मीच माझ्या भाग्याचा शिल्पकार मराठी निबंध | mich mazya bhagyacha shilpkar marathi nibandh

मीच माझ्या भाग्याचा शिल्पकार मराठी निबंध | mich mazya bhagyacha shilpkar marathi nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मीच माझ्या भाग्याचा शिल्पकार मराठी निबंध बघणार आहोत.  

काही लोकांना दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची सवय असते. 'जो दुसऱ्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला' हे ते जाणत नाहीत. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या बांधवांना नेहमी सांगत की, तुमचा विकास तुम्ही स्वत:च केला पाहिजे. दुसरा कोणी येईल आणि आमचा उद्धार करील, म्हणून तुम्ही थांबून राहिलात तर तुमची प्रगती केव्हाही होणार नाही. स्वतःचे भाग्य स्वत:च घडवा.

परावलंबी असण्याचा आणखी एक प्रकार आहे. काही माणसे नशिबावर, दैवावर हवाला ठेवतात. आपले नशीब चांगले असेल, तर आपल्याला सुख मिळेल. देव येऊन आपल्या अडचणी दूर करील, अशी त्यांची विचारसरणी असते. पण हे चूक आहे. आपण प्रामाणिक प्रयत्न केला, तरच आपल्याला हवे ते फळ मिळेल. आपण सुखी होऊ, 


आपल्या कृती जशा असतात, तसे त्यांचे परिणाम असतात. आपण सतत दुष्टपणाने वागत असू, तर आपले मन वाईट विचारांनी, वाईट भावनांनी व्यापलेले राहते. अशा स्थितीत आपले मन शांत, समाधानी, तृप्त राहूच शकणार नाही. आपण सतत सत्कृत्ये करत राहिलो, तर मन समाधानी राहील. मनाला अस्वस्थता लाभणार नाही. म्हणजे आपले भवितव्य, आपले भाग्य आपल्याच हातात असते. हेच तत्त्व या उक्तीमध्ये सांगितले आहे.

 "नर करणी करे तो नरका 'नारायण' हो जाय" या वचनाचा आशयही हाच आहे.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद