राष्ट्रीय विकासात युवकांची भूमिका मराठी निबंध | rashtriya vikasat yuvkanchi bhumika essay in marathi


राष्ट्रीय विकासात युवकांची भूमिका मराठी निबंध  | rashtriya vikasat yuvkanchi bhumika essay in marathi

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण राष्ट्रीय विकासात युवकांची भूमिका मराठी निबंध बघणार आहोत. "आव्हानांची तमा न मजला मीच एक आव्हान कर्तृत्वाची मशाल घेऊनगाईन मी गुणगान राष्ट्रीय विकास साधू आम्ही हेच आमुच्या कर्तृत्वाचे गाणे महान." आजची युवा पिढी एक देशाचा आधारस्तंभ परिस्थितीचे लगाम खेचून तिला काबूत आणणारी ही पिढी आजच्या युवकांनी साहसाच्या लक्ष्मणरेषा केव्हाच आखलेल्या आहेत.त्यामुळे त्यांच्या शक्तीचा विध्वंस होणे शक्यच नाही.


कार्याची पताका अखंड फडकावीत ठेवणे हेच युवकांचे ध्येय आणि ते ध्येय गाठण्याचा युवक तंतोतंत प्रयत्न करत आहेत याचा प्रत्यय आपल्याला वारंवार येतो. म्हणून तर आज युवा संघटना युवा मंडळे स्थापन होत आहेत. 


त्यांच्या कार्याची दीपज्योती अखंडपणे तेवत आहे,शिवाय ती तेवत राहीलही मग युवकांवर टीकेचे कुत्सित बोलण्याचा भडिमार कशासाठी?अहो,त्यांना तर तुम्ही प्रेरणा द्यायला हवी. युवक तर देशाचे भक्त आहेत."विशाल आमुची मायभूमी ही आम्ही तिची लेकरे


मनात आमुच्या नित्य वाहते तारुण्याचे वारे.” आज आपल्या देशातील सामाजिक, राजकीय परिस्थिती समाधानकारक दिसत नाही. तरीही आपल्याला जेवढे चांगले दिसते, ते स्वीकारण्याचा तरुणांनी प्रयत्न केला पाहिजे. त्याला बुद्धीची जोड दिली पाहिजे. तरच युवकांपुढे चांगले आदर्श प्रस्थापित होतील. 


हे सर्व करताना देशाने माझ्यासाठी काय केले, असे म्हणण्यापेक्षा मी देशासाठी काय करेन याचा विचार झाला पाहिजे. त्याचबरोबर सध्या देशातील तरुणांना शिक्षण घेतल्याने कष्ट नको वाटतात.कष्टांची कामे करावीशी वाटत नाहीत.वास्तविक पाहता शिक्षण आणि कष्ट याचा काही एक संबंध नाही.म्हणून तरुणांनी प्रथम मन आणि बुद्धीबरोबर मनगट सक्षम केले पाहिजे.


जन्मदात्री आई आणि जन्मभूमी ही मानवी जीवनातील सर्वोत्तम स्थाने आहेत. तरुणांना खरोखरच राष्ट्राचा विकास व्हावा असे वाटत असेल, तर त्यांनी समाजकारण स्वीकारावे गलिच्छ राजकारणात स्वतःला झोकून देऊ नये. तरुणांनी देशविकासासाठी झटले पाहिजे. 


सध्या तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता नवनवीन उद्योगधंदे आधुनिक शेतीसाठी पावले उचलावीत. इतर राष्ट्रातील लोक भारतात येऊन धंद्यात प्रगती करत आहेत. आपणही आपले शिक्षण फक्त नोकरीसाठी आहे हे विसरून ते कल्पक बुद्धीने शेती आणि धंद्यासाठी वापरावे आणि आपले कर्तृत्व उभे करावे. 


आपण जे शिक्षण घेतो ते सत्त्वयुक्त असावे, हे त्यांनी ध्यानात घ्यावे नाही तर मराठी बी.ए. झालेल्या व्यक्तीला मुलाखतीवेळी निसर्ग कविता आठवत नाही. असले शिक्षक काय कामाचे ? जे चांगले शिक्षण घेतात, विज्ञान क्षेत्रात भरारी मारतात असे युवक भारतात आमच्या बुद्धीला, कर्तृत्वाला वाव मिळत नाही म्हणून परदेशात जातात. 


ज्या मातीत आपण वाढलो, फुललो तिला विसरता कामा नये. अशा तरुणांनी येथेच थांबून आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करावे. आजचा तरुण नोकरी कामधंदा मिळत नाही असे म्हटल्यावर राजकारण्यांमागे धावाधाव करतात. राजकारणी चतुर असतात. 


त्यांना माहीत असते या तरुणांच्या पोटात आग आहे, व्याकूळ भूक आहे. भाकरीचा शोध आहे. ते या युवा शक्तीचा उपयोग दंगली घडविण्यासाठी, गुन्हेगारीसाठी करतात. म्हणजे त्याच्या देशविघातक कृत्यांना आपण वाहून घ्यायचे का हा युवकांपुढे प्रश्न आहे. 


त्यांनी असला प्रपंच सोडावा आणि आपल्या कल्पकबुद्धीने, आपल्या अमोघ कर्तृत्वाने कोणत्याही क्षेत्रात झळकण्याचा प्रयत्न करावा.रामदासांनी म्हटलेल्या कष्टाविना फळ नाही या वचनाप्रमाणे तरुणांनी वागले पाहिजे.


गुलाबाचे फूल घेताना काट्यांशी सामना करावा लागणारच,हे त्यांनी ध्यानात घ्यावे आणि आपला वेळ अशा रिकामटेकडेपणात घालवू नये. त्यांनी अर्जुन बनून असल्या अधर्मी शक्तींचा निःपात केला पाहिजे.आजचा युवक संस्कृती आणि राष्ट्राचा भक्त आहे. 


त्याला देशाच्या लोकशाहीची धुरा अखंडपणे पेलायची आहे. सध्या तिला कीड लागली आहे. अशा वेळी लोकशाही भक्कम करण्यासाठी त्याला वैचारिक,सामाजिक क्रांती करायची आहे. कुसुमाग्रजांच्या शब्दातच सांगायचे तर एकच तारा समोर आणि पायतळी अंगार गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार."


त्याचबरोबर युवकांनी देशविकासासाठी आपली लोकशाही भक्कम करण्यासाठी देशातील कायदे भारतीय राजकारण अशा बाबा सामान्य जनतेपर्यंत वेगवेगळ्या माध्यमांद्वारे पोचवन लोकशाहीचा चौथा खांब मजबूत करण्याचा प्रयत्न कला पाहिज, दशातील जनता साक्षर असेल तर देश सजीव अन्यथा निर्जीव असे म्हटले जाते.


ते खरे ही आहे.म्हणून तरुणाना आपल्या परिचयातील दोन-तीन तरी निरक्षरांना साक्षर करण्याचा विडा उचलला पाहिजे.माणूस जन्माला येतो तेव्हा एकच जात अस्तित्वात असते, ती म्हणजे मानवजात.आपल्या देशात अनेक जातीधम आहत.यास्तव लग्न करताना प्रामुख्याने आपल्या जातीतीलच जोडीदाराचा विचार होतो.याचा अर्थ, एका अथनि आपण मानव जातच विसरतो. 


हा तसा बौद्धिक याचा अर्थ, एका अर्थाने आपण मानवजातच विसरतो. हा तसा बौद्धिक अप्रामाणिकपणा वाटता. म्हणून तरुणांनी आंतरजातीय विवाहास चालना दिली पाहिजे. यातून एक आदर्श मानवजात निर्माण होईल असे वाटत, आजचे साक्षर युवक अंधश्रद्धेला बळी पडत आहेत. 


श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांतला फरक त्यांना दिसत नाही. तरच देशाची युवा पिढी मजबूत होऊन देश सशक्त बनेल.आजचा तरुणांनी मौजमजेबरोबर समोर एक ध्येय ठेवावे आणि त्यासाठी जिवाचे रान करावे आणि स्वत:चा आणि राष्ट्राचा विकास करण्यासाठी सिद्ध व्हावे. 


आजचा तरुण पिढीपुढे राष्ट्रीय विकासाची अनेक आव्हाने आहेत. त्यांनी आव्हानांना भिता कामा नये. त्याच्याशी दोस्तीचा हात पुढे केला पाहिजे आणि म्हटले पाहिजे."आव्हानांची तमा न मजला मीच एक आव्हानकर्तृत्वाची मशाल घेऊन गाईन मी गुणगान राष्ट्रीय विकास साधू आम्ही हेच आमुच्या कर्तृत्वाचे गाणे महान."मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद