अभयारण्यातील फेरफटका मराठी निबंध | Sanctuary Tour Essay Marathi

अभयारण्यातील फेरफटका मराठी निबंध | Sanctuary Tour Essay Marathi

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण अभयारण्यातील फेरफटका मराठी निबंध 🌳🐯 बघणार आहोत. भारतातील सर्वांत जुना म्हणून ओळखला जाणारा 'नॅशनल पार्क' ज्याची स्थापना ६ ऑगस्ट १९३६ झाली होती, त्या 'पार्क'ची सफर करण्याचे आमच्या घरातील सर्व सदस्यांनी ठरविले. विशेषतः माझे बाबा आणि आई हे दोघेही त्याबाबतीत अतिशय उत्सुक होते. जगातील सर्व प्राण्यांमध्ये देखणा, रूबाबदार आणि स्वच्छ म्हणून ओळखला जाणारा वाघ हा प्राणी हळूहळू नामशेष होत चालला आहे. पृथ्वीवरील वाघांच्या एकूण आठ जातींपैकी पाच जाती कशाबशा तग धरून जगताहेत, तेव्हा 'आपण या वाघांच्याच भेटीला जाऊ या' असा निश्चय बाबांनी बोलून दाखविला.



या 'नॅशनल पार्क'चेच नवीन नाव 'जिम कार्बेट पार्क' असे १९५७ पासून ठेवण्यात आले आहे. 'जिम काबेट नावाच्या एका जंगलप्रेमी, प्राणीप्रेमी थोर शिकारीच्या नावाच्या स्मृतीप्रीत्यर्थ हे नाव दिले गेले आहे. या जंगलातील वाघांची होणारी निघृण हत्या, शिकार आणि त्यातून वाघांच्या कातड्यांना मिळणारी प्रचंड किंमत या दोन्ही गोष्टींना कडक बंदी. घालण्याचे प्रयत्न 'जिम कार्बेट'ने केले आहेत. त्याचमुळे थोड्या प्रमाणात तरी हे वाघ आज भेटीला मिळत आहेत. १ एप्रिल १९७३ पासून वाघांच्या शिकारीवर बंदी घालण्यात आली आणि या 'पार्क'ला 'अभयारण्या'चे रूप साकार झाले.


नवी दिल्लीहून आम्ही अभयारण्याकडे कूच केले. तेथील टायगर रिझर्व्हच्या लॉजमध्ये उतरलो. सकाळी सकाळी ताजेतवाने होऊन अभयारण्यात प्रवेश केला, तो हत्तींवर आरूढ होऊनच. या पार्कचा विस्तार १३९६ चौ.कि.मी. आहे. जिकडे पहावे असंख्य त-हेची झाडे-वेली, मोठमोठे वृक्ष.. जणू एकमेकांना भेटण्यासाठी आतुर झाले आहेत. काही वेली, झुडपे, हिरवीगार कुरणे आनंदाने डोलताहेत, गळ्यात गळे घालून सुखाने बहरताहेत असे दिसत होते. 


वृक्षांची विविधता पाहून... हिरव्या रंगाची अगणित रूपातील उधळण पाहून तर मन प्रसन्न होऊन जाते. उद्यानाच्या प्रवेशद्वाराशी त्या थोर व्यक्तीचा-जिम कार्बेटचा पुतळा आहे, जणू तो त्या वाघांच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज आहे. जिम कार्बेटच्या नित्य व्यवहारातील वस्तूंचे संग्रहालयही तेथे आहे.


या अभयारण्यात वाघांच्याच विविध जाती पाहायला मिळतात. सगळीकडे दूरदूरपर्यंत मुक्तपणे विहरताना दिसतात. तसेच मोठमोठे सुळे असलेले जंगली हत्ती ही फिरताना दिसतात. त्यांचे कळपाच्या कळप या जंगलात आपणच राजे आहोत या दिमाखात हिंडताना दिसतात. त्याचप्रमाणे चितळ, काळ्या तोंडाची माकडे, हरणे, सांबर, कोल्हे, लांडगे ही तर आपलीच भूमी समजून मुक्तपणे हुंदडताना दिसत होते. आणि हो पक्षी ! त्यांचे विविध रंग, आकार, त्यांचे आवाज, त्यांच्या भराऱ्या, कलकलाट किती किती म्हणून वेगळेपण आणि नावीन्य डोळ्यात साठवून घेऊ असे आम्हांला झाले होते. 


जंगलातील झाडांवर जागोजागी उंच ठिकाणी.... निरीक्षणासाठी म्हणून 'वॉच टॉवर्स' उभारले आहेत. अशा 'वॉच टॉवर्स'वरून अभयारण्याचा आनंद घेताना जणू साऱ्या आसमंतातूनच सृष्टिसौंदर्याचा वर्षाव... या अभयारण्यावर होत आहे, असे वाटत होते. त्यातूनच सोनेरी किरणांचा पडणारा सडा सौंदर्यात वाढच करीत होता. हत्तीवरून फिरताना जंगलात सगळीकडे आतपर्यंत फिरता येत होते. परंतु अखेरीस अभयारण्यातून बाहेर पडण्याची वेळ जवळ येऊन ठेपली. 


विविध झाडे, वृक्ष वेली, पाने, फुले, पक्षी, फूलपाखरे, प्राणी खरोखरीच एवढी विविधता या एका अभयारण्यात पाहून, आम्ही तर दिङ्मूढ होऊन गेलो. खरे तर हे नावाचे अभयारण्य मग त्यासाठी. प्रवेशासाठी मात्र कडक नियम, बंदोबस्तही चोख ठेवण्याची वेळ का बरे यावी? याचे उत्तर आपल्या माणसांच्याच हिंसक प्रवृत्तीत दडले आहे. अखेरीस या सफरीचा आनंद घेत होतो. शेवटी या माणसांच्या त्या वर्तनाचाही विचार अस्वस्थ करून सोडत होता.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद