वृद्धाचे मनोगत मराठी निबंध | vrudhachi manogat atmakatha in marathi nibandh

वृद्धाचे मनोगत मराठी निबंध | vrudhachi manogat atmakatha in marathi nibandh


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण वृद्धाचे मनोगत  मराठी निबंध बघणार आहोत.या लेखामध्ये ऐकून 4 निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. या निबंधामध्ये सर्व कुटुंबासोबत राहूनसुद्धा एकट्या पडलेल्या आजी कशाप्रकारे  मनोगत सांगत आहे  व त्या दुःखातून सावरत ती कशाप्रकारे ती स्वतःचे जीवन जगत आहे याची माहिती निबंधामध्ये दिली आहे. या बद्दल आणखी माहिती घेऊया आणि सुरुवात करूया निबंधाला.  


बालपण सर्वांच्या आवडीचे, म्हातारपण ते नावडीचे पण अनुभव समृध्द असे, वेगळे महत्त्व म्हातारपणाचे बाळांनो, आज मी तुम्हाला नेहमी प्रमाणे राजा राणी किंवा परीची गोष्ट न सांगता माझी स्वत:चीच कहाणी सांगणार आहे. आज तुमच्या समोर जे माझं रुप दिसते आहे ते म्हातारीचं आहे. माझं सर्व शरीर, जे तरुणपणी अतिशय सुंदर दिसत होतं आज त्यावर सर्व सुरकुत्या पडलेल्या आहेत. केस जे अतिशय काळेशार व लांब होते आज पांढरे व केवळ वितभर राहिले आहेत. तरुणपणी सुंदर दिसणाऱ्या या डोळ्यांनी आज मला निट दिसत नाही. 



तरुणपणी दिवसभर काम करुनही न थकणारे हे शरीर आता मात्र थकल आहे. त्याला मदतीची गरज आहे. माझी कार्यक्षमता कमी झाली. परंतु असे असले तरी मी हिम्मत सोडली नाही.माझे शरीर थकले असले तरी मन मात्र ताजेतवानेच आहे. ह्या वयात खरे तर मदतीची गरज असते. मला मदत करायला कुणालाही वेळ नाही. सुरुवातीला मला खूप वाईट वाटायचं. परंतु मी विचार केला की कुढत बसण्यापेक्षा व कुणाच्या मदतीची अपेक्षा ठेवल्या पेक्षा आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपणच आपली कामे का करु नये?



स्वत:ची कामे करण्यात वेळ निघून जातो. त्यामुळे मला एकटेपण आठवत नाही. माझा मुलगा आहे, नातवंड आहेत. मुलगा त्याच्या प्रपंचाची जुळवाजुळव करण्यात गुंतला आहे. त्यामुळे त्याला माझ्या करिता वेळ नाही. कधी कधी माझ्यातील आईचं प्रेम कासावीस होत. बालपणी माझ्या कुशीत दडायचा, घरभर माझ्या पदराला धरुन फिरायचा आजही त्याने तसेच माझ्याजवळ बसावं. मी त्याला भरभरुन आईचं प्रेम द्यावं असे वाटते. परंतु मुलगा मोठा झाला असल्यामुळे त्याला माझ्या प्रेमाची गरज उरली नाही.



मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवते. तो प्रसन्न दिसला तर माझं मन सुध्दा प्रसन्न होते. तो दुःखी दिसला तर मला सुध्दा वेदना होतात. नातवंड केवळ एखाद्या वेळेसच माझ्याकडे येतात. कुटूंबात राहून सुध्दा मी एकटी आहे. असे असले तरी मी दुःखी नाही. माझ्या एकटेपणावर मी अतिशय छान उपाय शोधून काढला आहे. मी खूप सारी पुस्तके विकत घेतली आहेत. त्यात संत महात्म्यांच्या ग्रंथांचे भांडार आहे.वैज्ञानिक,विचारवंत व समाजसुधारकांची पुस्तके आहेत.



माझ्याकडील ग्रंथ हे माझे धन आहे. ही सर्व पुस्तके मला माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत पुरतील एवढी आहेत. ही पुस्तके खरे तर मी या आधीच वाचायला पाहिजे होती परंतु संसार प्रपंचामुळे वेळ मिळाला नाही. प्रत्येक वृद्धाने अशा प्रकारे आपल्या फावल्या वेळेचा सदुपयोग करावा. कुटुंबाच्या प्रेमाची अपेक्षा न करता. कारण पुस्तकापेक्षा गुणी मित्र कुणीच नाही.तसेच भुतकाळातील गोड स्मृतींना उजाळा देण्यात वेळ सहज जातो.

नका कंटाळू म्हातारपणास, नका घाबरु त्याला। 

धैर्याने व आनंदाने,सामोरे जा त्याला।।

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद  पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



निबंध 2 

वृद्धाचे मनोगत मराठी निबंध | vrudhachi manogat atmakatha in marathi nibandh


कर्जत येथील वृद्धाश्रमात भेटलेले एक वृद्ध गृहस्थ आमच्याशी बोलत होते. त्यांनी वयाची सत्तरी ओलांडलेली आहे; पण त्यांच्यातील तडफ मात्र वाखाणण्यासारखी होती. ते गृहस्थ म्हणजे श्री. वैदय आम्हांला सांगू लागले, "मी या संस्थेत आपण होऊन आलो आहे. 


मला कोणीही येथे आणून टाकलेले नाही. पण या संस्थेत राहणारी बहुतेक मंडळी ही मनाविरुद्ध येथे राहत आहेत. "मी तीस वर्षे सरकारी नोकरी केली. मला निवृत्तिवेतन मिळते. माझी प्रकृती व्यवस्थित आहे. माझी दोन्ही मुले परदेशात राहतात. 


मी निवृत्त झाल्यावर काही काळ त्यांच्याकडे गेलोही होतो. जेव्हा माझी नातवंडे लहान होती, तेव्हा त्यांची देखभाल मी केली. आता ती मोठी झालीत. त्यांना माझी आवश्यकता राहिली नाही. तेव्हा मला त्या वातावरणाचा कंटाळा आला आणि मग माझ्या मुलांचा निरोप घेऊन मी भारतात परत आलो. 


आपण शेवटपर्यंत इतरांना मदत करावी, या विचारानेच मी येथे राहतो. "बहुतेक वृद्ध हे म्हातारपणाला कंटाळलेले असतात. यांतील बहुतेक मंडळी आपल्या मनाची उमेदच हरवून बसलेली असतात. शरीर थकले की त्यांना वाटते, आपण इतरांना ओझे झालो आहोत. 


मग ते अधिकच खचतात. पण माणसाने असा विचार करू नये. खरं पाहता, हे जग किती सुंदर आहे ! त्यांनी आपल्याला आवडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींतून आनंद मिळवावा. आपण निरुपयोगी आहोत, हा विचारच मनातून काढून टाकावा म्हणजे, हरवलेला आनंद त्यांना मिळेल."


वैदय आजोबांचे विचार मला पटले आणि मनात आले, प्रत्येकाने असा विचार केला तर म्हातारपण किती सुंदर होईल बरे ! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


[शब्दार्थ : तडफ- zest, zeal. उत्सा, होश. उत्साह, जोश। वाखाणण्यासारखी- praiseworthy, admirable. quq योग्य. प्रशंसायोग्य। निवृत्तिवेतनpension. निवृत्ति वेतन, पेन्शन. पेंशन। नातवंडे - grandchildren. पौत्री-हौडितो. नातीपोते। उमेद-optimism. माशा, उभी६. आशा, विश्वास। खचतात- (they) collapse in despair. निराश-उताश थ य छे. निराश हो जाते हैं।  मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.   पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



निबंध 3

वृद्धाचे मनोगत मराठी निबंध | vrudhachi manogat atmakatha in marathi nibandh

जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे' हे अगदी खरं गं बाई ! तरुणपणी वृद्धांच्या समस्या पाहिल्या, ऐकल्या. पण आता एवढी तीव्रता जाणवली नव्हती. आता तारुण्याच्या उतरणीवरच्या अंधाऱ्या बोगद्यात प्रवेश झालाय ना! संध्या छाया हृदयाला भिववू लागल्यात !


शरीरावर सुरकुत्यांनी जाळं विणायला घेतलंय. केस काळं करायला लागलेत आणि ज्या काही चार बटा आहेत त्यांनी पांढरं केलंय. डोळे खोल गेलेत. नजर कमी झालीय. साधी सई ओवायची म्हटली तरी दुसऱ्याला सांग.यं लागतं. आताशा ऐकायलाही कमी येऊ लागलंय. 


तशातच हातपाय लटपट करतात. मनाचा वेग वाढतो. पण शरीराचा वेग फारच कमी पडतो. त्यामुळे दुबळेपणाची जाणीव होते. असमर्थतेमुळे चिडचीड वाढते. मी म्हातारी आता घरात ज्याला त्याला अडगळ वाटू लागलेय. आता पूर्वीसारखी चपळाईने घरातली कामे होत नाहीत. 


नाकर्त्या माणसाला कोण किंमत देतेय ? बसा एका कोपऱ्यात बाजूला. ऐन थंडीच्या दिवसातसुद्धा स्वेटर घातलेला आठवत नाही. पण आताशा स्वेटर किंवा शालीशिवाय पान हालत नाही. आज काय खोकला होतोय, तर उद्या रक्तदाब वाढतो. जरा जास्त चालले की दम लागतो. 


डाव्या डोळ्यात मोतीबिंदू वसतीला आलाय. माझ्यासाठी डॉक्टरला पैसे गेले तर घरात मुलगा-सुनेची भांडणं होतात. मलाच अपराध्यासारखे वाटते. बरं औषध घ्यायचे नाही ठरवले तर उद्या लोळागोळा होऊन परस्वाधीन व्हायची पाळी यायची. 


आज निदान माझ्यापुरते तरी मी सगळे करू शकते. इथे सगळेच घराबाहेर जाणार. वेळ आहेच कुणाला? म्हणन आपली सेवा करण्यात तरी घरच्यांचा वेळ जाऊ नये म्हणून औषधं घ्यायची. पण हे घरात बोलयची मात्र सोय नाही हं!

आमचे हे मात्र मला अगदी फुलासारखं जपायचे. मला काही म्हणता काही कमी पडू दिलं नाही कधीच. चेष्टा मस्करीही तितकेच करायचे. सिनेमा-नाटकाला न्यायचे. मी केलेल्या स्वयंपाकाची तोंडभरून स्तुती करायचे. त्या एकेक आठवणींनी आजही मनाला आनंद होतो. सुटले बिचारे मला मागे ठेवून.


मुलांचे हे वागणे पाहून मनात येते-पोटाला चिमटा घेऊन, खस्ता खाऊन यांच्यामागे मायेच्या पंखाखाली लहानाचे मोठे केले तीच का ही मुले? त्यांना वाढवताना मनात यायचे-आपले काही मधेच बरेवाईट झाले तर या मुलांचे कसे होणार? पण आज म्हातारपणी कळतंय, रामकृष्णही आले गेले, त्याविना जग का ओसची पडले?' 


आजही मी संध्याकाळी कुकर लावते. कपड्यांच्या घड्या घालते. भाजी निवडते, चिरते, लसूण सोलते, ताक करते, नात शाळेतून आली की तिला खायला दे, कपडे बदल इ. कामे करते. ही नातसुद्धा आहे लहान, पण मतलबी हं! आई-बाबा नसतील तोपर्यंत आजी आजी करते. 


एकदा का आई-बाबा आले की माझ्याकडे फिरकत नाही. कधी कधी नात्यात, ओळखीत कोणी वृद्ध व्यक्ती निवर्तल्याचे ऐकले की मन सुन्न होते. आपलंच मरण डोळ्यापुढे यायला लागते. गतायुष्याचा चित्रपट डोळ्यांपुढून सरकायला लागतो.


आर्थिक बाबतीत मी कोणावर अवलंबून नाही, याचे मनाला एक समाधान वाटते. थोडेफार सोनेही आहे. मी पेपर वाचते, रेडिओ ऐकते, टी. व्ही. पाहते, सकाळी थोडे पायी फिरते, जुन्या संगीत नाटकांना जाते, प्रवासी कंपन्यांबरोबर सहलीला जाते. 


शेजारच्या आजींबरोबर पत्ते, बुध्दिबळ, पट खेळते. अर्थात या सगळ्या गोष्टी शरीर चांगली साथ देते तेव्हाच. आणि आवड टिकून आहे म्हणूनच जमते हो! माझा मुलगा आणि सून वृद्धाश्रमाची भाषा मात्र करत नाहीत हं! कधी कधी चिडले तरी तसे ते वाईट नाहीत. 


त्यांना दगदग होते म्हणून ते चिडतात, हे मी समजून घेते. वाईट आहे ते म्हातारपण! पण असे म्हणून ते थोडेच टाळता येणार? त्यातल्या त्यात प्रकृती चांगली ठेवण्याचा प्रयत्न तरुणपणीच करायला हवा. तसेच काही छंद जोपासले की वेळ बरा जातो. 


तसेच थोडीफार माया बाळगून असले पाहिजे. खरे म्हटले. तर म्हातारपणी इतर कशाची नाही, पण माया, प्रेम यांची उणीव फार भासते. 'नटसम्राट' मधल्या अप्पासाहेब बेलवलकरांप्रमाणे ओरडून विचारावं वाटतं 'अरे, कुणी प्रेम देता का थोडं? प्रेम देता का थोडं ? या म्हातारीला.'


निबंध 4

वृद्धाचे मनोगत मराठी निबंध | vrudhachi manogat atmakatha in marathi nibandh

जे एकदा गेले की परत येत नाही ते तारुण्य आणि जे आले म्हणजे कधी परत जात नाही ते वार्धक्य ! बाल्य, तारुण्य, प्रौढपण, वार्धक्य या मानवीजीवनातील अपरिहार्य अशा दशा आहेत.आज नौका जीवनाची, लागली किनाऱ्याला शांत जाहला सागर, दूरवरच्या क्षितिजावर


नाही जाहला वादळाचा जागर ! आता पूर्वीप्रमाणे घड्याळाच्या काट्याबरोबर धावणं नाही की काही . मिळविण्याची आकांक्षा राहिली नाही. कुणाच्या जबाबदारीची चिंता नाही की कुठे प्रवासाला जाण्याचा मोह नाही. आयुष्यभर धावणारी गाडी आता धीमेपणाने डकाव, डकाव करीत राहिलेला प्रवास आक्रमीत आहे.


'जरामरण यातुन सुटला, कोण प्राणिजात ? दु:खमुक्त जगला का रे, कुणी जीवनात ?' कष्ट उपसून आता शरीर थकलं आहे. जरेनं आपलं काम सुरू केलं आहे. एकेक गात्र आता शिथिल होत चाललं आहे. कानांनी दगा दिला आहे. डोळ्यांनी असहकार पुकारला. 


केसांचा कापूस झाला आहे. तर काही दातांनी आयुष्यभर केलेली सोबतच सोडून दिलेली आहे. चालताना काठीचा आधार लागतो आहे, तर उठता-बसता गुढघ्यांना कळा लागताहेत; तरीही मन मात्र उत्साही आहे.


आता या वयात करमणुकीचं एकच साधन उरलं आहे ते म्हणजे घरात बागडणारे हसणारे तारे... नातवंडं! त्यांना अंगाईगीत गाऊन मायेच्या चौघडीत झोपवताना, त्यांना जवळ घेताना स्वभाव अधिकच हळवा बनत जातो. वृध्दत्वाची जाणीव विसरली जाते; आणि नातवंडांभोवती स्नेहाचा कोश तयार होतो. 


हे नातं जीवनसंध्येत कृतार्थतेची झालर लावून जातं. संसार म्हणजे तारेवरची कसरत. तडजोड आणि मुत्सद्देगिरी या दोन अक्षांवर ती कसरतही यशस्वी झाली. आता आठवणींचे शिंपले उघडताना जीवनमोती चमकू लागतात. आणि दूरवरच्या क्षितिजावर शून्यात लागलेल्या नजरेपुढे अनेक आठवणी जागृत होतात. 


प्रौढत्वाची जाणीव होत असताना मुलांना हुशार, कर्तबगार बनवायचं या स्वप्नांनी भारावलेपण आठवते. त्यामुळे त्यांना शिस्त लावणं, धारेवर धरणं, कठोर वागणं इ.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद