महिला आरक्षण मराठी निबंध | women reservation essay in marathi

महिला आरक्षण मराठी निबंध | women reservation essay in marathi


 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण महिला आरक्षण मराठी निबंध बघणार आहोत. जीवनाचा शिल्पकार म्हणजे आई, पहिला गुरु म्हणजे आई आणि सर्व गुन्हे माफ असलेले जगातील एकमेव न्यायालय म्हणजे आईच. आई म्हणजेच स्त्री, जी कुठल्याही मुलाचा भेदभाव करत नाही, सर्वांना समानतेची व एकोप्याने वाढविण्याची प्रेरणा देते. स्त्रियांच्या बाबतीमध्ये सांगायचे झाल्यास त्यांना असलेला समाजातील मानसन्मान, तो मान-सन्मान पाहिजे तसा दिला जात नाही. अगदी पूर्वकाळापासून ते आजपर्यंत स्त्रियांचा प्रवास हा अतिशय खडतर व त्रासदायक आहे. त्याला कारणीभूत असलेली पुरुषप्रधान संस्कृती.


फार काळापासून मानव प्राणी जंगलात राहत असे. तिथेच कंदमुळे, फळे, मांस खाऊन जगत असे त्याला काही काळानंतर समूहाने व एका ठिकाणी राहणे आवश्यक वाटू लागले. त्यामुळे त्याचा फायदाही झाला व त्याच्या एकूण प्रवासातून 'आजचा चंद्रावर जाणारा मानव' आपल्यासमोर दिसत आहे. जेव्हा आपण इतिहास बघतो, त्यावेळी आपल्या कोणत्याही गोष्टीत स्त्रियांचा सहभाग नगण्य आढळतो. त्या कोणत्याही सामाजिक राजकीय व इतर सार्वजनिक क्षेत्रात पुढे दिसत नाहीत. याचा अर्थ त्यांना बुद्धी कमी असते किंवा त्या करू शकत नाहीत असे नाही. 


कारण आपल्या निर्माण कत्याने आपल्या सर्व मानवांना समान बुद्धी दिलेली आहे आणि समाजात राहण्यासाठी समान दर्जा दिलेला आहे. पण आपण सर्व मानवांनी या पृथ्वीतलावर जाती, धर्म, उच्च-नीच अशा प्रकारची विभागणी केलेली आहे. अशा परिस्थितीत स्त्रियांना खूप कमी प्रमाणात हक्क व संधी देण्यात आलेल्या आहेत. स्त्रियांनी फक्त चूल आणि मूल यातच आपले जीवन सार्थक मानावे अशी समजूत बराच काळ टिकत होती. परंतु आज-काल यामध्ये फार मोठा फरक जाणवत आहे. हे सर्व कशामुळे? तर स्त्रियांनी साधलेली विविध स्तरांवरील प्रगती यामुळेच. 


भारताबाबत सांगायचे झाल्यास भारतात स्त्रियांना गृहलक्ष्मी समजले जाते. स्त्रीला देवी समजले जाते. अशा या भारतात स्त्रियांचा विकास करू पाहणारे एकमेव सुरुवातीचे नेते म्हणजे महात्मा ज्योतीराव फुले. त्यांनी प्रथम आपल्या पत्नीला शिक्षण दिले आणि पुढे त्याच भारतातील प्रथम महिला शिक्षिका म्हणून उदयास आल्या व त्या म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या होत.


सावित्री बाईंनी खरोखरच स्त्रियांसाठी आपल्या जिवाचे रान करून शिक्षण दिले. त्यांनी महिलांना चूल व मूल याच्या बाहेरची दुनिया पाहण्याचे व त्याचा उपयोग करून आपले जीवन स्वाभिमान युक्त जगण्याचे ज्ञान दिले म्हणून महात्मा फुले म्हणतात


"विद्येविना मती गेली, 

मतीविना गती गेली 

गतीविना वित्त गेले 

वित्ताविना क्षुद्र खचले

एवढे अनर्थ एका अविद्येने केले." 

म्हणून शिक्षणामुळे आजची स्त्री विविध क्षेत्रात प्रगती करत आहे. हे सर्व झाले स्त्री आणि स्त्रियांचे आरक्षण. आरक्षण म्हणजे एखाद्या क्षेत्रात किंवा कुठल्याही क्षेत्रात असलेला राखीवपणा थोडक्यात स्त्रियांचे आरक्षण म्हणजे स्त्रियांसाठी राखीव सहभाग. भारत सरकारने विविध क्षेत्रात स्त्रियांसाठी ३०% आरक्षण तर महाराष्ट्र स्त्रियांसाठी ३३% आरक्षण ठेवलेले आहे. याचा अर्थ ज्या सावित्रीबाई फुलेंनी १५० वर्षाआधी शिक्षण दिले त्याचा प्रसार वाढत गेला प्रगती होत गेली पण आरक्षण मात्र द्यावेच लागते असे का? कारण स्त्रियांकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन पाहिजे तेवढा विकसित झालेला दिसत नाही.


आरक्षण हे स्त्रियांसाठी आहे म्हणून त्याचा उपयोग स्त्रियांसाठीच झाला पाहिजे असाच होतो. परंतु प्रत्यक्षात मात्र भलतेच घडते जे नको ते घडते. नको ते म्हणजे काय? एक लक्षात घ्या ३३% आरक्षण कुणासाठी? तर स्त्रियांसाठी आज आपल्या देशात विविध क्षेत्रात स्त्रिया असल्या तरी त्याच्या आरक्षणाचा चांगला व विशिष्ट उपयोग झाला आहे, असे दिसत नाही उदाहरणार्थ राजकारणामध्ये पद स्त्रियांकडे असले म्हणजे तिथे वर्चस्व आढळते तर ते म्हणजे पुरुषांचेच ग्रामपंचायत सरपंच स्त्री असेल तर तिचा पती पुढे असतो. तिला मात्र फार महत्त्व दिले जात नाही. मग या आरक्षणाचा फायदा काय?


म्हणून आपण सर्वांनी जर स्त्रियांकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवला व त्यांनासुद्धा पुरुषांप्रमाणे समाजात सुद्धा अधिकार द्यायला हवेत. कारण स्त्री आणि पुरुष यांचा प्रवास असतो. तो कुटुंबापासूनच नंतर समाज व नंतर शैक्षणिक, राजकीय व इतर त्यासाठी स्त्रियांना घरापासून समान संधी व समाज अधिकार द्यायला हवेत असे केले तर या सर्व मानव जातीचा उद्धार व्हायला वेळ लागणार नाही म्हणून म्हणतात ना- “जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगता खरोखरच मित्रांनो, आपली माता बहीण याही आपल्याच कुटुंबातील स्त्रिया आहेत. याच्यापासून जर समान संधी दा सुरुवात आपण केली तर निश्चितच आपले गाव, राज्य, देश, आणि नव्हेतर सर्व मानव जात एका प्रगतीच्या उंबरठ्या उभी असेल व कोणतेही आव्हान पेलण्यास तयार असेल यात शंकाच नाही. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत