मुलगी वाचवा मुलगी शिकवा मराठी निबंध | Save Girl Child Essay In Marathi

 मुलगी वाचवा मुलगी शिकवा मराठी निबंध | Save Girl Child Essay In Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  मुलगी वाचवा मुलगी शिकवा मराठी निबंध बघणार आहोत. गर्भलिंग चिकित्सा कायद्याचा राखा मान, वाढवा मुलींची शान। त्या दिवशीच्या पेपरमध्ये अगदी पहिल्या पानावर आलेली हेड लाईन वाचून धक्काच बसला.


केंद्र सरकारने लोकांना आवाहन केले आहे की, मुलींची हत्या करू नका, त्यांना केंद्र सरकार दत्तक घेईल. सरकारने त्यालाच त्यांची 'पाळणा योजना' असे म्हटले आहे. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री रेणुका चौधरी यांनी मुलींच्या हत्या रोखण्यासाठी घोषित केलेली 'पाळणा योजना' म्हणजे जणू काही लोकांना मुलींना नाकारण्याचा अधिकारच देण्यासारखे आहे. 


रेणुका चौधरींच्या मते, मुलींच्या विरहाने लोकांमध्ये म्हणजेच तिच्या पालकांच्या मनात तिच्याबद्दल प्रेम उत्पन्न होईल व ते तिला घरी घेऊन जातील. परंतु जे लोक मुलींना मारून टाकण्यास मागे पुढे पाहत नाहीत. त्यांच्या मनात फक्त तिच्या विरहाने तिच्याबद्दल कसे काय प्रेम उत्पन्न होणार कोणास ठाऊक ?


ही 'पाळणा योजना' म्हणजे मुलींना नाकारणे व त्यांना 'सरकारी' असे लेबल लावणे. अशा आईवडिलांनीच टाकलेल्या मुली काय विचार करतील स्वत:बद्दल ? त्या आईवडिलांचा व एकूणच कुटुंबसंस्थेचा तिरस्कार करू लागतील व एक मोठा समाजद्वेष्टा वर्ग तयार होईल. 


काय भविष्य असेल अशा मुलींचे ? लोक त्यांना समाजात मानाचे स्थान देतील ? त्या वसतिगृहात त्यांना कशी वागणूक मिळेल ? इतक्या सगळ्या प्रश्नांनी डोक्यात काहूर माजले.आपल्या दृष्टीने ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे की, आज २१ व्या शतकात एकीकडे मुलींनी निरनिराळ्या क्षेत्रात केलेली प्रगती पाहून थक्क व्हायला होते 


तर एकीकडे अजूनही मुलींचा इतका तिरस्कार होतोय की, लोक छुप्या पद्धतीने गर्भलिंगजल चाचणी करून जन्माला येण्यापूर्वीच त्या मुलीचा जीव घेतला जातो आणि आज सरकारला म्हणावे लागते की, पालन पोषणाची जबाबदारी आम्ही घेऊ. 


भारतीय समाजात मुलींना पूर्वीपासूनच दुय्यम दर्जाची वागणूक देण्याचे प्रमाण फार मोठे आहे. एकतर मुलींना जन्मच घेऊ न देणे किंवा जन्मानंतर तिला सोडून देणे, विकून टाकणे यासारख्या घटना समाजात मोठ्या प्रमाणावर घडताना दिसतात. 


राजस्थानसारख्या राज्यांमध्ये तर मुलगी जन्मल्याबरोबर तिला दुधात बुडवून मारण्याच्या अनिष्ट प्रथाही अस्तित्वात आहेत. मुलगाच हवा, असा हव्यास सर्वत्र वाढतो आहे त्यामुळे गेल्या तीस वर्षांत एक कोटी महिन्याला सुमारे ४० हजार मुलींना जन्माला येण्यापूर्वीच मारून टाकले गेले. 


याचा परिणाम म्हणजे दरहजार मुलांमागे मुलींचे प्रमाण घटत जाऊन ते ९३३ वर आले आहे. पंजाबात ते ८७६ असून दिल्लीत फक्त ८२१ आहे. श्रीमंत, गरीब, उच्चवर्गीय, कनिष्ठवर्गीय असे सर्वच थरातील लोक मुलींना मारण्यात आघाडीवर आहेत. 


आजही मुलगाच वंशाचा दिवा होऊ शकतो, तोच परंपरेची, सत्तेची, संस्कृतीची गादी चालवू शकतो हा विचार बदलायला समाज तयारच नाही. मुलगी झाल्यानंतर तिच्या पालकांच्या मनात सर्वप्रथम हाच विचार येत असणार की, हिचे शिक्षण व त्यानंतर तिचे लग्न करावेच लागणार आणि लग्न म्हटले की, हुंडा हा आलाच. 


आज कायदे करूनही आपल्या समाजातून हुंडा प्रथेचे समूळ उच्चाटन होऊ शकलेले नाही. हुंड्यासारख्या प्रथा हे सुद्धा मुलीला नाकारण्याचे किंवा तिला जन्मच न देण्याच्या निर्णयापाठीमागचे महत्त्वाचे कारण असू शकते. कारण, हुंड्यासाठी कर्ज काढणे, घर विकणे, शेत विकणे अशाप्रकारची दिव्ये मुलीच्या वडिलांना करावी लागतात.


त्यामुळेच की काय मुलगी कितीही शिकली, ती कोणत्याही मोठ्या हुद्यावर काम करू लागली तरीही त्याचा आपल्याला काहीच फायदा नाही 'मुलगी म्हणजे परक्याचे धन' ही लोकांची मानसिकता अद्यापही बदललेली नाही. त्यामुळे मुलींना शिक्षणाच्या बाबतीतही दुय्यम वागणूक दिली जाते. 


खरे तर एक स्त्री स्वत:च आपल्या पोटी मुलगी येऊ नये असे म्हणते, तेव्हा ती एका परीने स्वत:लाच नाकारत असते. तर तिचा स्वत:ला घरातल्या, समाजातल्या दुय्यम स्थानाचा अनुभव येत. हे असेच चालू राहिले तर मुलांना लग्नासाठी मुलीच उपलब्ध होणार नाहीत. 


त्यामुळे अनेक गंभीर सामाजिक प्रश्न निर्माण होतील. बहुपतित्वासारखी सनातन प्रथा पुन्हा डोके वर काढू शकेल व एकूणच सामाजिक गदारोळ निर्माण होईल.


तेव्हा हे सर्व टाळण्यासाठी, मुलीला लोक नाकारणार नाहीत यासाठी तिला समाजात मुलांबरोबरचे स्थान कसे मिळेल, याचा विचार करायला हवा. जेव्हा स्त्रीची अर्थार्जनाची क्षमता पुरुषांबरोबरची होईल तेव्हा ते स्थान तिला नक्की मिळेल. 


त्यासाठी तिला शिक्षणाच्या संधीही मुलांच्या बरोबरीने मिळायला हव्यात. शहरांतून आणि मुख्यत्वे खेड्यांतून मुलींना शिक्षणासाठी जास्तीत-जास्त सवलती देऊन स्त्री-शिक्षणाचे प्रमाण वाढावे यासाठी शासनाने प्रयत्न करायला हवेत. कारण एक शिकलेली स्त्री संपूर्ण कुटुंबाला शहाणे करू शकते. 


पहिल्या एक किंवा दोन मुलींवर पूर्ण कुटुंबाचा आनंद मानावा हा विचार आणि त्याचबरोबर कुटंबनियोजनाचे महत्त्व अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत. मुलीला मारणे, विकणे, सोडून देणे यांपैकी कोणतीही कृती गुन्हाच आहे. 


त्यासाठी गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा केली पाहिजे व कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी कशी होईल यासाठी सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत.याबरोबरच मुलींनीही तिच्या आईवडिलांना असा विश्वास दिला पाहिजे की, मी तुम्हांला कधीही अंतर देणार नाही. 


माझ्यासाठी माझे पहिले कर्तव्य हे तुम्हीच असणार आहात. हे करण्यासाठी मुलींनी लग्नापूर्वीच आपल्या होणाऱ्या नवऱ्याला याची स्पष्ट कल्पना देणे गरजेचे आहे. ज्या मुलींना प्रत्यक्ष आईवडिलांजवळ राहता येत नसेल त्यांनी दरमहा काही स्वत:च्या पगारातील पैसे आईवडिलांकडे पाठवून घराला थोडाफार आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न करावा. 


मुलांनी देखील बायकोच्या आईवडिलांना स्वत:च्या आईवडिलांच्या प्रमाणे मानण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे पालकांना आपल्या मुलींचाही भक्कम आधार पोरालाच म्हातारपणाची काठी मानण्याची मानण्याची मानसिकता बदल लागेल व मलगा पाहिजे या हव्यासापाटा महत्या थाबतील आणि खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानता असणारा समाज निर्माण होइल. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद