वृक्षदिंडी निबंध इन मराठी | vruksha dindi nibandh Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण वृक्षदिंडी निबंध इन मराठी निबंध बघणार आहोत.  या निबंधामध्‍ये पर्यावरणाविषयी जनजागृती व वृक्ष लागवड वाढवण्‍याविषयी शाळेतील मुले कश्‍याप्रकारे वृक्षदिंडी काढुन वृक्षारोपण करतात याविषयी सविस्‍तर माहीती दिली आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला

vruksha-dindi-nibandh-Marathi
vruksha-dindi-nibandh-Marathiपर्यावरणाचा प्रश्न ही आजची जागतिक समस्या झाली आहे. प्रदूषणाचे बळी आपण केव्हा होऊ, हे सांगता येणार नाही. हा धोका ओळखून आमच्या शाळेने विदयार्थ्यांच्या मदतीने प्रदूषणाशी दोन हात करण्याचे ठरवले. वनमहोत्सवाच्या निमित्ताने आमच्या शाळेने 'वृक्षदिंडी'चा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याची तयारी जवळजवळ महिनाभर चालू होती. प्रत्येक विदयार्थ्याला आपल्या घरी एक 'बालवृक्ष' तयार करायला सांगितला होता. कोणी कोणते झाड लावावे, हे प्रत्‍येकजण आपआपल्‍या आवडीप्रमाणे ठरवु शकत होते. 

३० सप्टेंबरला सर्व विदयार्थ्यांना आपण लावलेली रोपे घेऊन सकाळी सातला शाळेत बोलावले होते, कारण त्या दिवशी शाळेतून वृक्षदिंडी निघणार होती. साऱ्या गावात फिरून ती परत शाळेतच येणार होती. शाळेच्या मागच्या मैदानात ही झाडे लावली जाणार होती. ते बालतरू भूमातेच्या स्वाधीन केले जाणार होते.ठरल्याप्रमाणे ३० सप्टेंबरला सकाळी सात वाजताच सर्व विदयार्थी शाळेच्या गणवेशात आपापले बालवृक्ष घेऊन शाळेत हजर होते. आतापर्यंत शाळेतून अनेक प्रसंगी मिरवणुका निघाल्या होत्या; पण आजचा उत्साह अगदी आगळाच होता. कारण आम्ही स्वतः लावलेल्या व काही काळ आम्हीच जोपासलेल्या बालवृक्षांची मिरवणूक होती ती! आजच्या मिरवणुकीत दिल्या जाणाऱ्या घोषणाही आगळ्यावेगळ्या होत्या- 'झाडे लावा, झाडे जगवा, प्रदूषणाचा नाश करा', 'आजचे बालतरू, उदयाचे कल्पतरू !' वृक्षदिंडीत काही विदयार्थ्यांनी वृक्षांसारखे हिरवेगार पोशाख केले होते. त्यांच्या हातांत फलक होते- 

'वृक्षवल्ली आम्हां सोयरी', 

'एक बालक, एक झाड', 

'निसर्ग अमुचा सखा, आम्हां आरोग्य देई फुका!'

त्या बालतरूंचे स्वागत गावातील सारेजण उत्साहाने करत होते. संपूर्ण गावातून फिरत फिरत ही वृक्षदिंडी शाळेच्या मागच्या मैदानात आली. तेथे झाडे लावण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करून ठेवण्यात आली होती. आळी तयार होती. सर्व विदयार्थ्यांनी आपापली झाडे लावली. गुरुजींनी, मुख्याध्यापकांनीही वृक्षारोपणात भाग घेतला आणि काय गंमत ! आकाशाच्या झारीतून त्यांच्यावर पाण्याचा वर्षाव झाला. पळत पळत शाळेच्या इमारतीत शिरलो. पाऊस थांबला. टवटवीत झालेली झाडांची पाने वाऱ्याबरोबर सळसळत होती. जणू ती आनंदाने टाळ्याच पिटत होती.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व पर्यावरण वाचवण्‍यासाठी तुम्‍ही कोणते उपाय वापरता  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

महत्‍वाचे मुद्दे : 

(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

 • पर्यावरणाचा प्रश्न
 • प्रदूषणाचे बळी 
 • झाडे लावण्याची आवश्यकता 
 • वनमहोत्सव 
 • बालवृक्षांची निर्मिती 
 • वृक्षदिंडी 
 • गणवेशात विदयार्थी 
 • इतर मिरवणुकांपेक्षा वेगळी
 • उत्साहाचे वातावरण
 • प्रत्येकाच्या हातात बालतरू वा फलक
 • काही विद्यार्थी वृक्ष बनले होते
 • लोकांच्यात उत्सुकता
 • गावभर जत्रा 
 • पाऊस 
 • त्याचे स्वागत..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत