ईद मराठी निबंध | Eid Essay in Marathi

ईद मराठी निबंध | Eid Essay in Marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण ईद  मराठी निबंध बघणार आहोत. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला


भारत हा असा देश आहे जेथे अनेक धर्मांचे लोक एकत्र राहतात. ज्याप्रमाणे हिंदुचे प्रसिद्ध सण दसरा, दिवाळी, होळी   आहेत. त्याचप्रमाणे मुसलमानांचा प्रसिद्ध सण ईद आहे. हा सण वर्षातुन दोनदा साजरा केला जातो. त्यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा सण आहे. मुसलमान धर्माचे संस्थापक महंमद पैगंबर यांच्या जन्मदिवशी हा सण साजरा करतात. महंमद पैगंबराचा जन्म अरबस्तानातील मक्का येथे झाला होता. हजरत साहेबांनी आपल्या कार्याने मुसलमान धर्माला एक मार्ग दाखविला.

मुसलमानांचा पवित्र ग्रंथ 'कुराण' आहे. त्यात पैगंबराचा उपदेश वर्णिला आहे. ईद या धार्मिक सणाची तयारी एक महिना आधीपासून केली जाते. पूर्ण महिनाभर पैगंबराच्या आठवणीत उपवास करतात. दिवसातून पाच वेळा नमाज पढतात. हा महिना रमजानचा महिना असतो. 

रमजानची समाप्ती ईदने होते. यादिवशी मशिदीत जाऊन नमाज पढतात. ईदच्या शुभेच्छा देतात. दुकाने, बाजार ईदच्या दिवशी सजलेले असतात. या जत्रेची शोभा अवर्णनीय असते. या ईदनंतर 'ईद-उल फितर' येते. ईदच्या दिवशी सार्वजनिक सुटी असते. पंतप्रधान व राष्ट्रपती प्रसार माध्यमांद्वारे मुसलमान बांधवांना शुभेच्छा संदेश देतात. 

मुसलमानांसाठी ईद हर्ष, उमेद, देणारा सण आहे. ज्यात सर्व जण शत्रुत्व विसरून एकत्र येतात. एकमेकांच्या यशासाठी प्रार्थना करतात. या शुभप्रसंगी मुसलमान आपल्या नव्या कार्याला आरंभ करतात. ईदचा सण शिकवण देतो की, पैगंबराने दाखविलेल्या मार्गावरच चालावे आणि त्यांच्या उपदेशाचे पालन करावे उच्च-नीच भेदभाव करू नये.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद