फोन टॅपिंग मराठी निबंध | phone tapping essay in marathi

फोन टॅपिंग मराठी निबंध  | phone tapping essay in marathi

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण फोन टॅपिंग मराठी निबंध बघणार आहोत.“सावधान ! सावधान मंडळी हो, फोन टॅपिंग सुरू आहे" The Process is going on...सध्याच्या या जागतिकीकरणाच्या युगात यांसारख्या वाक्यांनी संबंध समाजालाच हादरवून सोडले आहे. चौखूर उधळलेल्या भारतीयांना जागतिक महासत्ता बनण्याची स्वप्ने पडत आहेत.



'चरैवेति चरैवेति, चालत राहा, चालत राहा. थांबला तो संपला', असे म्हणत सर्वजण गतीचा कायदा पाळत आहेत आणि निरंतर धावतच आहे या धावण्याच्या नादात लोक हो गोष्ट विसरताहेत की ज्या मार्गाने आपण धावत आहोत तो मार्ग योग्य आहे का ? आपल्याला खूप दूर जायचे आहे असे म्हणत समाज क्षणभरही मागे न वळता पुढेच जात राहिला आणि घडत असलेल्या चुकांकडे कानाडोळा होत राहिला.




यातच भर म्हणजे सध्या फोन टॅपिंग हा एक राष्ट्रीय चर्चेचा विषय झाला आहे. भारतासारख्या लोकशाही देशात हे फोन टॅपिंग इतके स्वस्त व सहज कसे झाले? खरेच हे इतके सुलभ आहे का ? आहे की नाही विचार करावयास लावणारा मुद्दा. 




जगातील सर्वांत मोठी लोकशाही आणि सर्वाधिक वर्षे कायम राहिलेली लोकशाही असा भारतीय लोकशाहीचा गौरव केला जातो. आणि ते खरेच आहे मात्र त्याच लोकशाहीमधील समाज किती गलितगात्र, लाचार, स्वार्थी झाली आहे. याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे हे फोन टॅपिंग !



घटनात्मकदृष्ट्या व कायद्याचा विचार करून बोलायचे तर अनेक कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यासच फोन टॅपिंगची परवानगी मिळते पण तांत्रिकदृष्ट्या कोणत्याही फोन टॅप करणे, ही तशी सोपी बाब नाही. भारतात टेलिफोन खाते फक्त सरकारच्या ताब्यात होते. तेव्हा खाजगी व्यक्तीला फोन टॅप करणे शक्य नव्हते, पण आता खाजगी टेलिफोन केंद्र अस्तित्वात आल्यानंतर कायदेशीर बंधन असूनही टेलिफोन टॅप केले जाणारच नाहीत याची कोणतीही खात्री नाही. 



फोन टॅपिंग याचा अर्थ एखाद्या व्यक्तीचा फोन रेकॉर्ड करणे. याद्वारे त्या व्यक्तीचे इतरांबरोबर चाललेले संभाषण पूर्णतः रेकॉर्ड होत असल्याने तो एक पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. 




पूर्वी फोन टॅपिंग एवढे सोपे नव्हते. मेकॅनिकल टेलिफोन एक्सेंजच्या काळात टेक्निशियनला लिकिंग सर्किट तोडून ते रेकॉर्डला जोडावे लागत असे. त्यामुळे फोन टॅपिंग करायचे असेल तर संबंधित अधिकाऱ्याचा लेखी आदेश घेतल्यावरच हे सर्किट ब्रेक केले जात असे. पण आता सर्व एक्सेंजेस डिजिटल झाल्यामुळे

टॅपिंग अधिक सोपे झाले आहे. 



केवळ संगणकाला आदेश दिला की, केव्हाही फोन टॅप होऊ शकतो. अशा एक्सचेंजमध्ये डिजिटल स्विचमधूनही फोन टॅप होतोय हे कुणाला कळतही नाही. डिजिटल तंत्रज्ञानात ज्याला फोन केला आहे त्याचा नंबर फोन केल्याची वेळ, फोनचा अवधी आदी माहिती आपोआपच संगणकांमध्ये नोंदवली जाते. त्यासाठी फोन टॅप करण्याचा वेगळा आदेशही लागत नाही.




ही माहिती संगणकामध्येच असतेच आणि हवी तेव्हा मिळवता येते. त्यामुळे येथे फोन टॅपिंगचा कायदा निरर्थक ठरतो. इतकेच नव्हे तर एखादी व्यक्ती महिन्याभरापूर्वी अमक्या दिवशी अमक्या वेळी कुणाशी फोनवर बोलत होते, ही माहितीही ऐनवेळी हवी असल्यास प्राप्त होते. यामध्ये खाजगी डिटेक्टिव्ह एजन्सीजना कमाईची संधी दिसली तर आश्चर्य नाही. त्यांचे उखळ पांढरे होऊ लागले आहे.




सध्या फोन टॅपिंगच्या चर्चेला ऊत आला तो समाजवादी पक्षाचे सरचिटणीस अमर सिंह यांनी आपला फोन टॅप 

होत असल्याच्या केलेल्या आरोपामुळे. अमर सिंह यांचा फोन टॅप होत असल्याचा आरोप प्रथम उत्तरप्रदेशचे मुख्य मुलायम सिंग यादव यांनी केला आणि या गोष्टींवरून थेट राजकीय सत्तेतील संघर्षाचा बडगा पेटून उठला. पक्षांतर्गत स्पधकावर नजर ठेवण्यासाठी या तंत्राचा गैरवापर सत्ताधिकाऱ्यांकडून केला जात आहे. 




या बाबी प्रकाशात येऊ लागल्या या कायात पोलिस यंत्रणेने त्वरित दखल घेऊन संशयितांना ताब्यातही घेतले. यामागे डिटेक्टिव्ह एजन्सी असल्याचे निष्पन्न झाले?सर्वसामान्य जनतेच्या राजकारणामागे किती घृणास्पद बाबी दडलेल्या आहेत.




माहिती तंत्रज्ञानाच्या या युगात सर्वत्र LPG'चा प्रसार होत आहे म्हणजेच जागतिकीकरण, व्यापारीकरण आणि खाजगीकरणाच्या या लाटेत समाजात बऱ्याच अशा गोष्टी घडत आहेत. ज्यांचा खऱ्या अर्थाने समाजाने विचार करावयास हवा, तसे एका अथनि फोन टॅपिंगमुळे गुपित कारस्थाने उघडकीस येतात. 




हे जरी खरे असले तरी कायद्याचा दुरुपयोग होता कामा नये हे ही जाणवले पाहिजे. त्यामुळे चोरट्या मार्गाने चाललेल्या या कार्याला विरोध करणे हे समाजाचे कर्तव्य आहे.

राष्ट्रहितासाठी अपवादात्मक स्थितीत फोन टॅप करण्याचे अधिकार सरकारला आहेत. त्यासाठी काटेकोरपद्धत आखून देण्यात आली आहे.



सरकारलाही कुणाचा फोन टॅप करायचा असेल तर संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागते. ज्याचा फोन टॅप करायचा आहे, त्या व्यक्तीकडून समाज राष्ट्राला धोका आहे. हे पटवून दिल्यावरच अशी मान्यता मिळते. आणीबाणीच्या काळातही कायदेशीररीत्या असे प्रकार घडले ही खेदाची बाब आहे.

सध्या मात्र मोबाईलमुळे युगक्रांती झाल्यामुळे यांसारख्या गोष्टींना ऊत येऊन दुरुपयोग करण्याचे प्रकार घडत आहेत. वास्तविक फोन टॅपिंगचे कृत्य हा टेलिग्राफ अॅक्टनुसार गुन्हा आहे. फक्त त्याचा वापर राष्ट्रहितासाठीच करता येतो.



रिलायन्स टाटा इंडिकॉम, बीपीएल, एअरटेल इ. खाजगी कंपन्यांच्या प्रसारामुळे काही समाजकंटक लोक समाजविघातक कृत्य करण्यास अनुचित प्रकाराचा अवलंब करत असल्याचेच याबाबींवरून दिसून येते. 




यामुळे व्यक्तींना फोन टॅपिंगची भीती वाटते आणि फोनवर काय बोलायचे याचा आधी विचार नक्कीच ते करतीलही, पण गैर काही करायचेच का की ज्यामुळे आपण अडचणीत येऊ हे माणसाला समजावयास हवे तरच खऱ्या अर्थाने अण्णा हजारेंसारख्या समाजसुधारकांनी केलेल्या उपोषणांना फळ प्राप्त होईल.



“अवनतीकडे नेणारे शस्त्र नको आहे,

उन्नतीकडे नेणारे शास्त्र हवे आहे."


आज असे शास्त्ररूपीच अस्त्र हवे आहे. मनुष्याच्या मनोबुद्धीला पूर्णतेच्या मार्गावर नेणाऱ्या साधनाची गरज आहे ती केवळ आंतरराष्ट्रीय क्षेत्रात स्थान मिळावे किंवा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अन् नैतिक विकासासाठी तिचा उपयोग व्हावा म्हणून.



युवकांना जागृत होऊन या फोन टॅपिंगसारखे अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्क राहिले पाहिजे. संघटना स्थापून चळवळी केल्या तरच नवीन क्रांतीचा उदय होईल “सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे” रामदास स्वामींच्या वचनाचा बोध घेऊन आपण सर्वांनी कार्य केले पाहिजे. “Ban Phonetaping, For Progressive India Making" मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद