या दिव्यांनीही असहकार पुकारला होता. त्यामुळे सर्वत्र पणत्या, मेणबत्त्या तेवत होत्या. या शहरातील लोकांचे आज प्रथम लक्ष गेले ते आकाशातील चंद्राकडे व चांदण्यांकडे. पण तरीसुद्धा पृथ्वीवरचा काळोख नकोसा झाला होता. शेवटी मानवी उपाय संपल्यावर सर्वांना आठवण झाली ती दैवी उपायांची.

सर्वधर्मीय मानवांनी शहरातील मोठ्या पटांगणावर येऊन यंत्रांची क्षमा मागितली यंत्रदेवाला विनविले, “या पामरांना माफ कर आणि यंत्रांची चक्रे सुरू कर. यंत्राविना माणूस अपूर्ण आहे." यंत्रजगतात खळबळ उडाली, विचारविनिमय झाला. दिली तेवढी शिक्षा बस झाली असा विचार एकमताने ठरला आणि यंत्रांनी संप मागे घेतला. कारण अखेरीस मानवच त्यांचा जन्मदाता होता. दिवे लागले, पंखे फिरू लागले, नळांना पाणी आले, सर्वत्र आनंदीआनंद झाला.

वरील निबंध यंत्रे संपावर गेली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद