रेल्वे स्थानकावरील एक तास निबंध मराठी | Railway Station Varil Ek Taas Marathi Nibandh 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण रेल्वे स्थानकावरील एक तास मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्‍ये  रेल्‍वे प्लॅटफॉर्मवर सामान्‍यपणे घडणाऱ्या  गोष्‍टीचे वर्णन केले आहे.पण सामान्‍य असुनही जिवनाच्‍या विविध पैलुला स्‍पर्श करण्‍याचा प्रयत्‍न यातुन केला  आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

Railway-Station-Varil-Ek-Taas-Marathi-Nibandh
Railway-Station-Varil-Ek-Taas-Marathi-Nibandh" दुपारी चार वाजता पोचत आहे " ताईने मोबाईलवर सांगीतले म्हणून स्टेशनवर गेलो. प्लॅटफॉर्म तिकीट घ्यायला दुसऱ्या  वर्गाच्या खिडकीवर ही गर्दी. पहिल्या वर्गावर मात्र २-३ च होते. समाजाच्या वर्गवारीचं सम्यक् दर्शन झालं. तिकीट घेऊन फलाटावर पाय ठेवला तो “ मुंबईसे आनेवाली १३७ डाऊन एक्सप्रेस एक घंटा देरीसे आयेगी..." ध्वनिवर्धकानं सांगितलं. झालं ! तासभर थांबणंच आलं. वेळ काढायला उगाच भटकत बसलो. 

प्लॅटफॉर्म माणसांनी नुसता फुलला होता. गरीब, मध्यम, श्रीमंत सर्व थरांतील लोक होते. त्यांचे कपडेच बोलत होते. रंगहीन, रंगीबेरंगी, मळकट, जीर्ण, लाजेपुरते तसे झकपक सूटबूट टायही होते. लंकेची पार्वती तशी सालंकृत रमाही ! सप्तरंगी तारुण्य सळसळत होतं तसं वार्धक्याच्या जाळ्यात सापडलेले चेहरेही. लहान निरागस बालकं तसे उगाच केसावरून कंगवा फिरवणारे सख्याहरिही ! माणसांचं म्युझियमच. एवढी माणसं...कशाला प्रवास करत असतील?...मामाच्या गावाला तर कुणी कामाला. नविन  सासुरवाशीण तर कुणी माहेरवाशीण, नोकरीच्या शोधात, कुणी औषधपाण्याला कुणी हवापाण्याला. एकाच्या डोळ्यात पाणी दुसऱ्याच्या ओठी गाणी . 

गर्दीतून चटपटीतपणे " चाय गरमऽ” “ए, वडा, वडा" म्हणत फिरणारे फेरीवाले. हातात, डोक्यावर, खांद्यावर सामान वाहणारे हमाल, 'रस्ता छोडो' म्हणत नसलेल्या जागेतून वाट काढणारे अन् पळत्या गाडीत चढून जागा धरणारे. पांढरी पैंट, निळा ब्लेझरचा कोट, टायवाले टी. सी. हे सारे सराईत आहेत हे न सांगता कळत होतं.

गाडीला अवकाश होता म्हणून काहीजण उपाहारगृहापाशी चहानाष्‍टा करत होते तर पेपर स्टॉलवर  वाचक रेंगाळत होते. कुणी उगीच भिंतीवरचं रेल्वेटाईमटेबल माना वाकडी करून वाचत होते. कुणी वजन काट्यावर 'वजन' करायचा प्रयत्न करीत होते- ' मशीन बंद आहे-' हे न वाचताच ! प्रतीक्षागृहात उच्चभ्रू लोक टाय सावरत India Today वाचत होते. खरं तर ते नुसते बाहेर आले असते तरी India Today ' दिसला असता.

कुठली तरी गाडी शिटी मारत धडाडत येत होती. एक इंजिन कर्कश्य शिटी मारत शंटिंग करत भाव खात होतं. भिंतींवर सिनेमाची भयानक पोस्टर्स होती.  ध्वनिवर्धक तीन भाषांतून गाड्यांची माहिती देत होते. पोर्टर उभ्या गाड्यांची चाकं तपासत होते. घड्याळ बंद होते. गाडीची बेल कधीमधी वाजत होती.  मनात विचार आला, अठरा पगड जातींना पोटात सामावणारी आगगाडी, ही राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीकच आहे. खरं तर जीवन हेही या प्लॅटफॉर्मसारखंच आहे. माणसं येतात कुठून, जातात कुठे काहीच माहीत नसतं. योग्य गाडी मिळेपर्यंत थांबतात ती या प्लॅटफॉर्मवर...आणि हा थांबण्याचा थोडा काळ म्हणजेच जीवन !

आपली वेळ झाली, गाडी मिळाली की झटकन् निघून जातो प्रत्येक जण !! “मुंबईसे आनेवाली १३७ डाऊन प्लॅटफॉर्म नंबर दो पर आ रही है" म्हणत असताच आरडत ओरडत, दिमाखात स्टेशनमध्ये घुसणाऱ्या गाडीकडे सारे धावले. त्यामध्येच नकळत सामावला जाऊन मी ताईला शोधू लागलो.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व रेल्वे स्थानकावर तुम्‍हाला आलेला अनुभव तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत