महात्मा ज्योतिबांं फुले मराठी निबंध | Mahatma jyotiba phule essay in marathi

निबंध 1

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण महात्मा ज्योतिबांं फुले मराठी निबंध  बघणार आहोतचला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

थोर क्रांतिकारक विचारवंत व आदयसुधारक महात्मा  ज्योतिबा  फुले यांचा जन्म पुणे येथे १८२७ साली झाला. त्यांनीच महाराष्ट्रात सुधारणेची पुरोगामी परंपरा सुरू केली. वर्तमानात आपल्या भोवताली समाजात आढळणाऱ्या उणिवा, दोष, त्रुटी पाहून भविष्यात त्यावर मात करण्यासाठी मार्ग शोधून काढणारा आणि त्या मार्गावर अगदी एकाकी पण बेधडकपणे वाटचाल करणाराच खरा समाजसेवक, समाजहितचिंतक बनू शकतो. 

याचा प्रत्यय महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनचरित्रातून येतो. नवव्या वर्षी वैधव्य आल्यामुळे वपन करून विद्रूप करण्यात आलेल्या गुरुकन्येला पाहून ज्योतिबांंच्या  मनाला धक्का बसला. या आपल्या भगिनीसाठी काहीतरी करायलाच हवे हे त्यांच्या मनाने घेतले. असे  कृत्य करायला 'धर्माची आज्ञा' हे एकटेच कारण असते, हे त्‍यांच्‍या गुरूंच्या तोंडून प्रत्‍यक्ष ऐकल्‍यावर, तेव्‍हा त्‍यांनी आपल्या धर्माविषयी सत्यशोधन करायचेच असा पक्‍का निर्णय त्‍यांनी तरूण वयात घेतला. 

Mahatma jyotiba phule essay in marathi
Mahatma jyotiba phule essay in marathi

पुण्यात बुधवारवाड्यात पुण्याचे कलेक्टर रॉबर्टसन यांनी शाळा काढली होती. जोतिबा त्या शाळेत जाऊ लागले. तेव्हा त्यांच्या वडिलांचा गोविंदराव फुले यांचा ज्योतिबांंच्या शिक्षणाला सहमत नव्‍हते. ज्योतिबांंनी इंग्रजीबरोबरच संस्कृतचेही अध्ययन केले. त्यांचे विचार हे सुरुवातीला बंडखोरीचे होते.

त्यांनाही इतरांप्रमाणे इंग्रजांशी लढण्यासाठी शस्त्रविदया शिकावी असे वाटत होते, पण त्याच वेळी आपल्या समाजातील जातिभेद, अज्ञान आणि स्त्रियांच्या वाट्याला येणारी दुर्दशा त्यांना अस्वस्थ करत होती. त्यांनी इतर धर्मांचा तौलनिक अभ्यास केला. त्यांपैकी ख्रिस्ती धर्मातील माणुसकीची वागणूक, सेवा, समानता या गोष्टींचे त्यांना विशेष आकर्षण वाटले. येथेच ज्योतिबांंना आपल्या कार्याचा मार्ग सापडला आणि तो कृतीत आणण्यास त्यांनी सुरुवात केली.समाजातील  विशेषतः स्त्रियांमधील  अज्ञान दूर करण्यासाठी त्यांनी जोगेश्वरीच्या बोळातील चिपळूणकरांच्या वाड्यात १८४८ साली पहिली मुलींची शाळा काढली. मुलींना शिकवण्यासाठी स्त्री शिक्षिका म्हणून त्यांनी आपल्या पत्नीला  सावित्रीबाईंना  तयार केले. स्त्रीशिक्षणाच्या आग्रही प्रयत्नामुळे समाजाचा प्रचंड रोष या पतिपत्नीला सहन करावा लागला. ज्योतिबांंच्या वडिलांनी ज्योतिबांंना व सावित्रीबाईंना घराबाहेर काढले.

 नंतर ज्योतिबांंनी मीठगंज भागात १८५१ साली दलित वस्तीत मुलींसाठी शाळा काढली. मागासलेल्यांना सुधारायचे तर त्यांच्यामध्येच जाऊन राहिले पाहिजे, म्हणून त्यांनी आपले घर बदलले. दलितांना पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून आपल्या घरातील हौद सर्वांना खुला केला. समाजातील उच्चवर्णीयांतील स्त्रियांवर होणारे अत्याचार पाहून या अभागी स्त्रियांसाठी त्यांनी १८६३ साली 'बालहत्याप्रतिबंधक गृह' सुरू करून अशा स्त्रियांना आश्रय दिला.ज्योतिबांं हे कर्ते सुधारक होते. अशाच एका अडलेल्या स्त्रीला आश्रय देऊन तिच्या मुलाला ज्योतिबांंनी दत्तक .   घेऊन सांभाळ केला ते निर्भय वृत्तीचे होते. त्‍यामुळे आलेल्‍या संकटाना त्‍यांनी मोठ्या धैर्याने तोंड दिले. शेतकऱ्याच्या पोशाखात ते 'ड्युक ऑफ कॅनॉट' यांच्या भेटीला गेले. शेतकऱ्यांच्या अडचणी, शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी समजावून घेतले होते व त्याबाबतची त्यांची परखड मते त्यांच्या शेतकऱ्याचा असूड' (१८८३) या पुस्तकात व्यक्त झाली आहेत.

अनिष्ट रूढी-परंपरांविरुद्ध आयुष्यभर ते झगडत राहिले, त्यासाठी त्यांनी १८७३ साली 'सत्यशोधक समाज' स्थापन केला. हजारो अनुयायी घडवले. विदया, सत्य आणि सत्शील यांचाच सदैव आग्रह धरला. म्हणूनच जनतेने स्वयंस्फूर्तीने त्यांना 'महात्मा' म्हणून गौरविले. जोतिबा फुले यांनी समाजाला सत्य आणि समता या तत्त्वांचा सक्रिय संदेश दिला व २७ नोव्हेंबर १८८९ साली त्यांच्या लाडक्या जनतेचा त्यांनी निरोप घेतला. ज्योतिबांं गेले, पण त्यांच्या महान कार्याने ते अमर झाले.

  महत्‍वाचे मुद्दे : 

  • समाजातील त्रुटी जाणून त्यावर मात करण्याचा निर्धार
  • सर्व धर्माचा तौलनिक अभ्यास
  • इंग्रजीचे अध्ययन
  • मुलींसाठी शाळा
  • पीडित महिलांना आश्रय
  • निर्भयता
  • प्रत्यक्ष कृतीने विरोध
  • सत्यशोधक समाजाची स्थापना
  • सत्य व समता हा संदेश दिला
  • सतत समाजाचाच विचार केला.

  निबंध 2  महात्मा ज्योतिबा फुले हे उच्चकोटीचे मानवतावादी समाजसुधारक होते. संपूर्ण आयुष्यभर त्यांनी केवळ मानवाच्या हिताचा विचार केला. जीवनात सत्याचा मूलमंत्र    काया-वाचा-मने जपणाऱ्या, ज्योतिबांंचा जन्म १८२७ साली  गोऱ्हे  यांच्या घरात झाला. बालवयातच आईच्या मायेचे छत्र हरपलेल्या जोती नावाच्या बालकाला गोविंदराव फुले यांनी मोठ्या प्रेमाने वाढवले.

  शाळेत घातले. त्‍‍‍‍यांंना इंग्रजी शिक्षणाचे वेध लागले होते. मार्गात अनंत अडचणी आल्या, तरीही त्‍‍‍‍यांंनी इंग्रजी शालान्त शिक्षण पूर्ण केले.  ज्ञान ही एक शक्ती आहे,' अशी ठाम श्रद्धा बाळगणाऱ्या ज्योतिबांंनी आपल्या यासंबंधीच्या विचारांचा सारांश सूत्रबद्ध पद्धतीने असा सांगितला आहे -

  "विदयेविना मति गेली। मतीविना नीति गेली।। नीतिविना गति गेली। गतीविना वित्त गेले।। इतके अनर्थ एका अविदयेने केले." जोतिबा फुले हे 'कर्ते सुधारक' होते. समाजातील शूद्र, अतिशूद्र, शेतकरी आणि स्त्रिया यांना दास्यातून मुक्त करायच्या हेतूने प्रेरित होऊन ज्योतिबांंनी पत्नीला सावित्रीबाईंना सुशिक्षित केले आणि त्यांच्याकडे विदयार्थिनींच्या अध्यापनाचे काम सोपवले. ज्योतिबांं व सावित्रीबाई यांचे ज्ञानदानाचे हे सत्र अविरत चालू राहिले.

  त्या काळी हिंदूंच्या उच्च जातींमध्ये विधवेचा पुनर्विवाह निषिद्ध मानला जात होता. वपन न केलेली विधवा ही अपवित्र स्त्री मानली जात असे. विधवांच्या केशवपनाची ही अमानुष चाल बंद व्हावी, म्हणून जोतिबांनी चळवळ उभी केली. बालहत्याप्रतिबंधकगृहाची स्थापना केली. स्त्रियांप्रमाणे अस्पृश्यांसाठीही जोतिबांनी बहुमोल सेवाकार्य केले.

  सार्वजनिक पाणवठ्यावरही दलितांचे पाण्यासाठी होणारे हाल पाहून त्यांनी त्यांच्यासाठी आपल्या घरचा पाण्याचा हौद खुला केला. १८७३ मध्ये फुले यांनी 'सत्यशोधक समाजा'ची स्थापना केली. सर्व धर्मांचे व जातींचे नागरिक या सत्यशोधक समाजाचे सदस्य व्हावेत, अशी त्यांनी योजना केली होती.

  जोतिबा फुले यांनी मौलिक विचारप्रवर्तक पुस्तके लिहिली. समाजातील पीडित श्रमिकांच्या विदारक आर्थिक स्थितीचा ज्योतिबांंनी बारकाईने अभ्यास केला आणि त्याचे उत्कृष्ट चित्र त्यांनी आपल्या 'शेतकऱ्याचा असूड' या पुस्तिकेत रेखाटले आहे. शेतकऱ्यांची स्थिती बदलण्‍यासाठी  चांगले उपाय या  लेखांतून सांगीतले  आहेत. १०० वर्षांपूवी लिहिलेले हे मौलिक विचार आजच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बऱ्याच प्रमाणात लागू पडतात.

  ज्योतिबांंनी आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण समाजासाठी वेचला आणि म्हणूनच लोकांनी त्यांना 'महात्मा' असे यथार्थपणे गौरवले.
  महत्‍वाचे मुद्दे : 

  • एक थोर समाजसेवक 
  • जन्म 
  • शिक्षण 
  • महात्मा फुले समाजसेवकांचे अग्रणी
  • परंपराग्रस्त समाजाला जागृत करण्याचे जोतिबांचे प्रयत्न
  • 'आधी केले मग सांगितले' या उक्तीप्रमाणे फुले यांचे आचरण
  • स्त्री-शिक्षणाला प्राधान्य 
  • मुलींसाठी शाळा 
  • मनुस्मृतीवर घणाघाती हल्ला 
  • शेतकऱ्यांबद्दल कळकळ
  • त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न 
  • खेडे हा त्यांच्या सुधारणावादाचा केंद्रबिंदू 
  • शिक्षणाला प्राधान्य 
  • शिक्षण हे समाजसुधारणेचे प्रवेशद्वार
  • फुले यांचे समग्र विचार  निबंध 3

  मराठी मातीनं ज्या असंख्य समाजसुधारकांना जन्म दिला, त्यांपैकी महात्मा जोतिराव फुले यांचं नाव सुवर्णाक्षरात कोरावं लागेल. आज दलित, मागासवर्गीय व स्त्रिया यांच्या उन्नतीसाठी शासनाकडून क्रांतिकारक पाउलं टाकली जात आहेत. परंतु याची मुहूर्तमेढ १९ व्या शतकातच आपल्या महाराष्ट्रात  समाजसुधारक जोतिरावांनी रोवली होती.

  वर्णव्यवस्थेचा पगडा असलेल्या तत्कालीन समाजात जोतिरावांनी एका मागासवर्गीय कुटुंबात जन्म घेतला. सातारा जिल्ह्यातल्या 'कटगुण'गावी १८२७ साली !विद्येचं वारंसुद्धा न लागलेल्या कुटुंबात जन्मल्यामुळे जोतिबांना शिकण्यासाठी धडपडावं लागलं. म्हणून की काय सर्वांगीण सुधारणेचे प्रवेशद्वार असलेल्या शिक्षणाची गंगा समाजाच्या सर्व थरांत नेण्याची जिद त्यांनी अंगी धरली. मुलींसाठी शाळा काढण्याचं सर्वप्रथम धाडस जोतिबांनी केले... त्यासाठी स्वतः - बेघर' झाले. त्यांच्या पत्नी सावित्रीबाईनी त्यांना साथ दिली. 

  निराधार बाल-विधवांचे जोतिबा कैवारी बनले. एवढंच नाही तर त्यांनी विधवा-विवाह घडवून आणले. मानवतेला काळिमा फासणारी विधवांच्या केशवपनाची पद्धत बंद करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अस्पृश्यतेच्या रूपानं समाजाला लागलेला कलंक धुऊन काढण्यासाठी स्वत:च्या घरातील हौद जोतिबांनी अस्पृश्यांना खुला केला. सत्य व समता यावर आधारित न्याय व हक्कांसाठी जोतिबांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी 'सत्यशोधक समाजा'ची स्थापना केली.

  मानवता म्हणजे माणुसकी ! माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे म्हणजेच मानवताधर्म ! ह्या मानवताधर्माच्या शिकवणीची संजीवनी अमानवी रूढींच्या शंखलांनी जखडलेल्या समाजास जोतिबांनी प्रथम दिली. या कामी त्यांनी उभं आयुष्य वेचलं. त्याची मधुर फळं आज समाजाला चाखायला मिळत आहेत.
  मागासवर्गीयांना समाजात ताठ मानेनं जगता येतंय, स्त्री अबला राहिली नसून सबला बनली आहे, अस्पृश्यता नष्ट झाली आहे...

  पण या सुधारणा घडवण्यात जोतिबांना सिंहाचा वाटा द्यावा लागेल. मानवतेच्या ह्या थोर उपासकानं जणू- . । 'सर्वेऽपि सुखिनः सन्तु । सर्वे सन्तु निरामयाः ॥' या अर्थाच ज्ञानदेवांचं पसायदान वास्तवात आणण्यासाठी आपलं जीवन खर्ची घातलं.

  म्हणून आज म्हणावंसं वाटतं, या सुधारणांचं नेत्रसुख अनुभवण्यासाठी.. आनंदोत्सव साजरा करण्यासाठी...जोतिबा, तुम्ही आज हवे होतात !...

  महात्मा ज्योतिबांं फुले मराठी निबंध | Mahatma jyotiba phule essay in marathi

  महात्मा ज्योतिबांं फुले मराठी निबंध | Mahatma jyotiba phule essay in marathi

  निबंध 1

  नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण महात्मा ज्योतिबांं फुले मराठी निबंध  बघणार आहोतचला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

  थोर क्रांतिकारक विचारवंत व आदयसुधारक महात्मा  ज्योतिबा  फुले यांचा जन्म पुणे येथे १८२७ साली झाला. त्यांनीच महाराष्ट्रात सुधारणेची पुरोगामी परंपरा सुरू केली. वर्तमानात आपल्या भोवताली समाजात आढळणाऱ्या उणिवा, दोष, त्रुटी पाहून भविष्यात त्यावर मात करण्यासाठी मार्ग शोधून काढणारा आणि त्या मार्गावर अगदी एकाकी पण बेधडकपणे वाटचाल करणाराच खरा समाजसेवक, समाजहितचिंतक बनू शकतो. 

  याचा प्रत्यय महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनचरित्रातून येतो. नवव्या वर्षी वैधव्य आल्यामुळे वपन करून विद्रूप करण्यात आलेल्या गुरुकन्येला पाहून ज्योतिबांंच्या  मनाला धक्का बसला. या आपल्या भगिनीसाठी काहीतरी करायलाच हवे हे त्यांच्या मनाने घेतले. असे  कृत्य करायला 'धर्माची आज्ञा' हे एकटेच कारण असते, हे त्‍यांच्‍या गुरूंच्या तोंडून प्रत्‍यक्ष ऐकल्‍यावर, तेव्‍हा त्‍यांनी आपल्या धर्माविषयी सत्यशोधन करायचेच असा पक्‍का निर्णय त्‍यांनी तरूण वयात घेतला. 

  Mahatma jyotiba phule essay in marathi
  Mahatma jyotiba phule essay in marathi

  पुण्यात बुधवारवाड्यात पुण्याचे कलेक्टर रॉबर्टसन यांनी शाळा काढली होती. जोतिबा त्या शाळेत जाऊ लागले. तेव्हा त्यांच्या वडिलांचा गोविंदराव फुले यांचा ज्योतिबांंच्या शिक्षणाला सहमत नव्‍हते. ज्योतिबांंनी इंग्रजीबरोबरच संस्कृतचेही अध्ययन केले. त्यांचे विचार हे सुरुवातीला बंडखोरीचे होते.

  त्यांनाही इतरांप्रमाणे इंग्रजांशी लढण्यासाठी शस्त्रविदया शिकावी असे वाटत होते, पण त्याच वेळी आपल्या समाजातील जातिभेद, अज्ञान आणि स्त्रियांच्या वाट्याला येणारी दुर्दशा त्यांना अस्वस्थ करत होती. त्यांनी इतर धर्मांचा तौलनिक अभ्यास केला. त्यांपैकी ख्रिस्ती धर्मातील माणुसकीची वागणूक, सेवा, समानता या गोष्टींचे त्यांना विशेष आकर्षण वाटले. येथेच ज्योतिबांंना आपल्या कार्याचा मार्ग सापडला आणि तो कृतीत आणण्यास त्यांनी सुरुवात केली.  समाजातील  विशेषतः स्त्रियांमधील  अज्ञान दूर करण्यासाठी त्यांनी जोगेश्वरीच्या बोळातील चिपळूणकरांच्या वाड्यात १८४८ साली पहिली मुलींची शाळा काढली. मुलींना शिकवण्यासाठी स्त्री शिक्षिका म्हणून त्यांनी आपल्या पत्नीला  सावित्रीबाईंना  तयार केले. स्त्रीशिक्षणाच्या आग्रही प्रयत्नामुळे समाजाचा प्रचंड रोष या पतिपत्नीला सहन करावा लागला. ज्योतिबांंच्या वडिलांनी ज्योतिबांंना व सावित्रीबाईंना घराबाहेर काढले.

   नंतर ज्योतिबांंनी मीठगंज भागात १८५१ साली दलित वस्तीत मुलींसाठी शाळा काढली. मागासलेल्यांना सुधारायचे तर त्यांच्यामध्येच जाऊन राहिले पाहिजे, म्हणून त्यांनी आपले घर बदलले. दलितांना पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून आपल्या घरातील हौद सर्वांना खुला केला. समाजातील उच्चवर्णीयांतील स्त्रियांवर होणारे अत्याचार पाहून या अभागी स्त्रियांसाठी त्यांनी १८६३ साली 'बालहत्याप्रतिबंधक गृह' सुरू करून अशा स्त्रियांना आश्रय दिला.  ज्योतिबांं हे कर्ते सुधारक होते. अशाच एका अडलेल्या स्त्रीला आश्रय देऊन तिच्या मुलाला ज्योतिबांंनी दत्तक .   घेऊन सांभाळ केला ते निर्भय वृत्तीचे होते. त्‍यामुळे आलेल्‍या संकटाना त्‍यांनी मोठ्या धैर्याने तोंड दिले. शेतकऱ्याच्या पोशाखात ते 'ड्युक ऑफ कॅनॉट' यांच्या भेटीला गेले. शेतकऱ्यांच्या अडचणी, शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी समजावून घेतले होते व त्याबाबतची त्यांची परखड मते त्यांच्या शेतकऱ्याचा असूड' (१८८३) या पुस्तकात व्यक्त झाली आहेत.

  अनिष्ट रूढी-परंपरांविरुद्ध आयुष्यभर ते झगडत राहिले, त्यासाठी त्यांनी १८७३ साली 'सत्यशोधक समाज' स्थापन केला. हजारो अनुयायी घडवले. विदया, सत्य आणि सत्शील यांचाच सदैव आग्रह धरला. म्हणूनच जनतेने स्वयंस्फूर्तीने त्यांना 'महात्मा' म्हणून गौरविले. जोतिबा फुले यांनी समाजाला सत्य आणि समता या तत्त्वांचा सक्रिय संदेश दिला व २७ नोव्हेंबर १८८९ साली त्यांच्या लाडक्या जनतेचा त्यांनी निरोप घेतला. ज्योतिबांं गेले, पण त्यांच्या महान कार्याने ते अमर झाले.

   महत्‍वाचे मुद्दे : 

   • समाजातील त्रुटी जाणून त्यावर मात करण्याचा निर्धार
   • सर्व धर्माचा तौलनिक अभ्यास
   • इंग्रजीचे अध्ययन
   • मुलींसाठी शाळा
   • पीडित महिलांना आश्रय
   • निर्भयता
   • प्रत्यक्ष कृतीने विरोध
   • सत्यशोधक समाजाची स्थापना
   • सत्य व समता हा संदेश दिला
   • सतत समाजाचाच विचार केला.

   निबंध 2   महात्मा ज्योतिबा फुले हे उच्चकोटीचे मानवतावादी समाजसुधारक होते. संपूर्ण आयुष्यभर त्यांनी केवळ मानवाच्या हिताचा विचार केला. जीवनात सत्याचा मूलमंत्र    काया-वाचा-मने जपणाऱ्या, ज्योतिबांंचा जन्म १८२७ साली  गोऱ्हे  यांच्या घरात झाला. बालवयातच आईच्या मायेचे छत्र हरपलेल्या जोती नावाच्या बालकाला गोविंदराव फुले यांनी मोठ्या प्रेमाने वाढवले.

   शाळेत घातले. त्‍‍‍‍यांंना इंग्रजी शिक्षणाचे वेध लागले होते. मार्गात अनंत अडचणी आल्या, तरीही त्‍‍‍‍यांंनी इंग्रजी शालान्त शिक्षण पूर्ण केले.  ज्ञान ही एक शक्ती आहे,' अशी ठाम श्रद्धा बाळगणाऱ्या ज्योतिबांंनी आपल्या यासंबंधीच्या विचारांचा सारांश सूत्रबद्ध पद्धतीने असा सांगितला आहे -

   "विदयेविना मति गेली। मतीविना नीति गेली।। नीतिविना गति गेली। गतीविना वित्त गेले।। इतके अनर्थ एका अविदयेने केले." जोतिबा फुले हे 'कर्ते सुधारक' होते. समाजातील शूद्र, अतिशूद्र, शेतकरी आणि स्त्रिया यांना दास्यातून मुक्त करायच्या हेतूने प्रेरित होऊन ज्योतिबांंनी पत्नीला सावित्रीबाईंना सुशिक्षित केले आणि त्यांच्याकडे विदयार्थिनींच्या अध्यापनाचे काम सोपवले. ज्योतिबांं व सावित्रीबाई यांचे ज्ञानदानाचे हे सत्र अविरत चालू राहिले.

   त्या काळी हिंदूंच्या उच्च जातींमध्ये विधवेचा पुनर्विवाह निषिद्ध मानला जात होता. वपन न केलेली विधवा ही अपवित्र स्त्री मानली जात असे. विधवांच्या केशवपनाची ही अमानुष चाल बंद व्हावी, म्हणून जोतिबांनी चळवळ उभी केली. बालहत्याप्रतिबंधकगृहाची स्थापना केली. स्त्रियांप्रमाणे अस्पृश्यांसाठीही जोतिबांनी बहुमोल सेवाकार्य केले.

   सार्वजनिक पाणवठ्यावरही दलितांचे पाण्यासाठी होणारे हाल पाहून त्यांनी त्यांच्यासाठी आपल्या घरचा पाण्याचा हौद खुला केला. १८७३ मध्ये फुले यांनी 'सत्यशोधक समाजा'ची स्थापना केली. सर्व धर्मांचे व जातींचे नागरिक या सत्यशोधक समाजाचे सदस्य व्हावेत, अशी त्यांनी योजना केली होती.

   जोतिबा फुले यांनी मौलिक विचारप्रवर्तक पुस्तके लिहिली. समाजातील पीडित श्रमिकांच्या विदारक आर्थिक स्थितीचा ज्योतिबांंनी बारकाईने अभ्यास केला आणि त्याचे उत्कृष्ट चित्र त्यांनी आपल्या 'शेतकऱ्याचा असूड' या पुस्तिकेत रेखाटले आहे. शेतकऱ्यांची स्थिती बदलण्‍यासाठी  चांगले उपाय या  लेखांतून सांगीतले  आहेत. १०० वर्षांपूवी लिहिलेले हे मौलिक विचार आजच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बऱ्याच प्रमाणात लागू पडतात.

   ज्योतिबांंनी आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण समाजासाठी वेचला आणि म्हणूनच लोकांनी त्यांना 'महात्मा' असे यथार्थपणे गौरवले.
   महत्‍वाचे मुद्दे : 

   • एक थोर समाजसेवक 
   • जन्म 
   • शिक्षण 
   • महात्मा फुले समाजसेवकांचे अग्रणी
   • परंपराग्रस्त समाजाला जागृत करण्याचे जोतिबांचे प्रयत्न
   • 'आधी केले मग सांगितले' या उक्तीप्रमाणे फुले यांचे आचरण
   • स्त्री-शिक्षणाला प्राधान्य 
   • मुलींसाठी शाळा 
   • मनुस्मृतीवर घणाघाती हल्ला 
   • शेतकऱ्यांबद्दल कळकळ
   • त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न 
   • खेडे हा त्यांच्या सुधारणावादाचा केंद्रबिंदू 
   • शिक्षणाला प्राधान्य 
   • शिक्षण हे समाजसुधारणेचे प्रवेशद्वार
   • फुले यांचे समग्र विचार   निबंध 3

   मराठी मातीनं ज्या असंख्य समाजसुधारकांना जन्म दिला, त्यांपैकी महात्मा जोतिराव फुले यांचं नाव सुवर्णाक्षरात कोरावं लागेल. आज दलित, मागासवर्गीय व स्त्रिया यांच्या उन्नतीसाठी शासनाकडून क्रांतिकारक पाउलं टाकली जात आहेत. परंतु याची मुहूर्तमेढ १९ व्या शतकातच आपल्या महाराष्ट्रात  समाजसुधारक जोतिरावांनी रोवली होती.

   वर्णव्यवस्थेचा पगडा असलेल्या तत्कालीन समाजात जोतिरावांनी एका मागासवर्गीय कुटुंबात जन्म घेतला. सातारा जिल्ह्यातल्या 'कटगुण'गावी १८२७ साली !विद्येचं वारंसुद्धा न लागलेल्या कुटुंबात जन्मल्यामुळे जोतिबांना शिकण्यासाठी धडपडावं लागलं. म्हणून की काय सर्वांगीण सुधारणेचे प्रवेशद्वार असलेल्या शिक्षणाची गंगा समाजाच्या सर्व थरांत नेण्याची जिद त्यांनी अंगी धरली. मुलींसाठी शाळा काढण्याचं सर्वप्रथम धाडस जोतिबांनी केले... त्यासाठी स्वतः - बेघर' झाले. त्यांच्या पत्नी सावित्रीबाईनी त्यांना साथ दिली. 

   निराधार बाल-विधवांचे जोतिबा कैवारी बनले. एवढंच नाही तर त्यांनी विधवा-विवाह घडवून आणले. मानवतेला काळिमा फासणारी विधवांच्या केशवपनाची पद्धत बंद करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अस्पृश्यतेच्या रूपानं समाजाला लागलेला कलंक धुऊन काढण्यासाठी स्वत:च्या घरातील हौद जोतिबांनी अस्पृश्यांना खुला केला. सत्य व समता यावर आधारित न्याय व हक्कांसाठी जोतिबांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी 'सत्यशोधक समाजा'ची स्थापना केली.

   मानवता म्हणजे माणुसकी ! माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे म्हणजेच मानवताधर्म ! ह्या मानवताधर्माच्या शिकवणीची संजीवनी अमानवी रूढींच्या शंखलांनी जखडलेल्या समाजास जोतिबांनी प्रथम दिली. या कामी त्यांनी उभं आयुष्य वेचलं. त्याची मधुर फळं आज समाजाला चाखायला मिळत आहेत.
   मागासवर्गीयांना समाजात ताठ मानेनं जगता येतंय, स्त्री अबला राहिली नसून सबला बनली आहे, अस्पृश्यता नष्ट झाली आहे...

   पण या सुधारणा घडवण्यात जोतिबांना सिंहाचा वाटा द्यावा लागेल. मानवतेच्या ह्या थोर उपासकानं जणू- . । 'सर्वेऽपि सुखिनः सन्तु । सर्वे सन्तु निरामयाः ॥' या अर्थाच ज्ञानदेवांचं पसायदान वास्तवात आणण्यासाठी आपलं जीवन खर्ची घातलं.

   म्हणून आज म्हणावंसं वाटतं, या सुधारणांचं नेत्रसुख अनुभवण्यासाठी.. आनंदोत्सव साजरा करण्यासाठी...जोतिबा, तुम्ही आज हवे होतात !...

   कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत