बालकवी मराठी निबंध | balkavi essay in marathi

 बालकवी मराठी निबंध | balkavi essay in marathi


 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  बालकवी  मराठी निबंध बघणार आहोत. जळगाव नगरीत दिनांक २ आणि ३ मार्च १९०७ दरम्यान लक्ष्मीविलास नाट्यगृहात पहिलेवहिले कविसंमेलन 'काव्यरत्नावली'कार फडणीसांच्या प्रेरणेने आयोजित केले गेले. अध्यक्षपदी होते 


'इंदिरा काव्यकर्ते डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर. विष्णु मोरेश्वर महाजनी, माधवानुज, चंद्रनशेखर, विनायक तांबे, रहाळकर, पांगारकर, अनंततनय आदी २३ कविश्रेष्ठ उपस्थित होते. रेव्ह. ना.वा. टिळकांचे ‘चित्रकाव्य' या विषयावरचे भाषण संपताच सुमारे १६ वर्षांचा एक मुलगा सभामंचावर आला अन् धीटपणे म्हणता झाला -


'अल्पमति मी बालक, नेणे काव्यशास्त्रव्युत्पत्ति।

 कविवर्यांनो ! मदिय बोबडे बोल धरा परि चित्तीं। 


बुद्धिविरहित आहे माझे काव्य पोरकें आज त्या करवी मग होइल कैसें जनमनरंजनकाज?' झाले! त्र्यंबक बापूजी ठोमांच्या या बोलांनी सारे श्रोते व कविमंडळ खुप झाले ! टिळकांनी शाबासकी आणि पागोटे नि जरिकाठी उपरणे रीतीप्रमाणे देऊन त्यांचा गौरव केला. मुख्य म्हणजे त्यांना 'बालकवी' ही पदवी दिली.


केवळ प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण झालेली आमची प्राध्यापक मंडळी याच बालकवींची कविता शिकवताना आजही गोंधळते. प्रेमकविता आणि निसर्गकविता यात गल्लत होते.


महाराष्ट्राला आपल्या आत्यंतिक तेजाने दीपविणारी, हवीहवीशी पण दिसते न दिसते, तोच लोप पावणारी, काव्याचा स्वयंसिद्ध स्रोत स्रवणारी दोन लक्षणीय व्यक्तिमत्त्वे परिचित आहेत. एक बालकवी अन् दुसरे आरती प्रभू बालकवींना दोन्हीकडच्या आजींकडून काव्याचा वारसा लाभला होता. 


त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षापासून काव्यलेखनास प्रारंभ केला. बालकवींना जळगाव येथील १९०७ च्या महाराष्ट्र कविसंमेलनाप्रमाणेच १९०९ च्या बडोद्याच्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाने स्फूर्ती मिळाली. बालकवींच्या अल्पजीवी आयुष्यात त्यांच्याशी परिचित व्यक्तींची नामावली बघू जाता, त्यांची कविता कितीतरी बहरली, त्याची संगती कळून येते.


संस्कृतपंडित दूधमांडे शास्त्री, रेव्ह. ना. वा. टिळक, तात्यासाहेब कोल्हटकर, तात्यासाहेब केळकर, 'मनोरंजन'चे संपादक का. र. मित्र, गोविंदाग्रज, कवी वनवासी, कवी विनायक, 'आनंद'चे संपादक वा. गो. आपटे, 'स्मृतिचित्रे'कर्त्या लक्ष्मीबाई टिळक, नाट्यछटाकार गर्गे दिवाकर भालचंद्र, कवी अनंतनय, कवी गिरीश.... किती किती नावे द्यावीत, ज्यांचा सहवास बालकवींना लाभला !


बालकवींचा जीवनपट उलगडू जाता, त्यांच्या काही कवितांची मूळ उगमस्थाने सहजी सापडतात.बालकवींचे बालपण खानदेशच्या खेड्यापाड्यांतून गेले. किशोरावस्थेत कवी वनसवासींबरोबर माळवा, नेमाड, राजपुतान्याची सरहद्द यातून गेले. पुढे मोठे बंधू अमृतरावांच्या सांगण्यावरून काही दिवस निवालीच्या पहाडी इलाख्यात घालवले. त्यावेळी जंगलातून घडलेला चार दिवसांचा प्रवास. 


दत्तोपंत टिळकांसह महाबळेश्वरला मिशन स्कूलमध्ये मराठी शिकवायला गेले, तेव्हा निरनिराळ्या रम्य स्थळांवरून केलेला फेरफटका... पुण्यास असताना डेक्कन कॉलेजातल्या नायडू नावाच्या मित्रासह अनेकदा चांदण्या रात्री केलेला नौकाविहार... 


या आणि अशा कितीतरी घटनांचा उल्लेख करता येईल की, ज्यामुळे निसर्ग आणि बालकवी यातील अंतर शून्य झाले होते. बालकवीच निसर्ग झाले होते. त्यांच्या निसर्गकवितांमधून विश्वात्मक सौंदर्याचा साक्षात्कार होतो. सौंदर्य, प्रेम आणि आनंद यांचा त्रिवेणी संगम मराठी कवितेत बालकवी वगळता विरळाच. त्यातल्या काही मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद