माझा आवडता खेळ कबड्डी मराठी निबंध | essay on kabaddi in marathi

 माझा आवडता खेळ कबड्डी मराठी निबंध | essay on kabaddi in marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा आवडता खेळ कबड्डी मराठी निबंध बघणार आहोत. कबड्डी बद्दल माहिती घेऊया आणि सुरुवात करूया निबंधाला.   

 

माझा आवडता खेळ कबड्डी जगात विविध प्रकारचे खेळ खेळले जातात, निरनिराळ्या खेळांच्या स्पर्धा भरवल्या जातात. क्रिकेट व फुटबॉल, टेनिस यांसारखे खेळांच्या स्पर्धा जगभरातील लोक आवडीने पहातात. क्रिकेट, हॉकी फुटबॉल कितीही लोकप्रिय खेळ असले तरी माझा प्रिय खेळ कबड्डी आहे. हा खेळ आजही गावांत, गल्लीत, शहरातील शाळेत खेळला जातो. प्रत्येक खेळाप्रमाणे कबड्डीत मनोरंजनाबरोबरच व्यायाम पण होतो. अन्य खेळांप्रमाणे याला भारी खेळाच्या सामानाची गरज नसते. 


भारतात प्राचीन काळापासून कबड्डी हा लोकप्रिय खेळ आहे, कबड़ीसाठी फक्त एक क्रीडांगण पाहिजे जे आयताकार साडेबारा मीटर लांब व दहा मीटर रुंद असावे. हा सांघिक खेळ आहे. यात दोन संघ असतात. प्रत्येक संघात १२/१२ खेळाडू असतात. दोन्ही संघाचे खेळाडू भिन्न रंगाचे वेश घालतात. त्यामुळे कोणता खेळाडू कोणत्या संघाचा आहे हे ओळखता येते.(हा निबंध पण वाचा माझा आवडता खेळ  क्रिकेट मराठी निबंध)


 दोन्ही संघांचे संघ कॅप्टन असतात. खेळ सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांच्या खेळाडूंचा एकमेकांशी परिचय करून दिला जातो. नाणेफेक करून टॉस केला जातो. नंतर सामना सुरू होतो.  नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम दुसऱ्या संघावर आक्रमण करतो. परंतु सगळे खेळाडू एकदमच मैदानावर येत नाहीत.


आधी सात खेळाडू मैदानात येतात. सर्वात आक्रमक खेळाडू कबड्डी कबड्डी म्हणत विरोधी संघाकडे जातो. आणि त्यातील खेळाडूंना स्पर्श करून दम न सोडता, नियमांचे उल्लंघन न करता आपल्या भागात परत येतो. जर तो सुरक्षित परतला तर विरोधी संघाच्या जितक्या खेळाडूंना त्याने स्पर्श केला ते सगळे बाद समजले जातात. जितके खेळाडू बाद होतात तितके गुण विजयी संघाला मिळतात.


जर खेळाडू विरोधी भागात असेल आणि त्याचा दम मध्येच सुटला तर तो खेळाडू बाद मानला जातो. तसेच विरुद्ध भागात आलेल्या खेळाडूला त्या संघाचे सर्व खेळाडू मिळून पकडण्याचा व बाद करण्याचा प्रयत्न करतात. खेळाचा अवधी ५० मिनीटांचा असतो. जिंकलेल्या संघाला ट्रॉफी देऊन सन्मानित करतात. कबड्डीद्वारे शारीरिक विकासाबरोबरच मानसिक विकास पण होतो. 


नियमानुसार खेळल्यामुळे शिस्त आणि नियम पाळण्याची प्रवृत्ती उत्पन्न होते. शाळा-महाविद्यालयांत या खेळाचे महत्त्व वाढत आहे. राष्ट्रीय पातळीवर पण कबड्डीचे सामने होतात. लवकरच या खेळाला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळेल.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

1 टिप्पणी: