सीमेवरील जवानाचे सैनिकाचे मनोगत मराठी निबंध | Essay On Soldier In Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण " सैन्यदलातील युवकाचे मनोगत" मराठी निबंध बघणार आहोत. कडाक्याच्या थंडीतही व कितीही विपरीत परिस्थितीत आपल्या जीवाची पर्वा न करता भारत मातेचे रक्षण करणाऱ्या सैनिकाला अभिवादन करूया आणि सुरुवात करुया निबंधाला
भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी घोषणा केली – 'जय जवान, जय किसान'. आम्ही जवान आणि किसान दोघेही देशाचे महत्त्वाचे घटक आहोत, याची जाणीव त्यामुळे झाली. आज मी एक जवान या नात्याने तुमच्यापुढे माझे मनोगत व्यक्त करणार आहे. माझी आत्मकथा रंगभरी नसून रोमहर्षक आहे. त्यात विलास नाही, तर साहस आहे; कारण मी भारतीय जवान आहे. माझा जन्म झाला, तो एका पहाडी प्रदेशात. आमच्या गावात शेती-व्यवसाय करण्यासाठी जमीन नाही; त्यामुळे आमच्या प्रदेशातील अनेक तरुण सैन्यात भरती होतात.
माझे वडीलदेखील सैनिकच होते. त्यांनी कित्येक वर्षे देशसेवाच केली आहे. मी लहानपणीच ठरवले होते की, सैन्यातच जायचे. म्हणून मी लहानपणापासूनच घोड्यावर बसण्याचा सराव केला. पहाडी प्रदेशातच लहानपण गेल्यामुळे पहाडावर चढणे मला विशेष कठीण वाटले नाही. मी पोहायलाही शिकलो.
डेहराडून येथील सैनिकी शाळेत मी सैनिकी शिक्षण घेतले. तेथे रायफल, बंदूक, तोफ कशी चालवायची, याचे शिक्षण मिळाले. मोटार आणि ट्रक-ड्राइव्हिंगमध्ये अनेक प्रमाणपत्रे मिळविली. नंतर मी सैन्यात भरती झालो.युद्धप्रसंगी प्रत्यक्ष लढावे लागते. पण जेव्हा शांततेचा काळ असतो, तेव्हा आम्हाला देशाच्या सरहद्दीचे रक्षण करावे लागते.
'हिंदी-चीनी भाई भाई' अशा घोषणा करीत चीनने भारतावर आक्रमण केले होते. तेव्हा त्यांच्या अचानक झालेल्या हल्ल्याला चोख उत्तर देण्यासाठी आमची एक तुकडी तिथेच सज्ज होती. बर्फाळ प्रदेशात आम्ही चौक्या उभ्या केल्या; मोठमोठ्या छावण्या उभ्या केल्या. चीनी सैनिकांजवळ आधुनिक शस्त्रास्त्रे होती. शिवाय, त्यांनी पूर्ण तयारीनिशी हल्ला केलेला होता. आम्हाला गाफील ठेवून केलेला हल्ला परतविणे मोठे जिकिरीचे होते.
एक दिवस आम्ही पहारा देत होतो. अचानक शत्रूनी चढाई केली. त्या दिवशी मी प्राण पणाला लावून एकट्याने पंचवीस सैनिकांना यमसदनाला पाठविले. ही कामगिरी केल्याबद्दल माझा गौरव झाला. त्या वेळी मात्र वाटले नव्हते, की मी सहीसलामत या हल्ल्यातून बाहेर पडेन. चीन-भारत युद्धविराम झाला होता.
माझी पत्नी आणि माझा छोटा मुलगा यांचा तर डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता, की खरेच मी घरी परतलोय. गावातील लोक माझे अनुभव ऐकण्यासाठी उत्सुक होते. सुखाचे दिवस पटकन संपतात. परत काही दिवसांतच मला सीमेवर परतावे लागले. पाकिस्ताने काश्मिरवर आक्रमण केले होते. देशाच्या सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी आम्हा जवानांची.
पाक सैनिकांशी लढताना माझ्या उजव्या पायाला गोळी लागली. पण त्याही वेळेस मी पराक्रमाची शर्थ केली होती. माझ्या शौर्याबद्दल मला भारत सरकारने 'वीरचक्र' देऊन सन्मानित केले. माझ्या देशवासी बांधवांनो, मला तुम्हाला एवढेच सांगायचे आहे की, आम्ही जवान सीमांचे रक्षण करतो; म्हणून तुम्ही सगळे सुखाने जगत असता. तुमच्या सुरक्षिततेसाठी आम्ही आमचे प्राण पणाला लावतो. आम्ही आमच्या घरा-दारावर अक्षरश: तुळशीपत्र ठेवलेले असते.
“भारतीय नागरिकांचा घास रोज अडतो ओठी सैनिकहो तुमच्यासाठी..." या गाण्याच्या ओळी आम्हाला बळ देतात; आम्हाला लढण्याचे सामर्थ्य देतात.
युद्धभूमीवर गेल्यावर कोणत्याही क्षणाचा भरवसा नसतो. कोणत्याही क्षणी प्राण गमावण्याची शक्यता अधिक असते. तरीही आम्ही आमचा देश, आमचे बांधव असे स्वत:ला बजावत प्राणपणाने हल्ले परतवतो. फक्त आमच्या शहीद होण्यामुळे देशाचे रक्षण होत असले, तरी आमच्या मुलाबाळांना, कुटुंबियांना मदतीचा हात द्या. त्यांना आपले म्हणा. त्यांना वाऱ्यावर सोडू नका, एवढीच विनंती.
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला व आपल्या भारत देशाबद्दल असलेले प्रेम तुम्ही कमेंट करून सांगू शकता. व हा निबंध शेयर करून तुम्ही आपल्या सैनिकाला पाठींबा देऊ शकता. जयहिंद ! भारतमाता की जय!
😍😍😍😍😍😍
उत्तर द्याहटवाbharat mata ki jay
उत्तर द्याहटवाBharat mata ki jay ,
उत्तर द्याहटवाJay जवान jay किसान
ek number,
उत्तर द्याहटवाvande matram
जय जवान जय किसान भारत माता की जय
उत्तर द्याहटवावंदे मातरम् वंदे मातरम् वंदे मातरम्
मुझे गर्व है की मैं हिंदुस्तानी हु