maza avadta kavi marathi nibandh | माझा आवडता कवी मराठी निबंध

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा आवडता कवी मराठी निबंध बघणार आहोत.  या निबंधामध्ये आपण कवी कुसुमाग्रज यांच्या विषयी माहिती दिली आहे. त्या पुढील निबंधात तुकाराम महाराज यांच्याबद्दल निबंध सादर केला आहे  तर मग सुरूवात करूया निबंधाला

 मुद्दे : 

 • अनेक लेखक आवडीचे 
 • त्यांपैकी एक - वैशिष्ट्ये 
 • इतर समकालीन लेखकांची तुलना
 • त्यांनी लिहिलेले विविध साहित्य
 • विविध साहित्यांमधील काही वैशिष्ट्यपूर्ण वाक्ये किंवा पंक्ती
 • एखादे विशेष पुस्तक - का आवडते त्याचे कारण
 • व्यक्तिरेखा - व्यक्ती व साहित्यिक म्हणून त्यांच्याविषयी वाटणारा आदर

विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज हे कवी तर होतेच त्याचप्रमाणे नाटककार,  कथाकार व वृत्तपत्रलेखकही होते. पण त्यांच्या या सर्व साहित्यिक कलाकृतीतून लक्षात राहतो तो त्यांच्यातला कवीच! मग 'नटसम्राट' नाटकातील बेलवलकर असो, 'कौन्तेया'तील कर्ण असो वा 'स्वप्नांचा सौदागर' या लेखातील चंद्राची जगाशी ओळख करून देणारा ललितलेखक असो; या सर्वांतून कुसुमाग्रजांचा काव्यात्म पिंड कधीच लपून राहत नाही.

maza-avadta-kavi-marathi-nibandh
maza-avadta-kavi-marathi-nibandh'जीवनलहरी' हा कुसुमाग्रजांचा पहिला लहानसा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर 'विशाखा', 'किनारा', 'मराठी माती', 'स्वगत', 'हिमरेषा', 'वादळवेल', 'छंदोमयी' अशा आपल्या काव्यसंग्रहांतून या कविश्रेष्ठाने रसिकांना काव्यामृताचा आस्वाद सातत्याने दिला आहे.

कुसुमाग्रजांच्या कवितेची विशेष खासियत म्हणजे त्यांची कविता श्रेष्ठ टीकाकारांना जशी आवडली, तशी अगदी सामान्य रसिकांनाही आवडली आहे. आपल्या या कवितांना कुसुमाग्रज स्वतः समिधा' म्हणतात -समिधाच सख्या या, त्यात कसा ओलावा 

कोठून फुलापरि वा मकरन्द मिळावा

जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा

तव आन्तर अग्नी क्षणभर तरी फुलवावा.

या काव्यपंक्तीतून कुसुमाग्रजांची विनम्रता प्रत्ययाला येते. त्याचप्रमाणे त्यांच्या काव्यरचनेमागील हेतूही स्पष्ट होतो. सामाजिक विषमतेतील संघर्ष या कवीला सतत अस्वस्थ करतो व तो संघर्ष वेगवेगळ्या प्रतीकांतून प्रभावीपणे व्यक्त होतो. कधी तो संघर्ष उद्दाम' आगगाडी आणि तिच्याखाली चिरडली जाणारी जमीन यांमधील असतो; तर कधी तो उफाळणारा सागर व त्याला आव्हान देणारा कोलंबस यांच्यातील असतो.कुसुमाग्रजांच्या प्रतिभाशक्तीला अजोड अशा तरल कल्पकतेची जोड लाभली आहे. मग ती कधी 'पृथ्वीचे प्रेमगीत' गाऊ लागते; तर कधी 'अहि-नकुलाच्या' रूपकातून भिन्न प्रवृत्तींचा संघर्ष मांडते. कुसुमाग्रजांची काव्यवृत्ती भव्यतेला गवसणी घालू पाहणारी आहे. लोकमान्यांच्या पुतळ्याच्या सान्निध्यात त्यांचे मन म्हणते, "ते होते जीवित अन् हा जीवितभास.' कुसुमाग्रजांच्या मनाला दिव्यत्वाचा, उदात्ततेचा, मृत्युंजयाच्या शोधाचा ध्यास लागलेला होता.

असा हा 'ज्ञानपीठ पुरस्कार' विजेता माझा आवडता कवी अनंतात विलीन झाला. त्यांच्या काव्याचा दीपस्तंभ भविष्यातील हजारो मराठी कवींना प्रेरणादायी मार्गदर्शक म्हणून अनंतकाळ प्रकाश पुरवत राहील.

निबंध 2

majha avadta kavi essay in marathi 

भागवत धर्माचा प्रसार करणारे एकनाथ समाधिस्थ झाले व तुकारामांच्या रूपाने भक्तीचा अधिकच तेजस्वी तारा उदयास आला. तुकाराम महाराज साधे वाणी, अडाणी, मराठा कुलात जन्मले. त्यांच्या घरात विठ्ठलभक्तीची परंपरा होती. लहानपणीच त्यांच्यावर व्यवसायाची जबाबदारी येऊन पडली होती व ती ते यशस्वीपणे पार पाडत होते. लहान वयातच त्यांचे लग्नही झाले होते. परंतु अचानक पडलेल्या दुष्काळच्या तडाख्याने ते हवालदिल झाले. त्यांच्या संसाराची राखरांगोळी झाली.

संसाराच्या काट्याकुट्यांनी रक्तबंबाळ झाल्यावर त्यांच्या मनाला परमार्थाची ओढ लागली. मग मन परमार्थात रम लागले. मग असे वाटू लागले बरे झाले देवा निघाले दिवाळे। बरी या दुष्काळे पीडा केली। समाजापासून, संसारापासून दूर डोंगरावर जाऊन त्यांनी भक्तीचा साधना केली. बाबाजी चैतन्य या गुरूंपासून ‘रामकृष्ण हरी' या मंत्राचा त्यांना लाभ झाला.

शिवाजीमहाराज त्यांच्या कीर्तनाला गेले होते. त्यांनी तुकारामांना नजराणा पाठवला होता. तुकारामांनी तो नाकारला. या 'वैभवाच्या धन्याला' समाजकंटकांकडून खूप त्रास भोगावा लागला होता. परंतु त्यांनी या दांभिकांवर शब्दाचा आसूड मारला होता. संस्कृतमधील ज्ञान मराठीत आणलं म्हणून पंडितांचा राग. म्हणून रामेश्वरभटाने त्यांचे अभंग इंद्रायणीत बुडवले. पांडुरंगाने अभंग तारले.

सर्वसामान्य माणसांना तुकारामांविषयी जिव्हाळा वाटत असे. त्यांच्या कीर्तनाला त्याची खूप गर्दी होत असे. आपल्यासारखाच चुकणारा, विव्हळणारा जीव आता शांती-सुख-आनंदात डुंबत आहे, तुकाराम ज्या पायऱ्या चढून उंच मोकळ्या जागी, स्वच्छ मोकळ्या वातावरणात जाऊन बसले होते, तेथे आपण जावे असे त्यांना वाटे.

संत तुकारामांचे जीवन म्हणजे 'गरुडाचे उड्डाण.' त्यांच्या झेपेकडे पाहून माणूस अवाक् होतो. त्यांच्याबद्दल त्याला विस्मय वाटतो. परंतु साध्या, सोप्या, सरळ भाषेत त्यांनी पिटलेल्या भक्तीच्या डांगोयानं तो तुकारामांचा नकळत अनुयायी बनतो

खरोखर हे कवी तुकाराम ‘आकाशाएवढे' होते. भागवत धर्ममंदिराचा कळस होते. मराठी सारस्वताचे शिखर होते. त्यांच्या अभंगातील आर्तता, खंबीरपणा, निस्सीम भक्ती, मनातील संघर्ष, आध्यत्मिक उंची माझ्या मनाचा ठाव सोडत नाही.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

1 टिप्पणी: