स्वातंत्र्य सैनिकांचे मनोगत मराठी निबंध | swatantra sainik manogat essay in marathi

स्वातंत्र्य सैनिकांचे मनोगत मराठी निबंध | swatantra sainik manogat  essay in marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण स्वातंत्र्य सैनिकांचे मनोगत मराठी निबंध बघणार आहोत.  स्वतःच्या आयुष्याची पर्वा न करता देशाला परकीय गुलामगिरीपासून स्वतंत्र करण्यासाठी स्वातंत्र लढ्यामध्ये भाग घेतलेला स्वतंत्र सैनिक जेव्हा आज भारताला या स्थितीत बघतो तेव्हा त्यांचा जीव कासावीस होतो. भगतसिंग, सुखदेव , राजगुरू यासारख्या वीरांना विसरून आपण काय चूक करत आहोत . हे तुम्हाला निबंध संपूर्ण वाचल्यावर लक्षात येणारच . चला तर मग सुरूवात करूया निबंधाला." आज स्वातंत्र्यदिन! मुलांनो, याचसाठी केला होता अट्टाहास पारतंत्र्याला झुगारून देण्यासाठी तन मन धनाने देशाला समर्पित झालेले देशभक्त .... त्यांचे सळसळते रक्त.... त्यांचे देश कार्य..... त्यांचे देशप्रेम..... त्यांची निष्ठा..... हसत हसत मृत्यूला कवटाळणारे , देशासाठी बलिदान देणारे वीर जवान..... तो काळ मला आजही आठवतो.प्रत्येक जणाच्या ओठी फक्त 'स्वातंत्र्य' ही तीन अक्षरे होती.फार रोमांचकारी दिवस होते ते!''


“माझे शालेय दिवस म्हणजे स्वातंत्र्य लढ्याचा काळ देशाची मिठाची चळवळ जोरात चालू होती. १९४२ च्या आंदोलनाच्या दिवसात मी महाविद्यालयात होतो. करू वा मरू' चा महामंत्र घेऊन आम्ही 'चले जाव' ची घोषणा देत होतो,अनेकांना लाठ्यांचा मार बसला.आम्ही कलेक्टर कचेरीवर तिरंगा फडकावला.आम्हाला कारावासाची शिक्षा झाली. कारावास हे विद्यापीठ आहे' हे मनाला पटले.खूप काही शिकायला ही मिळाले."


हिंसक लढ्याने जोर घेतला होता . शाळा-कॉलेजेस ओस पडत होती.सरकारला शक्य त्या मार्गाने विरोध चालू होता. दारूगोळा , गाड्या उडविणे हे प्रकार चालूच होते.एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार ....... अशी माणसे पेटून उठली होती. स्वातंत्र्य लढ्याचा हा मार्ग खडतर होता. देशभक्तीने मंतरलेली माणसे एकत्र आली होती. गरीब , श्रीमंत , धर्म , पंथ, जाती हा भेदाभेद उरला नव्हता.सर्व नेत्यांना अटक झाली तरी चळवळीचे उधाण थंडावले नव्हते. कठोर शिक्षा हसतमुखाने झेलणारे देशभक्त तेंव्हा होते. लोकांना मान्य असे कार्य करणारे लोकमान्य टिळक , सत्य - अहिंसेचे पुजारी महात्मा गांधीजींसारखे नेते देशाला लाभले होते. स्वातंत्र्यासाठी सारे अहोरात्र झटत होते.''अखेर स्वातंत्र्याचे क्षण मखमली मुठीत घेऊन तो दिवस उगवला.१५ ऑगस्ट १९४७. स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले.स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे.मानवता , समता व विश्वबंधुत्व यांचा मिलाफ म्हणजे स्वातंत्र्य होय.स्वार्थापलीकडे जाऊन स्वत:बरोबर इतरांनाही स्वातंत्र्याचे सुख मिळावे, ही तळमळ माझ्यासारख्या स्वातंत्र्यसैनिकांच्या मनात होती व आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर , राजगुरू, सुखदेव, भगतसिंग यांनी देशासाठी प्रत्येक श्वास बहाल केला.त्यांच्या त्यागाचे विस्मरण आजच्या पिढीस झाले आहे.ही खंत मनाला बोचते. 


आज स्वार्थ , भ्रष्टाचार, लूट , फसवणूक , मतलबी राजकारण यांचा विळखा स्वातंत्र्याची गळपेची करत आहे.शूद्र स्वार्थ हा सिंहासनी बसून स्वतंत्रतेला कैदी बनवू पाहत आहे. खरे तर खऱ्या स्वातंत्र्याचा उपासक पोपटाला पिंजऱ्यात अडकवून ठेवत नाही. आजची स्थिती पाहून माझा जीव कासावीस होत आहे.''


'हाती आलेल्या स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी देशभक्तीचे व्रत तुम्ही घेणार असाल तर हे शक्य आहे. सत्ता स्पर्धा व स्वार्थ यांच्या मगरमिठीतून भारतभू ला मुक्त करा ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे.


 भारताचा इतिहास, भूतकाळातील देशभक्तांचे बलिदान , भारतीय संस्कृती याचा विसर होऊ न देता, माझ्या बांधवांनो जागे व्हा. देशाला सुजलाम् सुफलाम् होऊ द्या.पारतंत्र्याच्या शृंखलेइतक्याच घट्ट भ्रष्टाचार , दारिद्र्य , स्वार्थ यांच्या बेड्या झुगारून द्या. माणूस बना! 'भारत भू' ची लाज राखा हीच विनंती .

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

1 टिप्पणी: