pradushan ek samasya in marathi essay | प्रदूषण एक समस्या मराठी निबंध

निबंध 1
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण प्रदूषण एक समस्या मराठी निबंध बघणार आहोत.  आज जगातील सर्वात गंभीर समस्‍या असेल तर ती वाढते प्रदूषण आहे . आज भारत असो की इतर कोणताही देश त्‍या देशातील हवा, पाणी, माती,ध्‍वनी यांचे प्रदूषण दिवसेदिवस वाढतच आहे. या 3 निबंधात प्रदूषणाची कारणे व उपाय यावर सविस्‍तर माहीती दिलेली आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला
 
२१ व्या शतकाकडे वाटचाल करत असलेल्या मानवाच्या प्रगतीचा वारू आज बेलगाम चौखूर उधळला आहे, ज्याची वेसण आज अडकली आहे- भ्रष्टाचाराच्या भस्मासुरामध्ये, लोकसंख्येच्या लकव्यामध्ये आणि प्रदूषणरूपी प्रलयामध्ये! जेव्हा भौतिक, रासायनिक आणि जीवशास्त्रीय बदल वातावरणात घडून येतात, जे मनुष्याच्या अस्तित्वालाच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीने ग्रहण लावतात, त्यालाच ‘प्रदूषण' असे म्हणतात. 

आज प्रदूषण कोठे नाही? हवा, पाणी, अन्न, जमीन, तापमान, आवाज या साऱ्यांनाच या प्रदूषणाने ग्रहण लावलंय! औद्योगिक क्रांतीपूर्वीच प्रदूषणाचा जन्म झाला. परंतु निसर्गाच्या कुंपणाने माणसाच्या जीवनाला धडका मारणारा हा उन्मत्त बैल थोपवून धरला होता. वातावरणात मिसळणारे वाहनांचे धूर व Lead Poisoning सारखं माणसानंच निर्माण केलेलं प्रदुषणाचं रूप, आज जग गिळंकृत करू पाहणाऱ्या वामनात कधी रूपांतरित झालं हे भौतिक सुखाच्या मृगजळामागे धावणाऱ्या मनुष्यप्राण्याला कधी कळलंच नाही. 

pradushan-ek-samasya-in-marathi-essay
pradushan-ek-samasya-in-marathi-essay

परंतु चेर्नेबिल अणुभट्टीच्या स्फोटासारखं प्रदूषण निसर्ग कसा थांबवणार? अशा स्फोटांमुळे तापमानात बदल होऊन त्यामुळे ऋतुचक्राची चाकेच खिळखिळी होऊ लागली आहेत. भोपाळच्या वायु दुर्घटनेची भीषणता आज कुणी विसरू शकेल? डॉ. दत्ता सामंतांच्या शरीरालाच संप पुकारावा लागला, तो मुंबईमध्ये झालेल्या क्लोरीन गळतीमुळे ! -Touch of Midas' गोष्टीतल्या मिडास राजासारखीच आज मानवाची अवस्था होऊ लागली आहे!

Soclean Society च्या अहवालानुसारं ३ हजार टन इतका गोबरगॅस एकट्या मुंबईमध्ये दर दिवशी गोळा होतो. सतराशे टन इतकी प्रदूषिते रोज हवेत सोडली जातात अन् २० लाख लिटरपेक्षा जास्त सांडपाणी जमा होते. प्रदूषण दूर करण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रणा २४ तास वापरणेही आज माणसाला शक्य नाही.
लाऊडस्पीकरवर वाजवली जाणारी कर्णकर्कश्श गाणी, सिनेमागीते, डिस्को, वाढलेली रहदारी, वाहनांचे कर्णकटू आवाज या साऱ्यांनी ध्वनिप्रदूषण निर्माण केले आहे. २० ते ७० डेसिबल इतका आवाज ऐकू शकण्याची व सहन करण्याची क्षमता असणाऱ्या माणसाच्या कानांनी धोक्याची घंटा वाजवण्यास सुरुवात केली आहे. १०० च्या पेक्षा जास्त डेसिबलचा आवाज ऐकून विघ्नहर्त्याने गणेशोत्सवात कुणाकडे दाद मागावी? याहीपेक्षा भयानक आहे ते म्हणजे 'मानसिक प्रदूषण' वाढती गुन्हेगारी, बालिका-हत्या, भ्रष्टाचार, वशिलेबाजी, युवा पिढीची उदासीनता, जुन्या पिढीची निष्क्रियता, व्यसनाधीनता, अति सुखासीनता यामुळे मानवी मनच कलुषित झालं आहे, प्रदूषित झालं आहे. ही समस्या हा प्रत्येक राष्ट्राचा ज्वलंत प्रश्न आहे. ही एक राष्ट्रीय समस्या आहे. मग यावर उपाय तो कोणता? 'स्वच्छ पर्यावरण', चांगल्या विचारांचं मन हे कुठल्याही उदबत्तीच्या सुवासापेक्षाही सुवासिक आहे.  १९७४ मधील Water Act व १९८१ मधील 'Clean air act' ची अंमलबजावणी होणं आवश्यक आहे. कलम २७७, २७८, ८४ च्या नुसार गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे. ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून जसा साजरा केला जातो तसा प्रत्येक दिवस पर्यावरण दिन म्हणून मानला पाहिजे, पाळला पाहिजे. जमीन प्रदूषित करणारी रासायनिक खते व औषधी फवारे यांच्या अमर्याद वापरावर बंधन आणले पाहिजे. 'झाडे लावा, झाडे जगवा' ही मोहीम राबविणारे अण्णा हजारे घराघरातून निर्माण झाले पाहिजेत.वाया गेलेल्यांतून नवीन गोष्टींचा जन्म झाला मळीपासून स्पिरीट,  शेणापासून गोबरगॅस, पेट्रोलियमपासून घरगुती गॅस निर्माण झाला तर ताजमहाल पुन्हा धवल बनेल, गंगा ' मैली' राहणार नाही! मनाची नि तनाची शुचिता व शुद्धता नष्ट करू पाहणाऱ्या या प्रदूषणरूपी प्रलयांतून मनुष्याच्या आशा-आकाक्षाचा मनू तरून जाणे सहज शक्य आहे फक्त गरज आहे ती कल्पकतेची, नियोजनाच्या होडीची!
मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 2

प्रदूषणाची समस्या मराठी निबंध

 मानवासहित सर्व सजीव प्राणी वनस्पतींना जगण्यासाठी संतुलित वातावरणाची आवश्यकता असते. संतुलित वातावरणात सर्व घटक एका निश्चित प्रमाणात असतात. परंतु जेव्हा वातावरणात या घटकांची उणीव निर्माण होते किंवा त्यात हानिकारक घटक मिसळतात तेव्हा वातावरण प्रदूषित होते व मानवासाठी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात नुकसानकारक ठरते. आज संपूर्ण जग प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रदूषणाने घर केले आहे आणि आपण पूर्णपणे त्याच्या मुठीत गेलो आहोत. प्राचीन काळात ही समस्या इतकी बिकट नव्हती. त्यावेळी प्रदूषणाचे नामोनिशाण नव्हते. निसर्गात एक प्रकारचे संतुलन होते. हवा, पाणी शुद्ध होते. पृथ्वीची उत्पादन शक्ती जास्त होती. हळूहळू लोकसंख्या वाढली. मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नित्य नवे कारखाने उघडू लागले. औद्योगिकीरणाच्या स्पर्धेत प्रत्येक राष्ट्र धावू लागले. ऐषआरामाच्या उपभोग्य वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी भूगर्भातील बहुमूल्य संपत्ती खेचून बाहेर काढली जाऊ लागली. नैसर्गिक संपत्ती नष्ट होताच भूगर्भातील कोळसा, खनिजतेल, धातू यांचे वायुरूपात परिवर्तन होऊन संपूर्ण वातावरणाला व्यापून टाकेल आणि मग मानवाला जगणे मुश्किल होईल.लोकसंख्येच्या वाढीमुळे निवासस्थानांचे संकट उत्पन्न झाले आहे. परिणामी लहान लहान भूखंडांवर लहान लहान घरे उभारली जात आहेत. दहा दहा मजली उंच इमारती तयार होत आहेत. या घरांमधे सूर्यप्रकाश व शुद्ध हवेचा अभाव असतो. जंगल कटाई करून राहण्यासाठी जागा उपलब्ध केली जात आहे. मानव स्वत:च या प्रदूषणाला कारणीभूत आहे. समुद्राला अमर्याद शक्तीचा स्वामी समजून सर्व कचरा समुद्रात टाकला जात आहे. नद्यापण आपले प्रदूषित पाणी समुद्रात मिसळतात. शास्त्रज्ञांनी सावधगिरीचा इशारा देऊनही औद्योगिक घटकांद्वारे केरकचरा समुद्रात टाकणे बंद न झाले तर लवकरच त्यातील मासे मरतील. सध्या हजारो जहाजे व पेट्रोलियम टॅकर्सची समुद्रातून वाहतूक होते. 

एकीकडे हे मानवाला प्रगतीकडे घेऊन जातात. तर दुसरीकडे लाखो टन पेट्रोलियमच्या गळतीमुळे किंवा अपघातामुळे समुद्राच्या पाण्यावर ते पसरते. समुद्राच्या पर्यावरणासाठी हा मोठा धोका आहे. या तेलात अनेक किमती धातू उदा. शिसे, निकेल, मँगेनीज इत्यादी असते. जे जीवजंतू किंवा वनस्पतीद्वारे मानवाच्या शरीरात प्रवेश करून त्याचे नुकसान करते. नद्यांच्या पाण्याचे प्रदूषण झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे बिकट संकट विक्राळ रूप धारण करीत आहे.ध्वनिप्रदूषणामुळे मानवाची श्रवणशक्ती क्षीण होते. त्यामुळे चिडचिडेपणा, थकवा, निद्रानाश, श्वासाचे रोग उत्पन्न होतात. शहरांची लोकसंख्या दिवसेदिवस वाढतच जात आहे. ग्रामीण जनतेचे शहरांकडे होणारे पलायन. शहरी जीवन कष्टमय बनवीत आहे. जो जो लोकसंख्येची घनता वाढते तो तो वाहुकीच्या साधनांत वाढ होते. इंधनावर चालणाऱ्या या वाहनांमधून निघणाऱ्या विषारी वायूमुळे वायुप्रदूषण होते. ज्यामुळे श्वासाचे अनेक रोग उद्भवतात उदा. फुप्फुसाचा कॅन्सर, दमा, खोकला, सर्दी इत्यादी वायुप्रदूषण मंदगतीने विषाचेच कार्य करते. 

परंतु भोपाळ वायू दुर्घटनेत निघालेला "मिथाईल आइसोसायनाईड" मुळे हजारो लोक तात्काळ मृत्यू पावले. जे लोक मेले ते मुक्त झाले पण जे वाचले ते कणाकणाने मरण्यासाठी आणि विकसनशील राष्ट्रांतील विज्ञानाचा शाप सहन करण्यास विवश झाले. औद्योगिकीकरणाच्या वाढत्या प्रवृत्तिमुळे कारखान्यांतून निघणारे विषारी वायू हवा विषमय करतात. कारखान्याजवळ लावलेल्या झाडांवर काजळीची पुटे चढ़तात. मग तेथेच वास्तव्य करणाऱ्या लोकांबद्दल काय? अल्ट्राव्हायोलेट (अतिनील) किरणांपासून पृथ्वीला वाचविणाऱ्या ओझोनलाही छिद्र पडले आहे.निसर्गाशी मानवाचा अयोग्य व्यवहार या समस्येला आणखीनच गंभीर करतो. जंगल कटाई करणे, उद्याने उजाडणे आणि वातावरण शुद्ध ठेवणाऱ्या झाडांना नष्ट करणे हा मानवाचा स्वभावच बनला आहे. जर आता वृक्षारोपण मोहीम वेगाने चालविली नाही तर प्रदूषण हा एक असाध्य रोग बनेल. आज शेतीव्यवसायाचे यांत्रिकीकरण झाले आहे. त्यामुळेही पर्यावरणाचे प्रदूषण होते. 

अधिक उत्पादनासाठी शेतात लाखो टन रासायनिक खते टाकली जातात कीटकनाशके फवारली जातात. वाढत्या शेतीउत्पादनासाठी मानवाला खूप मोठी किंमत चुकवावी लागते. हीच रसायने हळूहळू अन्नाद्वारे आपल्या पोटात जातात व अनेक रोगांचे कारण बनतात. । आजकाल ग्राहकांना आकर्जून घेण्यासाठी फळे, धान्ये इत्यादींना  कृत्रिम रंग दिले जातात. हे रंग आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात.संपूर्ण पृथ्वी प्रदूषित करून मानवाला चैन पडले नाही म्हणून त्याने खाद्य पदार्थही दूषित करण्यास सुखात केली. तापमानाचे प्रदूषण होणे पण मानवासाठी घातक आहे. वातावरणाचे तापमान वाढले की हिमखंड वितळू लागतात. जर बर्फाचे पर्वत वितळू लागले तर संपूर्ण पृथ्वी जलमय होईल. 
ही समस्या सोडविण्यासाठी अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञ विचार करीत आहेत. अनेक प्रत्यत्नानंतर थोडेसे यश मिळाले आहे. दाट लोकसंख्येपासून कारखाने दूर नेले जावेत. विषारी वायू जाण्यासाठी उंच चिमण्या बसविण्यात याव्यात. विषारी वायू बाहेर निघण्यापूर्वीच नष्ट करण्यात यावेत. 
केरकचऱ्याचा उपयोग जमिनीच्या भरावासाठी करण्यात यावा, पिकांवर जास्त प्रमाणात कीटकनाशके फवारू नयेत, नैसर्गिक रूपात धान्य ग्राहकाला मिळावे, गावांतून शहरांकडे जाणाऱ्या बुद्धिजीवींचे पलायन थांबविण्यासाठी गावातच रोजगार उत्पन्न करुन द्यावा. वृक्षतोड बंद करून वृक्षारोपण मोहीम राबवावी. कारखान्यांतील सांडपाण्याचे शुद्धीकरण करावे. वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करावे. बायोडिग्रेडेबल गॅसचा वापर करावा.जगात सर्वात जास्त चर्चा प्रदूषणाची होते. शास्त्रज्ञ प्रदूषण थांबविण्यासाठी नवनवे तंत्रज्ञान विकसित करीत आहेत. प्रत्येकाने या कामात मदत केली पाहिजे. जर असे केले नाही तर स्वर्गापेक्षाही प्रिय असणाऱ्या पृथ्वीची स्थिती कशी होईल ते आपण जाणतोच.

हा  निबंध तुमच्या मित्रमंडळी सोबत व  व्हाट्सअँप ग्रुपवर  शेयर करून लोकसंख्या जनजागृती निर्माण करण्यासाठी हातभार लावावा  हि नम्र  विनंती.  पुढील  निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 3

प्रदूषण एक समस्या:  भौतिक सुखाच्या मागे पळताना प्रदूषण आपला पाठलाग करीत आहे . याकडे आपले लक्ष नसते. आजच्या विज्ञानयुगात प्रगतीचे बोट धरून प्रदूषणाने थैमान घातले आहे. कधी काळी कारखाने , वीज केंद्रे यांपासून माणूस खूप दूर होता . मुक्त निसर्गात मोकळेपणे तो श्वास घेत होता. आता मात्र त्याचा श्वास घुसमटतो आहे. हवेतले ऑक्सीजन कमी झाले आहे कारण प्रदूषित हवा आपल्याला मिळत आहे. 

कारखान्याचे धूर, रसायनांचा गंध , दूषित पाण्याची विल्हेवाट , प्लास्टिक, खते यांचा अतिरेक , जंगलतोड, वाहनांची वाढती संख्या या सर्वांनी मिळून वायूप्रदूषण, जलप्रदूषण, ध्वनिप्रदूषण याबरोबरच मानसिक प्रदूषणाची देणगी आपणास दिली आहे. आपले आरोग्य धोक्यात आणले आहे.५ जून जागतिक पर्यावरणदिन' आणि '२२ एप्रिल-वसुंधरा दिन' म्हणून आपण साजरे करतो. पण खऱ्या अर्थाने प्रत्येकाने प्रदूषण टाळण्याचा प्रयत्न करायला हवा. हवा, अन्न, पाणी दूषित मिळाले तर आरोग्य चांगले कसे राहील? ज्या गोष्टी आपल्या हातात आहे त्या तर आपण करू शकतो ना? वृक्ष लावा-वृक्ष जगवा' हे तत्व आपण स्वीकारावे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा. कचरा इतरत्र न फेकता कचराकुंडीतच टाकावा. धूर होईल असे इंधन लाकडे वगैरे वापरू नये. घर व घराचा परिसरच नव्हे तर आपले गाव , आपला देश स्वच्छ सुंदर कसा राहील, यासाठी आपले प्रयत्न हवेत . So Clean Society चा अहवाल सांगतो. की फक्त एकट्या मुंबईत १७०० टन प्रदूषिते हवेत सोडली जातात. वीस लाख लिटरपेक्षा जास्त सांडपाणी जमा होते. तीन हजार टन गोबरगॅस गोळा होतो. चर्नेबील अणुभट्टीतला स्फोट, भोपाळची वायू दुर्घटना, कर्नाटकमधील दोनशे हत्तींची हत्या व चंदनतस्करी अशा घटना म्हणजे. स्वच्छ पर्यावरणावर गदा होय.

पृथ्वीदिन साजरा होतो. त्याच दिवशी कोलकत्ता येथे प्रचंड प्रमाणावर वृक्षतोड झाली. मध्य प्रदेशातील अभयारण्यात आगी लावण्यात आल्या निसर्ग व मानव यांच्यातले हे युध्द प्रदूषणाने झाकळून आपला विनाश करीत आहे. मास्कोच्या हवेत दरवर्षी दहा लाख टन प्रदूषिते सोडली जातात. दामोदर नदीत चुकीने लाखो टन तेल ओतले गेले हे सर्व काही का होते? बॉम्बस्फोट होतात. तापमानात बदल होतो. ऋतूचक्र उलटे फिरू लागते. एकूण भूपृष्ठाच्या ४०% जंगले हवीत पण भारतात हे प्रमाण ७ ते ८ % आहे. वाढती लोकसंख्या, वाढती वाहने, वाढती कारखानदारी, अपघात , कुजणारी शरीरे , खेड्यातील गटारे, शहरातील वाढती गर्दी या साऱ्या गोष्टींमुळे प्रदूषण वाढत चालले आहे.'हरितश्यामल व निर्मल वसुधा' हवी असेल तर प्रदूषणाचे गंभीर धोके लक्षात घेऊन उपाययोजना झालीच पाहिजे. १९७४ मधील Water Act व १९८१ मधील Clean Air Act ची अंमलबजावणी झालीच पाहिजे . हवेत कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे. ओझोन वायू कमी होत आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी ओझोन आवश्यक आहे. प्रदूषण कमी झालेच पाहिजे. उत्सवात होणारे ध्वनिप्रदूषण आपण टाळले पाहिजे. 

जमीन प्रदूषित करणारी रासायनिक खते, औषधे यांचा अतिरेक नको. प्रत्येकाने एक तरी वृक्ष लावून जोपासले पाहिजे . तसेच माणुसकी जागी ठेवून मानसिक प्रदूषण होऊ न देण्यासाठी जागरूक राहिले पाहिजे तरच या पृथ्वीवर आपण सुखाने नांदू शकू.नियोजनाला कृतीची जोड हवी प्रत्यक्ष कृतीने समस्या सुटते केवळ मनोरथांनी नाही. ही समस्या वैयक्तीक नाही. ती सर्वांची आहे. सर्वांनी मिळून ती सोडवायला हवी. वाढत्या प्रदूषणाने निसर्गाचा समतोल अधिक ढासळला तर भारतासारख्या कृषिप्रधान देशाचे भवितव्य काय? प्रगती व विकास स्वच्छ पर्यावरणानेच शक्य आहे. अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी ते आवश्यक आहे.परिस्थितीच्या अधीन होण्यापेक्षा परिस्थिती बदलणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी खूप प्रयत्न हवेत . प्रदूषणाची गगनचुंबी भिंत पाडून निसर्ग व विज्ञान यांच्या मिलनाने पृथ्वीवर स्वर्ग आणू या .....
प्रदूषण हटवू या.... प्रदूषण पळवू या....

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

२ टिप्पण्या:

  1. मला हा निबंध खूप आवडला या निबंधातूंना खूप छान माहिती मिळाली असे आणखी निबंध वाचण्यासाठी मी खूप उत्सूक आहे

    उत्तर द्याहटवा