माझे कुटुंब निबंध मराठी | maze kutumb essay in marathi

माझे कुटुंब निबंध मराठी | maze kutumb essay in marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझे कुटुंब मराठी निबंध बघणार आहोत. माझे कुटुंब लहान पण अतिशय छान आहे. माझी आई, वडील, मोठा भाऊ आणि माझी आजी व मी असे पाच जण राहतो. माझा भाऊ माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे. आम्ही दोघे एकाच शाळेत शिकतो. माझा भाऊ सातवीत आणि मी पाचवीत आहे. आमची शाळा घराजवळ असल्यामुळे आम्ही पायीच शाळेत जातो.


माझे वडील जिल्हाधिकारी कार्यालयात काम करतात. कार्यालयात ते बसने जातात व बसनेच परत येतात. माझी आई शिक्षिका आहे. तिची शाळा घरापासून लांब असल्यामुळे ती रिक्षाने जाणे येणे करते. घरातील सर्व कामे ती स्वत: करते. संध्याकाळी आम्ही सगळे मिळून फिरावयास बागेत जातो. तिथे आई बाबा आमच्याबरोबर वेगवेगळे खेळ खेळतात. विनोद ऐकवून हसवितात आणि कविताही म्हणून दाखवितात. माझी आई रामायण व महाभारतातील गोष्टी सांगते.


आमच्या घरातील वातावरण शांत आहे. कुणीच आपापसांत भांडणे करीत नाहीत. सर्व जण मिळून घरातील अडचणी सोडवितो. घरातील महत्त्वाचे निर्णय आजीच्या सल्ल्यानुसार घेतले जातात. आजीचे म्हणणे प्रत्येक जण ऐकतो. ती वृद्ध असल्यामुळे सर्व जण तिची सेवा करतात.


शाळेला सुट्ट्या लागल्यावर बाबा आम्हाला प्रेक्षणीय स्थळी प्रवासाला घेऊन जातात. घरातील प्रत्येक जण एकमेकांशी प्रेमाने बोलतात. आई-बाबा आमच्यावर खुप प्रेम करतात, आम्ही पण त्यांच्यावर तितकेच प्रेम करतो. सणांच्या वेळी बाबा आम्हाला नवे कपडे शिवतात, माझी आई घरीच वेगवेगळे व चविष्ट पदार्थ बनविते. आमच्याकडे आमचे नातेवाईक नेहमी येतात. कधी आम्ही सर्व जण आमच्या काकांकडे जातो. 


आम्ही शाकाहारी जेवण घेतो. आमचे आई बाबा आमचे वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरे करतात. मित्रांना बोलावतात. आम्ही आई-बाबांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतो. आजी यावेळी खुपच आनंदात असते. असा आमचा आनंदी परिवार आहे. मला माझा परिवार खूप आवडतो.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

1 टिप्पणी: