होळी वर मराठी निबंध | holi essay in marathi 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण होळी वर मराठी निबंध बघणार आहोत.  या निबंधामध्‍ये होळी या सणाविषयी असणारी ऐतिहासिक माहीती  व आज आपण हा सण कश्‍याप्रकारे साजरा करतो याची सविस्‍तर माहीती दिली आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला

holi-essay-in-marathi
holi-essay-in-marathiभारतात साजरे केले जाणारे विविध सण आपला अमूल्य वारसा आहेत. मन प्रसन्न ठेवण्यासाठी सणांची मदत होते. होळी हिंदूंचा प्रसिद्ध सण आहे. होळी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला येते.

प्रत्येक सणाला काही ना काही ऐतिहासिक पार्श्वभूमी असते. त्याचप्रमाणे होळी लाही स्वत:चा एक इतिहास आहे.

हिरण्यकश्यप नामक एक नास्तिक राजा होता. त्याला आपल्या शक्तीचा फार गर्व होता. त्याने स्वत: ला ईश्वर म्हणून घोषित केले होते. त्याने प्रजेला सांगितले की, प्रजेने त्याची पूजा करावी. जी व्यक्ती त्याची पूजा न करता देवाची पूजा करेल त्याला शिक्षा करण्यात येईल. त्याचा पुत्र प्रल्हाद ईश्वरभक्त होता. त्याने आपल्या पित्यास ईश्वर मानण्यास नकार दिला. हिरण्यकश्यपूने आपल्या पुत्रास ठार मारण्याचे अनेक प्रयत्न केले. परंतु हिरण्यकश्यपूला यश मिळाले नाही. म्हणून त्याने आपली बहीण होलिकाला आपल्या दृष्कृत्यांत सामील करून घेतले.

होलिके जवळ ईश्वराने दिलेले एक असे वस्त्र होते, ज्याला आग जाळू शकत नव्हती. होलिका लाकडांच्या ढीगावर ते वस्त्र परिधान करून, प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसली. मात्र प्रल्हादला भगवान विष्णूचे वरदान मिळाल्याने या आगीत होलिका जळून भस्म झाली पण प्रल्हादाच्या केसालाही धक्का लागला नाही. ही घटना दरवर्षी आपणास पाप आणि अन्यायाची होळी करण्याचा उपदेश करते.होळीचा संबंध भगवान श्रीकृष्णाशी पण आहे. गोप-गोपिकांची होळी फार प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात होळी खेळली जाते. होळीच्या दिवशी लोक आपल्या गल्लीच्या चौकात लाकडे जमा करून खूप उंच होलिका (म्हणजे एक लांब लाकूड) त्या लाकडांच्या ढीगात लावतात. संध्याकाळी स्त्रिया नारळ धूप इत्‍यादीनी होलिकेची पूजा करतात. तिला फेऱ्या घालत दोरा गुंडाळतात. रात्री निश्चित मुहूर्तावर होलिका दहन केले जाते. होळीत गव्हाच्या ओंब्या भाजून मित्रांमध्ये वाटून खातात.होलिका दहनाच्या पाचव्या दिवशी रंगांची होळी असते. त्यात एक वेगळीच मजा व आनंद असतो. तरुण युवकांच्या टोळ्या गात नाचत रस्त्यावर येतात. पाण्यात वेगवेगळे रंग मिसळून एकमेकांच्या अंगावर टाकतात. एकमेकांच्या तोंडाला लाल, गुलाबी, पिवळे रंग लावतात व एकमेकांना मिठ्या मारतात. रंगीबेरंगी चेहरे आणि रंगीबेरंगी कपडे मजेदार दिसतात. सकाळपासूनच बायका फराळाचे पदार्थ व मिठाया बनवू लागतात.प्राचीन काळापासून हा सण साजरा केला जातो. यात लहानापासून थोरापर्यंत सर्वजण उत्‍साहाने भाग घेतात  हा एक असा सण आहे जो जातिभेद, उच्च नीचतेची भावना नष्ट करतो.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद