शाळेतील स्नेहसंमेलन निबंध मराठी | Shaletil snehasamelan essay in marathi

 शाळेतील स्नेहसंमेलन निबंध मराठी |  Shaletil snehasamelan essay in marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण शाळेतील स्नेहसंमेलन  मराठी निबंध बघणार आहोत. या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. शाळेतील गोड आठवणींपैकी एक आठवण म्हणजे शाळेतील स्नेहसंमेलन. साधारणतः दिवाळीची सुट्टी संपली की स्नेहसंमेलनाचे वारे वाहू लागतात. स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने जे अनेक कार्यक्रम आयोजित केले गेलेले असतात, त्यांत प्रत्येक विदयार्थी कुठे ना कुठे सहभागी झालेला असतो. त्यामुळे खऱ्या अर्थाने हे संमेलन सर्वांचे होते.


संमेलनाचे कार्यक्रम साधारणतः चार-पाच दिवस चालतात. त्यामुळे त्या आठवड्यात अभ्यासाला सुट्टी मिळते. सगळीकडे नुसता आनंदीआनंद, जल्लोष असतो. स्नेहसंमेलन व्यवस्थित पार पडावे म्हणून वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्या जातात. त्यांत मार्गदर्शक-शिक्षकांसह विदयार्थ्यांचा समावेश असतो. त्यामुळे संमेलनाच्या निमित्ताने विदयार्थी अनेक नव्या गोष्टी शिकतात.


संमेलनातील सर्वांत महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे विदयार्थ्यांनी बसवलेले नाटक. या नाटकाची निवड, पात्रांची निवड, त्यांची चालणारी तालीम या सर्व गोष्टींबाबत सर्व विदयार्थ्यांना उत्सुकता असते. याशिवाय वर्गांचे कार्यक्रम, वैयक्तिक कार्यक्रमही होतात आणि त्यांत भाग घेतलेल्यांना विविध पारितोषिके दिली जातात. अशा कार्यक्रमांतूनच भावी कलाकार पुढे येतात.


स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने शाळेत स्वच्छता आणि सजावट केली जाते. व्यासपीठ सजवण्यासाठी अनेक विदयार्थी कलाशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अप्रतिम सजावट करण्यात गुंतलेले असतात. मुख्याध्यापकांनी केलेली प्रशंसा आणि इतर शिक्षकांनी व दोस्तांनी पाठीवर दिलेली शाबासकीची थाप यांमुळे त्यांना खूप समाधान लाभते.


या स्नेहसंमेलनात पारितोषिकांचे वार्षिक वितरण होते. यासाठी पालकांनाही आमंत्रित केलेले असते. त्या निमित्ताने शाळेत कला व विज्ञान प्रदर्शने भरवली जातात. प्रदर्शनांत विदयार्थ्यांची वर्षभराची सर्व मेहनत प्रत्ययाला येते. या प्रदर्शनांतील मार्गदर्शकाची, माहिती देण्याची सर्व जबाबदारीही विदयार्थीच सांभाळत असतात

.

" स्नेहसंमेलनात सर्वांचा आवडता कार्यक्रम म्हणजे विदयार्थी, शिक्षक व इतर कर्मचारी यांचे सहभोजन. येथेही विदयार्थ्यांची खूप मदत होते. या सहभोजनाने या मधुर संमेलनाची सांगता होते. पण त्याच्या गोड आठवणी मनात दीर्घकाळपर्यंत रेंगाळत असतात.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद  पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


महत्‍वाचे मुद्दे : 

(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

मुददे : 

  1. शाळेतील रम्य आठवणींपैकी एक 
  2. स्नेहसंमेलन
  3. सर्वांचा सहभाग कोणत्या ना कोणत्या स्वरूपात 
  4. विविध स्पर्धा- वेगवेगळ्या समित्या 
  5. शिक्षकांचे मार्गदर्शन
  6. विदयार्थ्यांनी सादर केलेले नाटक
  7. विविध गुणदर्शन
  8. कार्यक्रम पार पाडणारे विद्यार्थी उदयाचे कलाकार 
  9. सभाधीटपणा 
  10. प्रदर्शने
  11. पारितोषिक वितरण 
  12. सहभोजन
  13. आनंद द्विगुणित
  14. संमेलन संपत आले की वाटणारी हुरहूर.

निबंध 2 

 शाळेतील स्नेहसंमेलन निबंध मराठी |  Shaletil snehasamelan essay in marathi



यंदाचे दहावीचे वर्ष म्हणजे आमच्या शालेय जीवनातील शेवटचे वर्ष.  तेव्हा मी आणि माझ्या मित्रांनी वार्षिक स्नेहसंमेलनात प्रत्यक्ष सहभागी व्हायचे आणि हे स्नेहसंमेलन गाजवायचेच असे ठरवले. स्नेहसंमेलनापूर्वी विदयार्थिप्रतिनिधींची निवड केली जाते. ठरल्याप्रमाणे माझ्या मित्रांनी माझे नाव सुचवले आणि माझी बिनविरोध निवड झाली. हा पहिलाच जय मित्रांना पार्टी देऊन साजरा केला.



मी विदयार्थिप्रतिनिधी बनल्यामुळे स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने मुख्याध्यापकांनी ज्या विविध सभा घेतल्या, त्या प्रत्येक सभेत मला सहभागी केले गेले. पुढे प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी मुख्याध्यापक, प्रमुख पाहुणे यांच्याबरोबर मला व्यासपीठावर बसावयास मिळाले. 


अतिशय सुंदर असा एक मोठा बॅज मला प्रत्येक वेळी कोटावर लावावा लागे. त्यामुळे अभिमानाने माझी छाती फुगलेली असे. त्या स्नेहसंमेलनात मी भरपूर भाव खाऊन घेतला. प्रत्यक्ष संमेलनापूर्वी खेळांच्या व इतरही खूप स्पर्धा झाल्या. या सर्व स्पर्धांत आमच्या वर्गाने ठरवून भरपूर बक्षिसे मिळवली. 


संमेलनाच्या निमित्ताने आम्ही सर्व मित्रांनी मिळून वादयवृंदाचा एक सुरेख कार्यक्रम बसवला होता. सर्व शिक्षकांनी आमच्या कार्यक्रमाचे खूप कौतुक केले. वार्षिक स्नेहसंमेलनातील सर्वांत महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे पारितोषिक वितरण समारंभ. 


या समारंभाला पालक व बाहेरचे इतरही पाहुणे येतात. हा कार्यक्रमही उत्तम प्रकारे पार पडल्यावर मुख्याध्यापकांनी माझे खूप कौतुक केले. त्यामुळे हे शालेय स्नेहसंमेलन आमच्या चांगलेच लक्षात राहिले. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद



[शब्दार्थ : स्नेहसंमेलन - annual gathering. वार्षिकोत्सव. वार्षिक समारोह। अभिमानाने छाती फुगलेली असे - was full of pride. अभिमानथी छाती २0१४२४ सवी, गर्व थवो. गर्व से सीना फूल उठा। भाव खाऊन घेतला- prided myself on my position and enjoyed a lot, showed off. भूक भानंद भावो . इतराया, शान बघारी। ठरवून - with determination. नीरीने. निश्चय करके, दृढ़ संकल्प से। वादयवृंद-orchestra. वाद्यवृंह. बाजों का समूह।]