जागतिक दहशतवाद शोध आणि बोध मराठी निबंध | Jagtik Dahshatvad Shodh Ani Bodh Essay In Marathi


जागतिक दहशतवाद शोध आणि बोध मराठी निबंध | Jagtik Dahshatvad Shodh Ani Bodh Essay In Marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण जागतिक दहशतवाद शोध आणि बोध मराठी निबंध बघणार आहोत. भारताच्या स्वर्गाला (काश्मीरला) रक्ताची आंघोळ मिळाली. अमेरिकेची शानो-शौकत क्षणात जमिनीस भिडली. अवघ्या जगाच्या अंगावरती एक थरथराट आली. 


शांतिदूताच्या पंखामध्ये अशांतीची कट्यार घुसली कारण एकच-दहशतवाद्यांच्या दंगली, दहशतवाद्यांच्या दंगली, दहशतवाद्यांच्या दंगली. जागतिक दहशतवाद हा वर्षानुवर्षांचा लोकचर्चेचा व लोकचिंतेचा विषय आहे.


अमेरिकेच्या 'वर्ल्ड ट्रेड सेंटर' व 'पेंटॅगॉनवर' हल्ला झाला आणि २६ दिवसांतच अमेरिकेने अफगाणिस्तानविरुद्ध युद्ध पुकारले. ज्यांच्याकडे पापणी वर करून बघण्याची कोणाची हिंमत नाही, असा दंभ मिरविणाऱ्या अमेरिकन गुप्तहेर खात्याच्या घरावरच त्यांना ताकास तूर लागू न देता हल्ला झाला.


आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा जन्म : चुकीची धोरणे, पिळवणूक, साधनसामग्रीची लूट, स्वायत्ततेवर घाला, भूमिपुत्रांमध्ये डावलले जाण्याची भावना. जातीय व वर्गीय संघर्षातून दहशतवादाचा जन्म. दहशतवादाला जमातवादी आशय देण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय राजकारणातून झाला.


आंतरराष्ट्रीय दहशतवादाची कारणे : दहशतवादाचा भस्मासुर जगात आजच उभा ठाकला यापूर्वी तो नव्हता असे सद्यःस्थितीवरून वाटण्याचा संभव आहे. जगातील सर्व राष्ट्रांना दहशतवादाची झळ पोहोचली आहे.


आपल्यावरच उलटणार अण्वस्त्रांचा भस्मासुर ?  प्रवासी माणसांनी भरलेली विमाने अमेरिकन विमानतळावरून पळवून नेऊन आतील माणसांसह या मनोऱ्यामध्ये आणि पेंटॅगॉनमध्ये घुसविण्यात आली. माणसांनाच माणसे मारण्याचे अस्त्र म्हणून वापर करण्याचे हे नवे अस्त्र, युद्धतंत्र येथे वापरण्यात आले.


जैविक अण्वस्त्रांचा महाभयंकर परिणाम म्हणजे अॅक्सची भीती गडद होत आहे-अमेरिकेला धडा शिकविण्याच्या हेतूने अँथ्रक्सच्या रूपातील जैविक दहशतवाद आता जगभर हातपाय पसरू लागले आहेत हा अमानवी हल्ला करणारा लादेन असेल किंवा त्याला जिवंत वा मृत पकडण्याची प्रतिज्ञा करून रणमैदान पेटवायला निघालेला बुश असेल.


हे दोघेही मानवतेचे सारखेच शत्रू आहेत. आपले हे युद्ध क्रुसेड म्हणजे धर्मयुद्ध आहे. आणि त्याविरुद्ध मुकाबला करण्यास जिहाद धर्मयुद्ध आहे. असे ते म्हणतात. यातून त्यांचे धर्मवेड दिसून येते.


६ डिसेंबर १९९२ ला हिंदुत्ववादी संघटनांनी जाहीरपणे अयोध्येतील बाबरी मशीद जमीनदोस्त करण्याचे दहशतवादी कृत्य केले. त्याची प्रतिक्रिया म्हणून मुस्लीम दहशतवाद्यांनी मुंबईत प्रचंड बॉबस्फोट घडवून आणले, हिंदू दहशतवादाला मुस्लीम दहशतवाद असे त्याचे स्वरूप होते.


पण यात शेकडो निरपराध माणसांचा बळी मात्र गेला. १३ डिसेंबरला संसदभवनावर जो हल्ला झाला, तो भारतातील सर्वोच्च नेत्यांची हत्या करण्याचा दहशतवादी संघटनांचा प्रयत्न विफल झाला. हा हल्ला दहशतवादाचे अस्मितेवर हल्ला असून यावरून दहशतवादाचे अस्तित्व काल होते, आज आहे आणि उद्याही राहील कदाचित दहशतवादाचे स्वरूप बदलेल.


आर्थिक, राजकीय सुरक्षितता आणि दहशतवाद  दहशतवाद नेहमीच लोकशाही स्वातंत्र्य आणि समता ही मूल्ये पायदळी तुडवतो. त्यामुळे दहशतवादाचे स्वरूप दलित-शोषित विरोधीच असते. दहशतवादी जी भाषा वापरतात, ती मात्र समता आणि न्यायासाठी लढणाऱ्या क्रांतिकारकाची असते. उदा. अमेरिकेवरील हल्ला म्हणजे शोषिकांना शोषितांनी शिकविलेला धडा आहे.


तिसऱ्या जगावर अमेरिकेने जर अन्याय, अत्याचार केले त्याचा आम्ही बदला घेऊ ही दहशतवाद्यांची क्रांतिकारक भाषा फक्त सर्वसामान्य परिस्थितीत गांजून गेलेल्या माणसाला आकर्षित करू शकते.दहशतवादी संघटना व काश्मीरमधील दहशतवाद : काश्मीरमध्ये बंडखोरीचा झेंडा उभारणाऱ्या अतिरेक्यांचे मुख्य तीन प्रकार आहेत.


पहिले काश्मीरमधील तरुण धर्मभावनेपेक्षा स्वातंत्र्य मिळविण्याच्या कल्पनेने पेटून गेलेल्या या बंडखोर तरुणांचा फायदा पाक संघटनांनी घेतला. आझाद काश्मीर स्वतंत्र करण्यासाठी उत्सुक होते; दुसरे म्हणजे जम्मू-काश्मीरमधील आणि पाकव्याप्त अराजकवादी तिसरे म्हणजे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इतर देशांतील भाडोत्री बंडखोर जे केवळ पोटासाठी दहशतवादी कृत्य करतात. 



लष्कर-ए-तोयबा अल-कायदा यांसारख्या दहशतवादी संघटना आणि त्यांचा उद्देशच भीती निर्माण करणे व गोंधळ माजविणे आणि अराजकता निर्माण करणे हा असतो.ओसामा बिन लादेनचा उदय : सौदी राजघराण्याची अमेरिकेशी दोस्ती आणि जवळीक लादेनला पसंत नव्हती म्हणून तो पॅनइस्लामिक चळवळीकडे ओढला गेला. 



या चळवळीचे प्रशिक्षण केंद्र असणाऱ्या पाक-अफगाण सीमेलगतच्या छावण्यांमधून त्याने प्रशिक्षण घेतले, लादेनच्या कट्टर धर्मविश्वासामुळे त्याने 'इस्लामिक सॉल्व्हेशन फाउंडेशन'ची स्थापना केली.


ओसामा बिन लादेनचे अभूतपूर्व आव्हान दहशतवादाच्या क्षितिजावर तळपू लागलेल्या महाभयंकर शक्तीचे मूल्यमापन होऊच शकत नाही काश्मीरची श्रद्धाहीन लोकांपासून मुक्तता करायची हे त्याचे घोषित ध्येय आहे. अमेरिकेचा एक क्रमांकाचा शत्रू लादेन


आता अमेरिकेबरोबर भारतालाही त्याच पातळीचा शत्रू मानतो ओसामा बिन लादेन व त्याच्या अल-बदल संघटनेने केवळ पाकिस्तान अफगाणिस्तान, काश्मीर येथील संघटनांना पैसा, शस्त्रे, यांची मदत केली नाही, तर जगभर त्यांचे जाळे व्यापले आहे.


विमान अपहरण हवाई चाचेगिरी  १ जानेवारी २००० ला अफगाणिस्तानातील कंदाहार येथे विमान अपहरणकत्यांनी भारताच्या विमानाचे अपहरण केले व त्या बदलत्या तीन कट्टर काश्मिरी अतिरेक्यांच्या सुटकेची मागणी केली होती.


भारताला अतिरेक्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागल्या कारण या वेळी अनेक निष्पाप प्राण वाचविणे हे आद्य कर्तव्य होते. अशा प्रकारे हा दहशतवाद आंतरराष्ट्रीय पातळीवर तर आहेच; पण आजच्या काळात स्थानिक दहशतवादसुद्धा तितकाच प्रबळ आहे.


दहशतवाद आणि मुकाबला युद्ध नको शांतताच हवी : दहशतवादी शक्ती पराभूत होतील कारण जगातील अमर शक्ती जी लोकशक्ती ती 'युद्ध नको शांतता हवी', असे फलक खांद्यावर घेऊन जपान, अमेरिका, इंडोनेशिया, व्हिएतनाम, पॅलेस्टिनी यांच्या रस्त्यावर उतरत आहे.


ही मानवी शक्ती जेव्हा रस्त्यावर उतरते, तेव्हा हे दहशतवादी, महादहशतवादी रणांगणे सोडून जातात. याची चुणूक व्हिएतनामचे युद्ध, अमेरिकन जनतेने त्या वेळच्या बुशला दाखविली आहे. डोळ्याला डोळा मागू नका, त्यामुळे सारे जगच आंधळे होते. 


अतिरेक्यांनी केलेला हल्ला अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देणारा होता. तसाच काही प्रमाणात प्रतीकात्मक होता. वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला म्हणजे अमेरिकेच्या अनभिषिक्त सत्तेला-जागतिकीकरणाच्या संकल्पनेला हादरा होत होताच;पण पॅटॅगॉनवरील हल्ला म्हणजे त्याच्या बौद्धिक आधिपत्याला-लष्करी ताकदीला हादरा होता.


त्याविरुद्ध प्रतिहल्ला म्हणजे अमेरिकेचा दहशतवादच नव्हे काय?यापूर्वी जपानच्या हिरोशिमा नागासाकीवरसुद्धा अमेरिकेने आपल्या आण्विक सामर्थ्याची अशीच झलक दाखविली होती तेव्हा जपानमधील लोकांच्या हातात जे फलक होते त्यावर महात्मा गांधीजींचा वरील इशारा होता.


मूल्याधारित लोकलढा हाच उपाय : जगभरात वाढलेल्या इस्लामी दहशतवादामुळे धर्मयुद्ध होणार की काय;पण ही शक्यता अगदी दुरापास्त आहे. जगातील सर्व मुस्लिमांचा या मूलतत्त्ववादाला पाठिंबा नाही. जगातील १०० कोटी मुस्लिमांपैकी एक टक्का ही मुस्लीम दहशतवादाचे समर्थन करत नाही.


अफगाणचे धर्मवेड ही दहशतवाद्यांची करणी दहशतवादी आपल्या स्वार्थासाठी करीत आहे. ते इस्लामचा चुकीचा अर्थ लावून तरुणांच्या धर्माच्या आधारावर भावना भडकविण्याचा प्रयत्न करतात.


दहशतवादविरोधी लढ्यासाठी हवा सर्वकष दृष्टिकोन : ११ सप्टेंबर हा दिवस खरे म्हणजे भारताच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी नोंदविला जावा असा दिवस कारण याच दिवशी शिकागोच्या व्यासपीठावर स्वामी विवेकानंदांनी सर्वधर्मीयांना आपला धर्म जबरदस्तीने, जुलमाने, दडपशाहीने दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्न केलात तर सारे जग कलहानीत भाजून निघेल होरपळून निघेल, असा इशारा दिला होता.


१०९ कोटी वर्षापूर्वी उच्चारलेले हे शब्द जणू एकच भाकीतच होते त्या प्रेषिताचे नाव होते स्वामी विवेकानंद..त्या पार्श्वभूमीवर दहशतवादाला आमचा विरोध आहे पण अमेरिकेच्या आक्रमक भूमिकेला आमचा पाठिंबा नाही, असे अनेक राष्ट्र उघडपणे म्हणू लागली.


तालिबान आणि ओसामा बिन लादेन यांच्याविरुद्ध लष्करी कारवाई करून अमेरिकेन दहशतवादाविरुद्ध चे युद्ध संपणार नाही. जागतिक दहशतवादाचा बीमोड हाच सर्वंकष दृष्टिकोन हवा, दहशतवादी लढ्यात भारताची भूमिका


"ध्यायतो विषयानयु; संगस्ते पुष्पजायते ।

 संगात संजायते काम; काम क्रोधाभिजायते ।। 

क्रोधाद्भवती संमोह; संमोहात स्मृतिविभ्रमः ।

स्मृतिभ्रशांत बुद्धिनाशः बुद्धिनाशात प्रणश्यती ।।" 


हे भगवद्गीतेतील तत्त्वज्ञान सर्वोपयोगी तर आहेच; पण भारतानेही याच तत्त्वज्ञानाचा स्वीकार करून जागतिक लढ्यात योगदान द्यावे भारताने दहशतवादाच्या लढ्यामध्ये सामील होताना अलिप्ततावादी धोरण स्वीकारावे. 


या वेळी भारतासमोर दोनच पर्याय आहेत. एक तर तितकाच प्रबलतेने दहशतवादाला विरोध करणे आणि दुसरा म्हणजे शांतीचा मार्ग स्वीकारणे कारण एकच, शस्त्रे इतरांना मारू शकतात. स्वतःचे रक्षण करू शकत नाहीत.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद