मराठी आमची मायबोली मराठी निबंध | marathi aamachi mayboli essay in marathi

मराठी आमची मायबोली मराठी निबंध | marathi aamachi mayboli essay in marathi मराठी असे आमुची मायबोली "मराठी असे आमुची मायबोली, जरी भिन्नधर्मानुयायी असू।हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू, वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी॥" अशा त-हेने आपल्या मायबोलीची गोडवी गाणारे आम्ही आज खरोखर तिचे पांग फेडीत आहोत का? 

प्रतिष्ठेच्या पोकळ व आकर्षक कल्पनांत गुरफटलेल्या आमच्या मनाला अजूनही इंग्रजीचे आकर्षण आहे. मराठी भाषिक चार सुशिक्षित माणसे एकत्र आली तर ती गप्पा मारण्यासाठी इंग्रजीला जवळ करतात. 
दीडशे वर्षांची राजकीय गुलामगिरी संपली तरी इंग्रजीची मानसिक गुलामगिरी सोडायला आम्ही तयार होत नाही.

 कारण आमच्या मायबोलीची थोरवी आजही आम्हांला उमगली नाही; तिचे सामर्थ्य आजही आम्हांला कळले नाही असेच म्हणावे लागेल.

मराठी मायबोलीविषयी लिहिताना साने गुरुजी म्हणतात, “आमच्या मराठीचे भाग्य असे आहे की, तिचा पहिलाच कवी हिमालयाएवढा मोठा महाकवी होऊन गेला. त्याच्या काव्यशक्तीला स्पर्श करणारे सामर्थ्य अजून मराठीत निर्माण झालेले नाही.' 

अशी ही ज्ञानदेवांची मराठी अमृतालाही पैजेने जिंकणारी, हिची थोरवी वर्णिताना योगवासिष्ठ म्हणते
“परिमलांमध्ये कस्तुरी। का अंबरामध्ये शंबरारी।
तैसी महाटी सुंदरी। भाषांमध्ये।" 
marathi aamachi mayboli essay in marathi

मराठी अशी भाग्यवान की तिला सदैव अनेक सुपुत्रांची सोबत लाभली. नामदेव, एकनाथ, तुकाराम अशा संतांच्या सहवासातून ती पंडितकवींच्या वाग्विलासात रमली आणि नंतर शाहिरांच्या शब्दांतून डफ-तुणतुण्याबरोबर नाचू लागली. आधुनिक काळात तर तिच्या वैभवाला आगळाच बहर आला. नव्या नव्या वाङ्मयप्रकारांनी ती सजू लागली आणि रसिकांना रमवू लागली.

या माझ्या मायबोलीवर अनेकदा अनेक आक्रमणे झाली, पण ती अशी ‘चिवट' की तिने ती सारी परतवून लावली. अग्निदिव्य केल्यावर सीतामाई जशी अधिक उजळून निघाली, त्याप्रमाणे यावनी आणि इंग्रजी भाषांच्या आक्रमणानंतर मराठी भाषा अधिक तेजस्विनी झाली. 

संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा देताना तर तिने आपला नाजूकपणा झटकून देऊन शूर, करारी भवानी देवतेचे रूप धारण केले आणि आपली अस्मिता साऱ्या भारताला दाखवून दिली. या माझ्या मायबोलीच्या सामर्थ्याविषयी आता कोणालाही संभ्रम नाही. भारत देशाच्या सीमा ओलांडून परदेशांतही तिने आपले सामर्थ्य दाखविले आहे. 

शरदाच्या चांदण्याप्रमाणे सौख्य देणारी ती नाठाळांच्या माथ्यावर काठी हाणण्यास डरणार नाही; म्हणूनच कवी कुसुमाग्रज आत्मविश्वासाने म्हणतात.
"माझ्या मराठी मातीचा। लावा ललाटास टिळा। हिच्या संगे जागतील। मायदेशातील शिळा॥" मराठी आमची मायबोली मराठी निबंध | marathi aamachi mayboli essay in marathi हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवादमराठी आमची मायबोली मराठी निबंध | marathi aamachi mayboli essay in marathi

मराठी आमची मायबोली मराठी निबंध | marathi aamachi mayboli essay in marathi

मराठी आमची मायबोली मराठी निबंध | marathi aamachi mayboli essay in marathi मराठी असे आमुची मायबोली "मराठी असे आमुची मायबोली, जरी भिन्नधर्मानुयायी असू।हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू, वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी॥" अशा त-हेने आपल्या मायबोलीची गोडवी गाणारे आम्ही आज खरोखर तिचे पांग फेडीत आहोत का? 

प्रतिष्ठेच्या पोकळ व आकर्षक कल्पनांत गुरफटलेल्या आमच्या मनाला अजूनही इंग्रजीचे आकर्षण आहे. मराठी भाषिक चार सुशिक्षित माणसे एकत्र आली तर ती गप्पा मारण्यासाठी इंग्रजीला जवळ करतात. 
दीडशे वर्षांची राजकीय गुलामगिरी संपली तरी इंग्रजीची मानसिक गुलामगिरी सोडायला आम्ही तयार होत नाही.

 कारण आमच्या मायबोलीची थोरवी आजही आम्हांला उमगली नाही; तिचे सामर्थ्य आजही आम्हांला कळले नाही असेच म्हणावे लागेल.

मराठी मायबोलीविषयी लिहिताना साने गुरुजी म्हणतात, “आमच्या मराठीचे भाग्य असे आहे की, तिचा पहिलाच कवी हिमालयाएवढा मोठा महाकवी होऊन गेला. त्याच्या काव्यशक्तीला स्पर्श करणारे सामर्थ्य अजून मराठीत निर्माण झालेले नाही.' 

अशी ही ज्ञानदेवांची मराठी अमृतालाही पैजेने जिंकणारी, हिची थोरवी वर्णिताना योगवासिष्ठ म्हणते
“परिमलांमध्ये कस्तुरी। का अंबरामध्ये शंबरारी।
तैसी महाटी सुंदरी। भाषांमध्ये।" 
marathi aamachi mayboli essay in marathi
marathi aamachi mayboli essay in marathi

मराठी अशी भाग्यवान की तिला सदैव अनेक सुपुत्रांची सोबत लाभली. नामदेव, एकनाथ, तुकाराम अशा संतांच्या सहवासातून ती पंडितकवींच्या वाग्विलासात रमली आणि नंतर शाहिरांच्या शब्दांतून डफ-तुणतुण्याबरोबर नाचू लागली. आधुनिक काळात तर तिच्या वैभवाला आगळाच बहर आला. नव्या नव्या वाङ्मयप्रकारांनी ती सजू लागली आणि रसिकांना रमवू लागली.

या माझ्या मायबोलीवर अनेकदा अनेक आक्रमणे झाली, पण ती अशी ‘चिवट' की तिने ती सारी परतवून लावली. अग्निदिव्य केल्यावर सीतामाई जशी अधिक उजळून निघाली, त्याप्रमाणे यावनी आणि इंग्रजी भाषांच्या आक्रमणानंतर मराठी भाषा अधिक तेजस्विनी झाली. 

संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा देताना तर तिने आपला नाजूकपणा झटकून देऊन शूर, करारी भवानी देवतेचे रूप धारण केले आणि आपली अस्मिता साऱ्या भारताला दाखवून दिली. या माझ्या मायबोलीच्या सामर्थ्याविषयी आता कोणालाही संभ्रम नाही. भारत देशाच्या सीमा ओलांडून परदेशांतही तिने आपले सामर्थ्य दाखविले आहे. 

शरदाच्या चांदण्याप्रमाणे सौख्य देणारी ती नाठाळांच्या माथ्यावर काठी हाणण्यास डरणार नाही; म्हणूनच कवी कुसुमाग्रज आत्मविश्वासाने म्हणतात.
"माझ्या मराठी मातीचा। लावा ललाटास टिळा। हिच्या संगे जागतील। मायदेशातील शिळा॥" मराठी आमची मायबोली मराठी निबंध | marathi aamachi mayboli essay in marathi हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवादNo comments