ग्रीष्म ऋतु उन्हाळा निबंध मराठी | grishma ritu in marathi essay

ग्रीष्म ऋतु उन्हाळा निबंध मराठी | grishma ritu in marathi essay

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण ग्रीष्म ऋतु उन्हाळा निबंध मराठी | Essay On Summer Season In Marath  मराठी निबंध बघणार आहोत. ग्रीष्म (उन्हाळा) ऋतू निसर्ग हा एक मोठा जादूगार आहे. आपल्या देशात क्रमाक्रमाने येणारे सहा ऋतू पृथ्वीला आपापल्या पद्धतीने सजवून व अमूल्य भेटी देऊन जातात. ग्रीष्म ऋतू(उन्हाळा) म्हणजे खरे तर उकाड्याचा व प्रचंड उन्हाचा ऋतू. परंतु तो तितकाच आवश्यकही असतो.


प्रचंड उष्णता असणारा ग्रीष्म ऋतू (उन्हाळा) वैशाख व ज्येष्ठ महिन्यात येतो. या ऋतूत सूर्य उत्तरायणाच्या दिशेने जातो, त्यामुळे उष्णता वाढते. दिवस मोठा व रात्र लहान होते. पृथ्वीवरील जलाशयांच्या पाण्याची वाफ होते. पाणी आटते. उष्ण वारे वाहतात. छोट्या वेली वृक्ष पाण्याअभावी जळून जातात. या ऋतूत सूर्याची उष्णता प्रखर असते. उष्णते मुळे माणसाचे तसेच इतर प्राण्यांचेही जगणे असह्य होते. 



आपल्यालाही लवकर थकवा येतो. काम करावेसे वाटत नाही. थंड ठिकाणी राहावेसे वाटते. लोक रात्री उघड्यावर झोपतात. सकाळपासूनच गरम होण्यास सुरवात होते. उन्हापासून बचाव करण्यासाठी लोक बाहेर जाताना छत्रीचा वापर करतात. थंड पाणी, पेय, आइस्क्रीम यांचे महत्त्व वाढते. अन्नपदार्थ आणि पाणी ठेवण्यासाठी फ्रीजचा वापर करतात. परंतु तरीही ग्रीष्म ऋतूपासून फायदेही होतात. या ऋतूनंतर पाऊस पडतो, पिके चांगली पिकतात.



या ऋतूत आरोग्याकडेही लक्ष दिले पाहिजे. उन्हातून आल्यावर लगेच पाणी पिऊ नये. हा ऋतू आम्हास असा संदेश देतो की, ज्याप्रमाणे प्रचंड उष्णते नंतर पावसाळा येतो त्याचप्रमाणे दुःखानंतर सुख येते. कष्टांना आपण घाबरू नये. कर्म करीत तेजस्वी बनून सूर्याप्रमाणे चमकावे.


ग्रीष्म ऋतुतच आंबे मोठ्या प्रमाणावर मिळतात. त्यामुळे खूप गरम होत असले तरीही शाळेच्या सुटया व आंबे यामुळे हा ऋतू मला अतिशय आवडतो.
मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद