दूरचित्रवाणी शाप की वरदान? मराठी निबंध | Television A Bane Or Boon Essay In Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण दूरचित्रवाणी शाप की वरदान? मराठी निबंध बघणार  आहोत.  कोणत्यारही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचे वाईट परीणाम दिसण्यास सुरूवात होतात, दूरचित्रवाणी शाप ठरू शकेल अश्या प्रसंगाचे वर्णन या निबंधात केले आहे आणि दूरचित्रवाणी वरदान ठरण्यापसाठी काय केले पाहीजे  याबद्दल माहीती दिली आहे चला तर सुरूवात करूया निबंधाला. 

दूरचित्रवाणीचा प्रसार मुख्यतः शहरांतून मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. तरीही काहीजणांना दूरचित्रवाणी हा शाप वाटू लागला आहे. असे का बरे?

दूरचित्रवाणीच्या प्रलोभनातून काही धोके जरूर संभवतात. शहरात जागेची समस्या फारच बिकट असल्याने, विशेषत: चाळीतील व झोपडपट्टीतील लोक दूरदर्शनवरील कार्यक्रम अगदी जवळून पाहत असल्यामुळे, त्याचा त्यांच्या दृष्टीवर वाईट परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. कार्यक्रम पाहण्यासाठी लहान जागेत खूप माणसे तासन्तास बसतात, हेही आरोग्याच्या दृष्टीने विघातक आहे. टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या विविध वाहिन्यांवरील चित्रपटांमुळे मुले क्रीडांगणाला दुरावली, ग्रंथवाचनाला पारखी झाली. टीव्हीवर कार्यक्रम पाहताना कुणी पाहुणे आले, तर त्यांचे यथोचित स्वागत होत नाही.

दूरचित्रवाणीवरील बहुसंख्य कार्यक्रम हे चित्रपटांवर आधारित असतात. त्यामुळे युवावर्ग त्या आभासामागे धावतो व वास्तवाला पार विसरून जातो. विविध कार्यक्रमांतून जाहीर केलेली मोठमोठ्या किमतीची बक्षिसेही त्याला स्वप्ननगरीत नेतात आणि प्रामाणिक प्रयत्नांचे व कष्टांचे महत्त्व त्याला वाटेनासे होते.

वास्तविक पाहता दूरचित्रवाणी हे ज्ञानप्रसाराचे प्रभावी माध्यम आहे. खेड्यांतील शेतकऱ्याला, मजुराला त्यांच्या विविध उपयुक्त अशा व्यवसायांचे ज्ञान देता येईल, आज आपल्यापुढे प्रौढ शिक्षणाचा यक्षप्रश्न उभा आहे. हा प्रश्न सोडवण्यास दूरचित्रवाणीची मोलाची मदत होईल. ज्ञानप्राप्तीत केवळ ऐकण्‍यापेक्षा , पाहणे व ऐकणे अधिक परिणामकारक ठरते. 'दूरदर्शन'मध्ये तर पाहणे व ऐकणे दोहोंचाही समन्वय आहे. या साधनांच्या मदतीने साऱ्या जगाचा फेरफटका आपल्याला घरबसल्या करता येतो.

तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, परराष्ट्रीय नेत्यांच्या भेटीच्या घटना, जगात चाललेल्या विविध खेळांच्या स्पर्धा या सर्व गोष्टींचा लाभ आपल्याला दूरचित्रवाणीमुळे घरी आरामात बसून घेता येतो. हजारो वर्षांपूर्वी लिहिले गेलेले रामायण, महाभारत हे ग्रंथ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले ते दूरचित्रवाणीमुळेच ना!

अशा या दूरचित्रवाणीला शाप समजून दूर लोटणे योग्य होणार नाही. मात्र दूरचित्रवाणीचे कोणते कार्यक्रम पाहायचे याबददल कुटुंबातील वडीलधाऱ्या माणसांनी तारतम्याने विचार करणे आवश्यक आहे. अभ्यासाला पूरक ठरणारे कार्यक्रम विदयार्थ्यांनी अवश्य पाहावेत.

'आधी अभ्यास, मग मनोरंजन' हे पथ्य मात्र दूरदर्शनवरील इतर कार्यक्रमांच्या बाबतीत अवश्य पाळावे. असे झाल्यास दूरदर्शन आपल्याला मोठे वरदानच ठरणार आहे, यात शंका नाही.

Television A Bane Or Boon Essay In Marathi

मित्रांनो तुम्हाला दूरचित्रवाणी शाप की वरदान? मराठी निबंध | Television A Bane Or Boon Essay In Marathi कसा वाटला हे कमेंट करून कळवा.  भारताला प्रगतीशील समृध्द  राष्‍ट्र बनविण्यातसाठी व दूरचित्रवाणीच्या वापराबद्दल जनजागृती होण्याासाठी हा निबंध आपल्या मित्र परीवारा सोबत शेअर करा . धन्यवाद 

Nibandh 2 

"अग नीता, तू आहेस तरी कोठे?" नीताच्या आईच्या शब्दांत संताप अगदी ओथंबला होता. “अग, उदया तुझी परीक्षा आणि तू बसली आहेस टी. व्ही. वरचा चित्रपट पाहत." पहिली पाच मिनिटे नीताने लक्ष दिले नाही, पण आईचा सूर चढला, तेव्हा नीता त्या गर्दीतून उठली, मोठ्या नाखुषीनेच. कारण तिच्या आवडत्या नटनट्यांचा चित्रपट चालू होता. नीताच्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून नीताच्या बाबांनी दूरचित्रवाणी  आणण्याचे टाळले; पण नीता शेजारीपाजारी जाऊन टी. व्ही. पाहतेच.

  आता हे दुसरा प्रसंग  पाहा. टी. व्ही. वर काहीतरी रंगतदार कार्यक्रम चालला आहे. आईबाबा त्यात रंगले आहेत; तरी घरातील बाबांच्या शिस्तीमुळे मोहन व मुग्धा आपल्या खोलीत अभ्यास करीत आहेत. सातव्या इयत्तेतील मोहनला नफ्यातोट्याचे गणित अडले. खूप प्रयत्न करूनही सुटेना तेव्हा तो वही-पुस्तक घेऊन आईकडे गेला आणि ते उदाहरण सोडवून देण्यासाठी विनवणी करू लागला. “थांब रे बाबा, आता मध्येच नको तुझी कटकट,” टी. व्ही. पाहणाऱ्या आईसाहेब कडाडल्या. मोहन हिरमुसल्या तोंडाने खोलीत परतला. पण त्याचे अभ्यासात लक्ष लागेना. या प्रसंगांतील नीताच्या आईला व छोट्या मोहनला दूरचित्रवाणी ही नक्कीच शाप वाटेल.

दूरचित्रवाणीची लोकप्रियता ही आपल्या देशात वाढतच  आहे,  पण आजही तिचा संचार  मोठमोठ्या शहरांतूनच आहे. अदयापिही ती खेडोपाडी पोहोचली नाही तोच काहीजणांना दूरचित्रवाणी हा शाप वाटू लागला आहे. तिचे तोटेच अधिक भासू लागले आहेत. दूरचित्रवाणीच्या आकर्षणातून काही धोके संभवतात. आजकाल त्याची चर्चा वृत्तपत्रांतून होत असते. मुंबईसारख्या ठिकाणी अनेक लहानसहान खोल्यात T.V. ठेवतात व कमी अंतरावरून  चित्र पाहिले जाते. त्याचा दृष्टीवर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. हा परिणाम काही वर्षांनी लक्षात येईल. दुसरी गोष्ट अशी की, लहान जागेत खूप माणसे तासन् तास बसतात हेही आरोग्याच्या दृष्टीने विघातकच आहे.

शनिवारी, रविवारी टी. व्ही. वर दाखविल्या जाणाऱ्या चित्रपटांमुळे मुले क्रीडांगण विसरली. टी. व्ही. वर कार्यक्रम पाहताना कुणी पाहणे आले तर त्यांचे यथोचित स्वागत होत नाही. मित्रमंडळींशी मोकळ्या गप्पा मारण्याऐवजी बहुसंख्य लोक टी. व्ही. वर नजर लावून बसतात. ज्यांच्याकडे टी. व्ही. संच असतो त्यांना कार्यक्रम पाहावयास येणाऱ्यांकडून विविध त-हेचे त्रास होतात. दूरचित्रवाणी ही ज्ञान व मनोरंजन या दोन्ही उद्दिष्टांसाठी काम करीत असते; पण आज लक्षात घेतला जातो तो भाग केवळ मनोरंजनाचा. त्यामुळे आज अनेकांना दूरचित्रवाणी शाप वाटते. काहींच्या मते दूरचित्रवाणीमुळे समाजातील आर्थिक विषमतेची दरी फार मोठी झाली आहे.

ठराविक रंगाचा चष्मा लावून पाहणाऱ्यांना सर्व वस्तू त्याच रंगाच्या दिसणार. त्यामुळे दूरचित्रवाणीचे तोटे उगाळणाऱ्यांना तोटेच दिसणार. खरं पाहता दूरचित्रवाणी हे ज्ञानप्रसाराचे प्रभावी साधन आहे. त्यासाठी दूरचित्रवाणी अगदी खेडोपाडी जाऊन पोहोचली पाहिजे. किंबहुना तिची तेथेच अधिक गरज आहे. खेड्यातील शेतकऱ्याला, मजूराला ती विविध क्षेत्रांतील ज्ञान देईल आज आपल्यापुढे प्रौढ शिक्षणाचा फार मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न सोडविण्यास दूरचित्रवाणीची फार मोठी मदत होईल. 

ज्ञानप्राप्तीत ऐकण्‍यापेक्षा पाहण्‍याचा मोठा वाटा असतो. केवळ ऐकण्यापेक्षा जे आपण पाहतो ते आपल्या स्मरणात अधिक राहते; अनेक कलावंतांना आपण पूर्वी फक्त चित्रपटांतून पाहत होतो; त्यांना आता आपण प्रत्यक्ष मुलाखतीत पाहू शकतो. साऱ्या जगाचा फेरफटका आपल्याला घरबसल्या करता येतो. विदयार्थ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, परराष्ट्रीय नेत्यांच्या भेटीच्या घटना, जगात चाललेल्या विविध त हेच्या खेळांतील स्पर्धा या सर्व गोष्टींचा लाभ आपल्याला दूरचित्रवाणीमुळे साधता येतो. पण त्यासाठी योग्य नियोजन मात्र हवे. 

उलट विदयार्थ्यांपुढे पालकांनी असा दंडकच ठेवावा की अभ्यास पूर्ण झाला तरच चित्रपट पाहावयास मिळेल. आपल्याबरोबर आपल्या घरातील चाकरमाणसे, शेजारची गरीब माणसे यांना दूरचित्रवाणी पाहावयास सहभागी केले तर आर्थिक विषमतेमुळे निर्माण होणारी दरी थोडी कमी होईल.

Nibandh 3

दूरदर्शन (टी. व्ही.): शाप की वरदान? 

अंध धृतराष्ट्राजवळ बसून युद्धभूमीवरील घडामोडी पाहण्याची 'दिव्यदृष्टी' एकट्या संजयला होती. परंतु स्थलकालाचे बुरूज फोडून जगातील कोणतीही गोष्ट, घडामोडी घरबसल्या दाखविण्याची जादू दूरदर्शनने केली आहे. जॉन लॉग बायर्डने दूरदर्शनचा शोध लावून सर्व जग आपल्या छोट्या खोलीत आणले. दूरदर्शनचा शोध अमेरिकेत १९२६ साली जरी लागला असला तरी प्रत्यक्ष भारतात यायला त्याला १९५८ साल उजाडले व रंगीत रूप धारण करायला १९८२ साल.

 सध्या एकंदरीत दूरदर्शनवर (T.V.) 200 पेक्षा जास्त चॅनल्स सुरू झाले आहेत. या 'इडियट बॉक्स'नं खरोखरच सर्वांना वेडं केलं आहे.मुक्त व्यापारी धोरणाचा परिणाम दूरदर्शनवर निखळ, शुद्ध मनोरंजनाचे, सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम दाखविण्याऐवजी हिंसा, विकृती यांचे दर्शन मोठ्या प्रमाणात घडविणारे कार्यक्रमच जास्त दिसू लागले आहेत. त्यामुळे तरुणांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये दूरदर्शनविषयी जबरदस्त आकर्षण निर्माण झालं आहे. त्यामुळे पालक, शिक्षक, समाजसेवक यांना दूरदर्शनच्या दूरगामी होणाऱ्या दुष्परिणामांची भीती वाटू लागली आहे.

 मुले अभ्यास करत नाहीत, बाहेर खेळायला जात नाहीत, खात नाहीत, त्यांचे डोळे बिघडले, इत्यादी तक्रारी तर ऐकायला मिळतातच, परंतु दूरदर्शनवरील कार्यक्रमातून पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण पाहिल्यावर भारतीय संस्कृती' नष्ट होईल की काय, या विचाराने सुशिक्षित लोक धास्तावले आहेत. त्यामुळे उत्तम शैक्षणिक मूल्यं असलेलं हे दृक्श्राव्य साधन ‘शाप' वाटू लागलं आहे.

दूरदर्शनवर ज्ञान व माहिती देणारे कार्यक्रम असतात.  दूरदर्शनवर बालांसाठी, प्रौढांसाठी तसेच युवकांसाठी, महिलांसाठी व ग्रामीण भागातील लोकांसाठी खास कार्यक्रम असतात. दिवसभर कष्ट करून आल्यावर 'दूरदर्शन' म्हणजे एक "दिलासा'च वाटतो.

 परंतु या दूरदर्शनचे नकळत वाईट परिणाम झाले. 'रामायण' टी. व्ही.वर लागायचं त्या काळात आजारी माणसाला 'रिक्षा' किंवा 'टॅक्सी'ही मिळायची नाही. किंवा टी. व्ही.वर चांगला कार्यक्रम लागला असला, की आलेल्या पाहुण्यांशी बोलायलाही लोक तयार नसतात. टी. व्ही.मुळे प्रौढांचे व मुलांचे वाचन कमी झाले. मुलांचा संध्याकाळचा खेळ व प्रौढांचे सायंकाळचे फिरणे बंद झाले. 

ध्वनिप्रदुषण वाढले. केबल टी. व्ही. तर पालकांना डोकेदुखी वाटू लागली. मुलांची मित्रमंडळी कमी झाली. बुद्धिबळासारखे खेळ खेळण्यास पार्टनर मिळू शकत नाही, अशा तक्रारी ऐकू येऊ लागल्या. डोळ्यांवर वाईट परिणाम झाले. एवढेच काय, एखादा दिवस टी. व्ही. बंद ठेवला तर घरात करमत नाही.

वातावरण उदास होते. या झालेल्या सर्व दुष्परिणामांना स्वीकारूनही असं म्हणावं लागेल, की गेल्या तीस वर्षांत टी. व्ही.ने फार मोठी सामाजिक, शैक्षणिक कामगिरी बजावली आहे. टी. व्ही.मुळे अभ्यास होत नाही,' ही गोष्ट तितकीशी खरी नाही. कारण गुणवत्ता यादीत आलेल्या मुलांनीही आम्ही टी. व्ही. बघत होतो,' असे मुलाखतीत स्पष्ट सांगितले आहे. 

टी. व्ही.मुळे अंधश्रद्धा कमी झाल्या. वैज्ञानिक दृष्टिकोण निर्माण झाला. कुटुंबनियोजनाचा सोपा उपाय जनतेला समजला. बालकांच्या आरोग्याचे रक्षण होऊ लागले. पॉझिटिव्ह हेल्थ शो' व 'योगा' या कार्यक्रमामुळे आरोग्यविषयक जाणीव निर्माण झाली. 

टी. व्ही.वरील बातम्या व इतर क्रीडा-विषयक सामने पाहून आंतरराष्ट्रीय खेळाडू लोक पाहू शकले. भौगोलिक ज्ञान व सामान्य ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या. एवढी महान कामगिरी टी. व्ही.द्वारे होत असताना टी. व्ही.ला 'शाप' म्हणणे बरोबर होईल का?

टी. व्ही.चे वाईट परिणाम टाळायचे असतील तर पालकांनी, कुटुंबप्रमुखांनी कंबर कसली पाहिजे. टी. व्ही.वरील कार्यक्रमांची निवड केली पाहिजे. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाचे वेळापत्रक बनवून दिले पाहिजे. त्यात टी. व्ही. पहाण्यासाठी वेळ ठेवला पाहिजे. 'बातम्या,  वर्ल्ड धिस वीक'सारखे कार्यक्रम मुलांसमवेत आपण पाहिले पाहिजेत. 

शैक्षणिक कार्यक्रमांबद्दल मुलांमध्ये आवड निर्माण केली पाहिजे.  एखाददुसरी चांगली सिरियलही आवर्जुन मुलांसह पाहावी. परंतु टी. व्ही.वरचे सर्व कार्यक्रम आपण पाहिलेच पाहिजेत, नाहीतर ते कार्यक्रम फुकट जातील असा गैरसमज करून घेऊ नये. 

काय पहावे? किती पहावे? केव्हा पहावे? यांचे भान ठेवल्यस टी. व्ही. देवदूत वाटेल. टी. व्ही.चा उपयोग फक्त मनोरंजनासाठी केल्यास जीवन विलासी बनते. दिवास्वप्न पहाणे, कल्पनाविश्वात रमणे, वास्तवतेला सामोरं जाण्याची असमर्थता निर्माण होणे हे दोष निर्माण होऊ शकतात. त्यामुळे टी. व्ही.वरील सर्वच कार्यक्रम पहाणे हिताचे नाही याची जाणीव पालकांना हवी व ती त्यांनी मुलांमध्ये निर्माण केली तर भावी पिढी प्रक्षोभक, हिंसाचारी, भोगवादी, विलासी न होता सदाचारी, ज्ञानी, देशाबद्दल व मानवतेबद्दल प्रेम बाळगणारी, राष्ट्रीय एकात्मता जपणारी, वैज्ञानिक दृष्टिकोण बाळगणारी एक सुजाण पिढी निर्माण होईल. मग दूरदर्शन एक वरदान किंवा देवदूत वाटेल!