peacock essay in marathi | राष्ट्रीय पक्षी मोर मराठी निबंध

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण राष्ट्रीय पक्षी मोर मराठी निबंध बघणार आहोत.  या निबंधात मोराबद्दल सवीस्‍तर माहीती दिली आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

peacock-essay-in-marathi
peacock-essay-in-marathi
मोर हा वनातील एक अत्यंत सुंदर, सावध, लाजाळू पण चतुर पक्षी आहे. भारत सरकारने १९६३ मध्ये जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात त्यास राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले. सौंदर्याचे हे मूर्त रूप साऱ्या भारतीयांना फार आवडते. कवी कालिदासाने त्या काळात मोराला राष्ट्रीय पक्ष्याचा दर्जा दिला होता.मोर जेव्हा बेधुंद होऊन नाचतो तेव्हा आपली शेपटी उंचावून पंख्यासारखी पसरवितो. हे दृश्य पाहुन भान हरपते. मोराचे शरीर अनेक रंगांचे असते. त्या रंगांच्या छायांचे एक अद्भुत मिश्रण असते. गळ्याचा आणि छातीचा रंग निळा असतो. गळ्याच्या निळेपणावरून संस्कृत कवी त्याला 'नीलकंठ' म्हणतात.मोर सामान्यपणे पावसाळ्यात नृत्य करतो. खूप लांबून येणाऱ्यांचा आवाज तो ऐकू शकतो. उन्हाळ्यात मोर सुस्तावतात. मोर सापांना मारून खातो. मोर माणसाला त्रास देत नाही. हा सावध आणि भित्रा पक्षी आहे. सामान्यतः कळप करून रहातो. धान्य, किडे व काही भाज्या हे त्याचे अन्न होय. तो काही ऊंचीपर्यंत व अंतरापर्यंतच उडू शकतो. शत्रुपासून बचाव करण्यासाठी त्याला लांब, बारीक परंतु बळकट पाय मिळालेले आहेत.

मोराच्या मादीला लांडोर असे म्हणतात. असा हा आपला राष्ट्रीय पक्षी आपल्या सौंदर्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतो. अनेक मंदिरात देवाला मोरपिसे वाहतात. सजावटीसाठी मोरपिसांना मागणी असते. फुलदाणीत ही मोरपिसे लावतात. त्याचे पंखेही बनवितात. त्याने वारा घेता येतो.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत