जाहिरातीच्या विळख्यात क्रिकेटवीर मराठी निबंध | jahirati chya vilkhyat cricket veer marathi nibandh

 

 जाहिरातीच्या विळख्यात क्रिकेटवीर मराठी निबंध | jahirati chya vilkhyat cricket veer marathi nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  जाहिरातीच्या विळख्यात क्रिकेटवीर मराठी निबंध बघणार आहोत. या लोकशाही प्रधान भारत देशात देश स्वातंत्र्याच्या वाटेवर असताना आपल्या देशाच्या अनेक शूरवीरांनी आपल्या भारत देशाला पारतंत्र्याच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. अशा शूरवीरांच्या अंगी स्वातंत्र्याचा ध्यास लागला होता. 


अशा क्रांतिकारकांनी भारतमातेची साखळदंडातून मुक्तता करण्यासाठी आपल्या रक्ताचे सडे टाकले. भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास पाहिला तर तो एक रक्तरंजित इतिहास होईल. अशा या क्रांतिवीरांना माझेच नव्हे तर आपल्या सर्व देशाचे त्रिवार अभिवादन आहे. त्या अभिमानास ते पात्र आहेत.


१५० वर्षानंतर आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला म्हणजे आपल्या देशावर इंग्रजांनी १५० वर्षे राज्य केले. राज्य करत असताना ह्या गोऱ्या चमडीच्या लोकांनी ह्या कृष्णवर्णीयांवर अत्याचार करून त्यांच्या दु:खाला व दारिद्रयाला खतपाणी घातले. आणि त्यामुळे भारतातील नवजवान तरुणांच्यात राष्ट्र अभिमानाची भावना जागृत झाली. असे अनेक गावागावांतून नवजवान तरुण संघटित झाले. 


त्यांच्या मनातील सामर्थ्य आत्मविश्वास वाढवण्याचे काम याच देशातील समाज प्रबोधनकार विद्वानांनी केले. या नवजवानाच्या शक्तीने त्या गोऱ्या चमडीच्या सरकारला हुसकावून लावणे शक्य होत होते. परंतु विजयश्री त्याच्यापासून दूर जात होती. 


परंतु म्हणतात ना विजय मागून मिळत नसतो. तर धैयनि प्रयत्न करणाऱ्याच्याच गळ्यात विजयश्री माळ घालत असते. त्याचप्रकारे भारतीय नवजवानांनी धैर्याने प्रयत्न केले आणि त्या गोऱ्या चमडीच्यांना त्यांचा रस्ता दाखवला.


परंतु १५ ऑगस्ट १९४७ साली भारत देश स्वतंत्र झाला. तो ब्रिटिश इंग्रज गोऱ्या चमडीचा या देशातून पळून गेला. त्याला पळता भुई पुरेनाशी झाली. परंतु त्या गोऱ्या चमडीच्यांनी आणलेला तो चेंडूफळीचा खेळ पळवून लावू शकलो नाही. कारण भारतीयांच्या रक्तातच ते भिनलं होतं की ब्रिटिशांनी जे केलं तेच करायचं, 


अरे आपल्या देशाचे अस्सल मर्दानी खेळ याकडे आपण दुर्लक्ष केले. आपल्या देशामध्ये कबड्डी, मल्लखांब, कुस्ती, दांडपट्टा, लेझीम, हॉकी असे मर्दानी खेळ खेळले जात होते. परंतु आधुनिक काळात समाज परिवर्तन होईल तसा आपला देश पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करू लागला आणि स्वदेशी खेळाकडे दुर्लक्ष करू लागला.


क्रिकेट हा खेळ पाश्चात्त्य संस्कृतीचा खेळ आहे. परंतु तो भारतात दिवसेंदिवस वाढत गेला. कारण ते भारतीयांच्या रक्तातच आहे. किती जरी काय केलं तरी हातची सोडून पळतीच्या मागे लागायचं. भारतातील ज्या पारंपरिक कला होत्या त्या कलांचा, खेळाचा काय फायदा आहे तो विसरला आहे. आणि त्याला चेंडू फळीची सवय लागली आहे. कारण हे त्यांच्या मनात रक्तात ब्रिटिशांनीच बिंबविले होते.


दिवसेंदिवस म्हणजे अलीकडील २१ व्या शतकात या क्रिकेटचा संपूर्ण विश्वात एवढा प्रसार झाला आहे की ती एक नशाच होऊन बसली आहे. मुलगा जन्मला की त्याला खेळण्यासाठी पहिला खेळ म्हणून बॅट आणि बॉल दिला जातो. त्यामुळे त्याला त्याची गोडी लागली आहे.


कारण संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे लालचावलेले मन लागलीच गोडी जीवेत छोडी तुजला. यामुळे भारतात क्रिकेटचा प्रसार खूप झाला. जगातील अनेक देशात पैकी भारत देश देखील क्रिकेट प्रिय होऊन गेला. भारत देशाचं जागतिक पातळीवर प्रतिनिधित्व करण्यासाठी संघ निवड होऊ लागली. 


लोक त्यांना मान देऊ लागले की माझ्या भारत देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू. हे खेळाडू पाहिल्यास त्यांची छाती अभिमानाने भरून येते. कारण ज्या पद्धतीने जवान देशासाठी लढतो त्याचप्रमाणे क्रिकेटवीर देखील देशासाठी लढतो असा समज आपल्या देशवासीयांचा झालेला आहे. क्रिकेटवीराला तो देव मानू लागला आहे.


परंतु हे क्रिकेटवीर खरेच देशासाठी खेळतात का? हे तर पैसे कमवण्यासाठी खेळतात. जाहिराती करतात. कारण त्यांना मोठ्या कंपनीच्या जाहिराती करण्याच्या संधी प्राप्त होतात आणि तो खेळाडू देशासाठी क्रिकेट खेळायचे सोडून पैशासाठी जाहिराती करतो आणि तो ह्या जाहिरातीच्या विळख्यात सापडला आहे हे गैर नाही का ?मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद