Maza avadta lekhak marathi nibandh | माझा आवडता लेखक मराठी निबंध

निबंध 1 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  माझा आवडता लेखक  मराठी निबंध बघणार आहोत. आपण भरपुर पुस्‍तके वाचत असतो पण त्‍यातील काही निवडकच लेखक आपले आवडते असतात. माझे आवडते लेखक आहेत पु. ल.  देशपांंडे कारण त्‍यांचे लिखाण इतके आनंददायी आहे की तुम्‍ही पुर्ण पुस्‍तक वाचल्‍याशिवाय राहणार नाही.  

मुद्दे :

  • पु. ल. देशपांडे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व
  • लहान मुलांसाठी लेखन
  • विनोदी लेखन
  • व्यक्तिचित्रे
  • अनेक नाटके
  • प्रवासवर्णने
  • अनेकांच्या पुस्तकांना प्रस्तावना
  • माणुसकी गौरवणारा,
  • माणुसकीचा गहिवर असलेला एक अलौकिक व्यक्तिमत्त्वाचा माणूस व अष्टपैलू लेखक

पु. ल. देशपांडे यांची अनेक पुस्तके माझ्या संग्रही आहेत. ही पुस्तके कितीही वेळा वाचली तरी त्यांची गोडी कमी होत नाही. कारण पु. ल. देशपांडे हे माझे आवडते लेखक आहेत. माझेच का? पु. ल. हे साऱ्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व आहे.

अगदी सुरुवातीला माझ्या वाचनात आले पु. लं.चे 'खोगीरभरती' आणि 'नस्ती उठाठेव' हे विनोदी लेखसंग्रह. हा काहीतरी वेगळाच लेखक आहे,या पुस्तकांबरोबर मोठे होत असतानाच मला कळलं की ज्या 'नाच रे मोरा' या गाण्यावर आपण नाचलो, त्या गाण्याची चाल पु. लं.नी दिलेली आहे.

maza-avadta-lekhak-nibandh
maza-avadta-lekhak-nibandh

 नंतर वाचनात आली पु. लं.ची 'व्यक्ती आणि वल्ली' आणि 'गणगोत' ही पुस्तके. तेव्हा लक्षात आले की, हा लेखक केवळ विनोदीच लिहीत नाही, तर हा उत्कृष्ट व्यक्तिचित्रेही रेखाटतो. कारुण्याची झालर असलेले विनोदही जागोजागी आढळतात. त्यांचा विनोद हसवता हसवता अंतर्मुख करून जातो.

पु. लं.ची 'तुझे आहे तुजपाशी', 'अंमलदार', 'ती फुलराणी...' ही नाटके पाहिली; पण 'बटाट्याची चाळ', 'वाऱ्यावरची वरात', 'असा मी असामी' हे एकपात्री प्रयोगपाहायची संधी मला मिळाली नाही. मग त्या पुस्तकांची पारायणे केली; ध्वनिफिती ऐकल्या. बटाट्याच्या चाळी 'ला जोडलेले 'एक चिंतन' हे पु. लं.च्या विनोदाचे खास उदाहरण म्हणून सांगता येईल. पु. लं.ची पुस्तके बाजूला ठेवली, तरी त्यांच्या चितळे मास्तरांच्या झिजलेल्या चपला वा त्यांच्या नारायणची नारायणगिरी' विसरता येत नाही.

पु. लं.नी खूप प्रवास केला आणि तो अत्यंत मिस्कील, खुसखुशीत भाषेत शब्दरूपांतही आणला. अपूर्वाई, पूर्वरंग, वंगदेश ही त्यांची पुस्तके म्हणजे मराठी साहित्यातील अजरामर प्रवासवर्णने आहेत. पु. लं.नी अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या. त्या छोट्याशा प्रस्तावनाही आपल्याला एखादा मौल्यवान विचार देऊन जातात. पु. ल. एके ठिकाणी लिहितात, "हास्य हे माणसा-माणसांच्या मनात निर्भयता निर्माण करणारे मोठे साधन आहे. हास्य आणि सहानुभूती या दोन गोष्टी देऊन निसर्गाने माणसाला माणूसपण दिले आहे. खळाळून हसणाऱ्या मोठ्या समुदायातून या माणुसकीचे सर्वांत प्रभावी दर्शन होते."

आज पु. ल. आपल्यात नाहीत; पण माणुसकी गौरवणारा हा महाराष्ट्राचा महान अष्टपैलू लेखक माझा आवडता लेखक आहे. 

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व पु. ल. देशपांडे यांची कोणती पुस्‍तके तुम्‍ही वाचली  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

निबंध 2

माझा आवडता लेखक पु ल देशपांडे मराठी निबंध

माझे आवडते लेखक आहेत पु. ल. देशपांंडे कारण पु.ल. आनंदात जगले, विविध कलांच्या क्षेत्रांत ते लीलया वावरले. विशेष म्हणजे पु.लं.ना जो जो आनंद गवसला, जेथे जेथे आनंद मिळाला, तो त्यांनी सर्वांसाठी मुक्तपणे उधळला. आपल्या एका मुलाखतीत पु.ल. म्हणाले होते, 'मला जेव्हा जेव्हा काही चांगले दिसते, आवडते तेव्हा तेव्हा ते दुसऱ्याला सांगण्यासाठी मी उत्सुक असतो, आतुर असतो.' म्हणून पु.ल. हे केवळ शब्दार्थी आनंदयात्री नव्हते, तर ते खरोखरीचा आनंद उधळणारे 'आनंददात्री' होते. 

पु.लं.नी मराठी माणसाला काय दिले, असा प्रश्न विचारण्याऐवजी पु.लं.नी मराठी माणसाला काय दिले नाही? असेच विचारावे लागेल. अशा या अष्टपैलू कलावंताचा जन्म १९१९ साली झाला. त्यांचे शिक्षण मुंबई व पुणे येथे एम्.ए.,एल्.एल्.बी. पर्यंत झाले. त्यांनी संस्कृत व बंगाली या भाषांचा परिश्रमपूर्वक अभ्यास केला. त्यांनी लिपिक, शिक्षक, प्राध्यापक अशा विविध स्तरांवर नोकऱ्या केल्या. आकाशवाणीवर नाट्यविभागप्रमुख म्हणून काम केले. दिल्ली दूरदर्शनवरील कार्यक्रमांचे ते पहिले निर्माते होते.

पु.लं.जवळ असामान्य निरीक्षणशक्ती होती. त्यांच्या लहानपणी घरी आलेल्या पाहुण्याचे अचूक निरीक्षण करून आपला हा बाळ काही जगावेगळे बोलणार नाही ना, अशी भीती त्यांच्या आईला वाटे. पण याच निरीक्षणशक्तीतून पु.लं.च्या 'व्यक्ती आणि वल्ली' साकार झाल्या. 'गणगोता 'तील आप्तजन चिरंजीव झाले. पु.लं.च्या लेखनाचे वैशिष्ट्य असे की, अनेकदा वाचून, पाहून वाचकांनाही ती सारी माणसे आपलीच, जवळचीच वाटू लागली. 'बटाट्याची चाळ' या पु.लं.च्या पुस्तकातील प्रत्येक माणूस आपल्यापरीने वेगळा आहे.

पु.लं.नी भरपूर प्रवास केला आणि 'अपूर्वाई' , 'पूर्वरंग' आणि 'वंगदेश' अशा पुस्तकांतून तो वाचकांपुढे मांडला. युरोपातील 'कापी' बेटावरील निळाईच्या सौंदर्याने पु.लं.चे अंत:करण भरून आले आणि त्यांना आठवला ज्ञानेश्वरांनी वर्णिलेला 'कोटिचंद्रप्रकाश'.

पु.लं.चे चित्रपट, नाटके, एकपात्री प्रयोग सारेच लोकांनी डोक्यावर घेतले. त्यांतल्या संवादांनी, गाण्यांनी, अभिनयाने आणि दिग्दर्शनाने रसिकांना अमाप आनंद दिला. पु.लं.चा विनोद हा अभिजात होता. कुणालाही न दुखावणारा, कुणाच्याही व्यंगावर बोट न ठेवणारा. शब्दाशब्दांवर ते लीलया कोट्या करत. त्यांचे 'कोट्यधीश' हे पुस्तक वाचकाला कोणत्याही परिस्थितीत खुलवते.

पु.ल. स्वतः मूलतः कविमनाचे होते, संगीतकार होते. त्यांचे 'नाच रे मोरा' हे गाणे ऐकल्यावर प्रत्येक मराठी बालकाचे बालपण सुखावून जाते. पु.ल. आणि त्यांच्या पत्नी सुनीताबाई हे दोघेही काव्यवेडे. स्वानंदासाठी ते नेहमीच कविता वाचत, म्हणत. त्यांना शेकडोंनी कविता पाठ होत्या. पण त्यांच्या मनात आले, हा आनंद आपण इतरांपर्यंत पोहोचवला तर... आणि मग भाईंनी आणि सुनीताताईंनी कविवर्य बोरकर, मढेकर आणि आरती प्रभूच्या कवितांच्या वाचनाचे जाहीर कार्यक्रम केले. स्वत:ला मिळालेला आनंद हजारो श्रोत्यांवर उधळून दिला.

पु.लं.च्या बाबतीत म्हणावे लागते की, 'देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी आमुची झोळी'.कोठे कोणी चांगले काम करत आहे, पैशासाठी काम अडले आहे असे कळले की, पु.लं.चा मदतीचा हात तेथे पोहोचत असे. कुणा एका आडवळणाच्या गावी एक प्राचार्य आपल्या महाविदयालयासाठी धडपडत आहे, हे कळल्यावर पु.ल. फाऊंडेशन तेथे मदतीला गेले. 

रक्तपेढ्या, रुग्णालये, मुक्तांगण, शैक्षणिक संस्था... साऱ्यांना भरभरून मदत पोहोचली. कुणी तरुण तज्ज्ञ डॉक्टरीण, व्यसनाधीनांना व्यसनांपासून मुक्त करण्यासाठी धडपडत आहे, असे कळल्यावर हा थोर दाता तेथेही पोहोचला. मग सांगा, पु.ल. हे खरोखरच एक आगळेवेगळे आनंदयात्री नव्हते का?

निबंध 3

माझा आवडता साहित्यिक मराठी निबंध

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे महान विनोदाचार्य प्र.के. अत्रे म्हणत असत, 'लता मंगेशकर आणि पु.लं. देशपांडे हे महाराष्ट्रातले दोन चमत्कार आहेत. ही तेजाने तेजाची केलेली आरती आहे. खरोखर, 'चमत्कार' या शब्दाव्यतिरिक्त पु.लंचं वर्णन करताच येणार नाही.

 अवघं साहित्यविश्व त्यांचा 'महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व' असा उल्लेख करतं. 'लाडकं' हे वात्सल्याच्या विश्वातलं विशेषण दुसऱ्या कोणाला लावता येईल असं वाटत नाही. ते हरहुन्नरी होते आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक चमकदार पैलू होते. म्हणूनच असं म्हणावंसं वाटतं की 'याच्या आधी असं व्यक्तिमत्त्व महाराष्ट्रात झालं नाही आणि पुढे कधी होईल असं वाटत नाही.'

 अशी माणसं शतकात किंवा हजार वर्षात एखादवेळच जन्माला येतात. धन्य त्यांचे आई-वडील. त्यांच्या आई-वडिलांनी जेव्हा त्यांचं नाव 'पुरुषोत्तम' असं ठेवलं, तेव्हा त्यांना यत्किंचितही कल्पना आली नसेल की हे मूल जेव्हा 'पुरुष' होईल तेव्हा ते अनेक क्षेत्रात 'उत्तम' ठरेल. देव माणसाला केव्हा केव्हा चकवतो, तो असा.
पु.लं. ना काही येत नव्हतं असं नाहीच. ते उत्कृष्ट विनोदी (आणि गंभीरही) लेखक होते. नाटककार आणि नटही. गीतकार आणि संगीतकारही, गायक आणि वादकही, कथालेखक व कथाकथक, वक्तृत्वही, कर्तृत्वही.

एखाद्याला वाटेल त्यांना नृत्यकला अवगत नसावी. पण ज्यांनी त्यांचे 'गुळाचा गणपती' सारखे चित्रपट, 'वाऱ्यावरची वरात' यासारखं प्रहसन किंवा 'सुंदर मी होणार' यासारखं नाटक पाहिलं असेल, त्यांना कळून येईल की नृत्याच्या क्षेत्राचेही ते चांगले जाणकार होते. ते साहित्यातले सिकंदर होते, जिंकायला आता क्षेत्रच राहिलं नाही म्हणून खंतावणारे. ज्या क्षेत्रात ते गेले, त्या क्षेत्रातले ते सम्राट झाले. त्या क्षेत्रावर त्यांनी अधिराज्य गाजविले. 

साम्राज्य तर असं स्थापलं की त्यांच्या साम्राज्यावर सूर्य कधी मावळला नाही आणि कधी मावळणारही नाही.
पद्य विडंबनावर आचार्य अत्रे यांनी आपली मोहोर उमटवली आहे, तर गद्य विडंबनावर पु. लं. नी आपला ठसा उमटवला आहे. त्याचे 'व्यवच्छेदक लक्षण' व 'सहानुभावांचे वाङ्मय' बटाट्याच्या चाळीतलं 'एक चिंतन' असे लेख मराठीत कधी लिहिलेच गेले नाहीत. यातलं विडंबन विशेष. 

त्याच्या अगोदर व्यंकटेश माडगूळकरांनी अप्रतिम व्यक्तिचित्रं रेखाटली. पण माडगूळकरांची व्यक्तिचित्रे आणि पु.लंची व्यक्तिचित्रे यात खूप फरक आहे. असं म्हणता येईल की माडगूळकरांच्या 'व्यक्ती' आहेत तर पु.लंच्या 'वल्ली' आहेत. पु.लंच्या लिखाणाचं वैशिष्ट्य असं की ते एखाद्याची टिंगल - टवाळी करतात. खट्याळपणे त्याच्यावर लिहून आपल्याला हसवतात. पण मग शेवटी अगदी गंभीर होतात. काळजाचा ठाव घेणारं असं काहीतरी लिहून जातात.

'तुझं आहे तुजपाशी' मधील आचार्य घ्या. सबंध नाटकभर आपण त्यांना हसत असतो. पण पु.लं. शेवटी त्यांच्या तोंडी असं एक भाषण घालतात की, आपल्याला आचार्यांची कीव यायला लागते. त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटायला लागते. वाटतं, अरेरे, आपण या स्फटिकासारख्या स्वच्छ आणि प्रामाणिक माणसाला उगाच हसलो.
त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल, त्यांनी इतकं विनोदी लेखन केलं, पण कुठेही

आचरटपणा नाही आजची व्यासपीठावरची आणि दूरदर्शनची विनोदी नाटके म्हणजे शुध्द आचरटपणा. हल्ली विनोद म्हणजे विदूषकी चाळे. विनोद म्हणजे आचरटपणा  असं समीकरण झालेलं आहे. म्हणूनच खुद्द पु.लंच दूरदर्शनला 'दुर्दशन' असं म्हणत असत. त्यांनी हयात व मृत व्यक्तीची कधी कुचाळकी केली नाही किवा
कुणाच्या वर्मी झोंबेल असं काही लिहिलं नाही. ते मांगल्याचे, सौंदर्याचे पुजारी होते. म्हणून । त्यांना सगळं काही सुंदर आणि मंगल वाटे. 

एकपात्री प्रयोग करावा, तर पु.लं.नीच. एकनाथांनी | लिहून ठेवलंय की ज्ञानेश्वरापाठी कोणीही महाटी ओवी करू नये. मला सुध्दा असंच वाटतं की | पु.लं. नंतर कोणीही एकपात्री प्रयोग करू नयेत. त्यांनी विनोदाची पातळी तर इतकी उंचावून | ठेवलीय की त्या पातळीपर्यंत फारच थोडे लोक येऊ शकतील.  पु.लं. गेले आणि त्यांच्याबरोबर | असं काही गेलंय की जे महाराष्ट्र परत कधीच पाहू शकणार नाही.

निबंध 4

 majha avadta lekhak in marathi essay

मला लहानपणापासून वाचनाची आवड. लहानपणी पंचतंत्र, इसापनीती, अद्भुत कथा आवडायच्या. हळूहळू वाचनकक्षा रुंदावत गेल्या. सानेगुरुजींची ‘गोड गोष्टी', 'श्यामची आई' पुस्तके वाचली आणि साने गुरुजी आवडू लागले. नंतर मात्र मी ललित साहित्य वाचू लागले. त्यात ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, अनंत काणेकर, चिं. वि. जोशी, रणजीत देसाई, प्र. के. अत्रे यांची पुस्तके वाचू लागले. पण सर्वात प्रभाव पडला, तो पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याचा.

 त्यामुळे पु. ल. देशपांडे माझे आवडते लेखक बनले. मग अर्थातच पुलंची पुस्तके वाचण्याचा मी सपाटा चालविला. पु. ल. देशपांडे म्हणजेच पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचा एक प्रदीर्घ कालखंडच! साहित्य, नाट्य, संगीत, चित्रपट, एकपात्री प्रयोग, संस्कृती अशा जीवनाच्या सर्वांगांना स्पर्श करणारे. असे एकही क्षेत्र नाही, की जिथे पुलंचा परिसस्पर्श झालेला नाही. आयुष्य मी सुटी' समजून घालविली, असे म्हणणारे पु. ल. खरोखरीच आनंदयात्री होते. 

लेखकाचे अंतरंग त्यांच्या साहित्यात डोकावते. त्यांचे म्हणणे होते की, “जन्म आणि मृत्यू या दोन टोकांच्यामध्ये पकडून नियतीने चालविलेली आपणा साऱ्यांची फसवणूक एकदा लक्षात आली, की त्यातून सुटायला आपली आणि आपलकीने भोवताली जमणाऱ्या माणसांची हसवणूक करण्यापलीकडे आणखी काय करायचं? त्यामुळेच त्यांची भाषाशैली अत्यंत खेळकर होती. कोणतेही तत्त्वज्ञान हसत-खेळत सांगण्याची त्यांची शैली कोणाही वाचकाला भुरळ न पाडेल, तरच नवल!

संगीत आणि नाटक हे पुलंच्या संपन्न कलाजीवनाचे खास विशेष. तुझे आहे तुजपाशी, ती फुलराणी, सुंदर मी होणार, अंमलदार, एक झुंज वाऱ्याशी, बटाट्याची चाळ, पुढारी पाहिजे, वयम् मोठम् खोटम् इ. नाटकांद्वारे पुलंनी जो विषय हाताळला, किंबहुना ज्या विषयाला स्पर्श केला, त्याचे सोने झाल्याशिवाय राहिले नाही. संवादात सहजता, खेळकरपणा, सुबोधता, मोहकता असल्याने त्याची वाचकांवर, ती नाटके पाहणाऱ्या प्रेक्षकांवर जादू झालीच पाहिजे.

पु.लं च्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा त्यांच्या प्रत्येक पुस्तकातील प्रत्येक पानावर, प्रत्येक ओळीवर दिसून येतो. त्यांची पुस्तके म्हणजे मोठे मासे छोटे मासे, अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्याच्या देशा, नसती उठाठेव. गोळाबेरीज, खिल्ली, आम्ही लटिके न बोलू, तीन पैशांचा तमाशा, गुण गाईन आवडी, व्यक्ति आणि वल्ली', एवढी ग्रंथसंपदा त्यांनी आपल्या मराठी रसिकांसाठी निर्माण केली. वाचकांना आपल्या विनोदी शैलीने सतत हसवत ठेवले. 

त्यामुळेच त्यांना कोट्याधीश पुल म्हणत. शाब्दिक कोट्या करणे वाटते तेवढे सोपे नाही. त्यासाठी हजरजबाबीपणा, शब्दांची समृद्धता हवी. ती पुलंच्याकडे विपुल प्रमाणात होती. एक उदाहरण सांगते. पं. भीमसेन जोशी सवाई गंधर्वांचे शिष्य. विमानातून प्रवास केल्याशिवाय त्यांचा एकही दिवस जात नसे. त्यावर पु.ल. म्हणाले, “सवाई गंधर्वांचा शिष्य हवाई गंधर्वच आहे." ही झाली समयसूचकता!

'व्यक्ति आणि वल्ली'मधील व्यक्तिरेखा वाचताना त्या प्रत्यक्ष डोळ्यांपुढे साकारतात. त्यातील व्यक्ती त्यांच्या खास वैशिष्ट्यांनिशी साकारतात; जिवंत होतात. त्यातील प्रत्येक पात्र समाजात कोठेतरी आढळते; पण अशा व्यक्तींचे यथार्थ चित्रण करणे प्रत्येकाला जमत नाही. अशा व्यक्तिरेखा साकारताना निरीक्षण हवे, त्यांच्या लकबी टिपल्या पाहिजेत. तसेच, त्यांची विशिष्ट भाषादेखील शब्दांत मांडता आली पाहिजे, तरच ती व्यक्तिरेखा जिवंत होते आणि ती आपल्या मनात घर करून राहते. 

नारायण, चितळे मास्तर, नाथा कामत, रावसाहेब, पानवाला, सखाराम गटणे सर्वच पात्रे लक्षात राहतात, ती लेखनशैलीमुळे आणि समर्पक शब्दांच्या योजनेमुळेच ना! अशा प्रकारे वाङ्मयीन प्रतिष्ठा लाभलेले दर्जेदार साहित्य, विविध वाङ्मय-प्रकार हाताळणारा हा लेखक सर्वांनाच आवडतो. मग मीच त्याला अपवाद कसा असेन ?

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद