मी दूरचित्रवाणी बोलत आहे मराठी निबंध | Mi Durchitravani Bolto Ahe Essay Marathi

मी दूरचित्रवाणी बोलत आहे मराठी निबंध | Mi Durchitravani Bolto Ahe Essay Marathi

 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपणमी दूरचित्रवाणी बोलत आहे मराठी निबंध बघणार आहोत.आज आपण मी दूरचित्रवाणी बोलत आहे  शीर्षक असलेले दोन निबंध बघणार आहोत  आजचं युग विज्ञानयुग! नित्य नवनवीन कल्पना विज्ञानाची कास धरून जन्म घेतात. विज्ञानाने काय काय दिले? असा प्रश्न आज शाळेत विचारला गेला. 


दुपार पासून मन त्या प्रश्नात अडकलेलेच होते. आदिमानव व आजचा मानव हा प्रवास विज्ञानामुळेच शक्य झाला, अशा विचारातच घरी आलो. दूरदर्शन बघण्यासाठी मी दिवाणखान्यात गेलो. बटण चालू करताच आवाज आला


“मी दूरचित्रवाणी बोलत आहे. आज इतर कार्यक्रम दाखविणारी मी माझं अंतरंग तुम्हाला उकलून दाखविणार आहे. विज्ञानाच्या मदतीने मानवाने खूप प्रगती केली. नाही तर आजही तो उत्क्रांत झाला नसता. १९२६ मध्ये जॉन लॉजिक बायर्ड यांनी स्कॉटलँडमध्ये माझा शोध लावला. 


ज्ञान व मनोरंजन घेऊन मी तुमच्याकडे आले. आर्यभट्ट रोहिणी इन्सॅट या उपग्रहांना अंतराळात भ्रमण करण्यास लावून भारताने सारे जग आपल्याजवळ आणले आहे. त्यामुळे परदेशात घडणाऱ्या घटनाही तुम्ही घरबसल्या माझ्याद्वारे पाहू शकता. 


जगातल्या घडामोडी, विविध क्षेत्रांतले ज्ञान, नवे बदल, बातम्या हे सारं घेऊन मी रोज तुमचं स्वागत करते. समाजातील अंधश्रध्दा, रूढी, अज्ञान, हटविण्यासाठी माझ्या कार्यक्रमांतून प्रयत्न करते. 'रामायण', 'महाभारत', सुरभि, डिस्कव्हरी ,सामान्यज्ञान , क्विझ-प्रश्नमंजुषा, आस्था, रसोई या सर्वांद्वारे मनोरंजनाबरोबर ज्ञानप्रदान मला करायचे असते. 


पण हे दुर्दैव की बरेच जण फक्त 'मनोरंजनाचे साधन' एवढीच माझी व्याख्या करतात. छायागीत , चित्रपट बघण्याबरोबरच बातम्या ऐकणे विद्यार्थ्यांना का आवडत नाही? जगात काय चालले आहे हाही शिक्षणाचा भाग नाही का? 


अभ्यासाला पूरक असे ज्ञानवर्धक कार्यक्रम सोडून अश्लील गाणी, बेधुंद नृत्ये जेंव्हा माझ्या पडद्यावर दाखविली जातात तेंव्हा माझ्या हृदयाचे तुकडे तुकडे होतात. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतातच पण मित्रा, चांगली तत्वे जीवन चांगले घडवतात . 


डोळे आहेत , काय बघावे ते तुमच्या हाती आहे. कारण बटण तुमच्या हातात आहे. काय दाखविले जाते व का? या चर्चेपेक्षा आपण काय बघतो व आपण काय बघावे? हाच प्रश्न मित्रांनो स्वतःला विचारा.'


“मित्रहो, तुमच्या जीवनात माझे पदार्पण तुम्हाला ‘इष्ट' वाटायला हवे तरच माझ्या असण्याला अर्थ आहे. 'इडियट बॉक्स' समजण्यापेक्षा मला 'ज्ञानवर्धक संच' समजा ही माझी तुम्हाला विनंती आहे. मी तुमच्यावर नाराज आहे, विशेषतः विद्यार्थ्यांवर कारण शाळा व दूरदर्शन या दोन गोष्टीत तुम्ही वाचन व मैदानी खेळ विसरला आहात .


परिणामी व्यायामाचा अभाव डोळ्यांना त्रास या गोष्टी वाढल्या आहेत . घरात आलेल्या पाहुण्यांचे, कुणी आल्या-गेल्यांचे किंवा घरातले काय म्हणताहेत या कशाचेही तुम्हाला भान नाही. वेळेची योग्य किंमत राहिली नाही. एक कार्यक्रम संपला की दुसरा चालू या चक्रात तुमचा गृहपाठ राहून जातो. 


अभ्यास पूर्ण होत नाही. परिणामी स्पर्धेच्या युगात तुमचा टिकाव लागत नाही . 'आधी ज्ञान , आधी अभ्यास मग मनोरंजन' असे व्हायला हवे. नियोजनपूर्वक चांगले कार्यक्रम व इतर दैनंदिनी यांचा मेळ घाला . मित्रहो , अतिरेक टाळा , कारण अति तिथे माती!'' “निरक्षरविवेक बाळगून काय घ्यायचे ते ठरवा ! 


मी ज्या रूपात तुमच्यासमोर आहे त्यातील चांगले वा वाईट दोन्हीलाही मी जबाबदार नाही. ती माझी निर्मिती नाही. तुम्ही माझा उपयोग कशासाठी करून घेता यावरच ते अवलंबून आहे. एकविसाव्या शतकाच्या या वाटचालीत मी व माझे अनेक बंधू, भगिनी नव नवीनतेने तुमच्यासमोर असतांना योग्य-अयोग्य काय हे ठरवून तुम्ही माध्यमांचा फायदा घ्यायला हवा. 


आज प्रगतीसाठी ही माध्यमे संजीवनी आहेत. वापर मात्र जहरमय करून घेऊ नका. काही सीमारेषा आखून घ्या. वैचारिक प्रदूषण होणार नाही याची दक्षता घ्या . ज्ञान व मनोरंजनाचा खजिना मनसोक्त लुटा पण विचारांना कीड लागणार नाही याची सावधगिरी बाळगा. 



वयपरत्वे काय योग्य आहे? याचा विचार करा. चांगले ते ग्रहण करा.'' “लहान मुले, गृहिणी, युवकवर्ग, वृध्द या सर्वांची मी प्रिय आहे, हे मलाही माहीत आहे. गतिमान जीवनात युवक, कामगार, गरीबवर्ग, विद्यार्थी या साऱ्यांसाठी रोजगार, शिक्षण, चालू घडामोडी, कला, साहित्य, विज्ञान या सर्वांना घेऊन तुमच्या घरात मी स्थानापन्न झाले आहे.


मला व्यथित करू नका. विज्ञानाच्या क्रांतीरूपी मला तुमच्यासाठी जे जे उदात्त, चांगले व मंगलमय आहे ते ते करू दया. त्यासाठीच मी आहे. गाणी, कथानके, मालिका यातून घेण्यासारखे खूप आहे तेच घ्या. शेवटी 'जशी दृष्टी तशी सृष्टी!' "


"बालगाणी, भावगीते , शैक्षणिक व्हिडीओ कॅसेटस् , लहान मुलांच्या कविता यासाठी माझा वापर करून मला बालसंस्काराचे श्रेय दया. मोठ्या आवाजात माझे व स्वतःचे , इतरांचे कान बधिर होण्यासाठी ध्वनिप्रदूषण करू नका. सर्वात जास्त महत्त्वाची मला बोचणारी एक गोष्ट शेवटी सांगू इच्छिते की हल्ली चित्रपटातील बीभत्स नाचगाणी,



शरीरप्रदर्शन, रिमिक्स गाणी यांनी मात्र मी अगदी रक्तबंबाळ झाले आहे. माझा आक्रोश असंख्य वेदनांनी मुका झालेला असला तरी तुम्हाला तो कळावा म्हणूनच आज मी बोलत आहे. शेवटी तुम्ही चांगले तेच घ्या.


“विज्ञानाच्या वाटेवरची ही काही फुले


काटे सोडूनि द्या मित्रांनो, 

हाती घ्या फक्त फुले

आवाज बंद झाला

दूरचित्रवाणी जणू दूर दूर गेली.....

चित्र धुसर झाले

वाणी मुकी झाली

का? का? का?

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



निबंध 2

मी दूरचित्रवाणी बोलत आहे मराठी निबंध | Mi Durchitravani Bolto Ahe Essay Marathi



रात्री १०-४५ ची गोष्ट. त्या दिवशी
सुप्रसिद्ध सिनेतारका हेमा मालिनी हिने दिल्ली दरदर्शनवरून "इंद्रधनुष्य" हा विशेष कार्यक्रम सादर केला. हा कार्यक्रम भारतात दरदर्शनची पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल होता. तो पूर्ण झाल्यावर सर्व दिवे बंद करून मी अंथरुणावर पडतो तोच टी. व्ही.त. प्रकाश दिसला. एक अंधुक छाया पडद्यावर आली आणि आवाज आला

मी दूरचित्रवाणी...ऐका कहाणी
... मुंबईला आल्याला मला चौदा-पंधरा वर्षे झाली असली तरी दिल्लीत आल्याला मला पंचवीस वर्षे पूर्ण झाली, तेव्हा हा उत्सव चालू होता, माहीत आहे ना तुला ? आठवडाभर माझा मोठा उत्सव चालला, खूप भरगच्च कार्यक्रम झाले. पंतप्रधान इंदिराजींनी दिल्लीला नवे चॅनल सुरू केले. 


तिकडेही यापुढे पुष्कळ नवीन नवीन कार्यक्रम सादर होतील. आता कार्यक्रमांची निवड करायला वाव मिळेल.
 बऱ्याच जणांना वाटते की माझा प्रसार आणि विस्तार ही भारताला न परवडणारी महागडी चैन आहे. ज्या देशात अन्नधान्यांची टंचाई आहे, बेकारी आहे, तिथे माझा फैलाव कशाला ?


याला पंतप्रधानांनी दुसरे चॅनल सुरू करतानाच उत्तर दिले होते आणि ते योग्य आहे. खेड्यापाड्यातल्या लोकांपर्यत, ज्ञान, माहिती, नवे तंत्रज्ञान व आवश्यक ते शिक्षण पोहोचवण्यासाठी माझ्याएवढी प्रभावी शक्ती दुसरी नाही. इतके कार्यक्षम साधन दुसरे नाही. 


तुला वाटेल मी स्वतः ची बढाई मिरवतेय, पण तसे नाही. एखादी गोष्ट कानांनी ऐकणे आणि प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहणे यात फरक पडतोच ना ? उत्तम शेती, आरोग्यसंपदा, कामगार विश्व, ज्ञानदीप, मुलखावेगळी माणसं, यासारखे मुंबई दूरदर्शनवरून सादर होणारे कार्यक्रम खेड्यातल्याच काय पण शहरातल्या लोकांनाही मोलाचे ज्ञान पुरवितात ना !


शालेय चित्रवाणीमधून मुलांच्या अभ्यासासाठी उपयुक्त पाठ माइयावरून सादर होतातच. शिवाय मुंबईवरून सादर होणाऱ्या मराठी बातम्या, दिल्लीवरून होणारे राष्ट्रीय कार्यक्रम, त्यात भारतीय बातम्या वा वृत्तसार यातून देशातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातल्या घडामोडी तुम्हांला कळतात, प्रत्यक्ष पाहायला मिळतात. 


आणि वेळोवेळी होणारे क्रिकेट सामन्यांचे थेट प्रक्षेपण, ते तुला आवडते ना? तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा खरा ओढा 'छायागीत', 'गजरा', 'आरोही' 'शाम-एकगझल,' 'फूल खिले हैं। रंजनवार आणि शनिवार, रविवारचे चित्रपट इकडे असतो. हा करमणुकीचा भाग बऱ्याच जणांना फार आवडतो. 



तर काहींना त्याचा तिटकारा. बंद करा म्हणे हे कार्यक्रम. खरं सांग हे कार्यक्रम रद्द केले तर खेड्यापाड्यात राहो, मुंबई-पुण्यात तरी कोणी टी. व्ही. घेतील का? निम्म्या किमतीत काढून टाकतील किंवा दुकानदाराकडे परत करतील आणि ऐपत असेल ते तर चक्क व्हिडीओ घेऊन पाहत बसतील. आता तर झी, स्टार, स्टार प्लस, ए टी एन, अशा अनेक वाहिन्या सुरू झाल्या आहेत. चाळीस चॅनेलचे टी.व्ही. सेट आले आहेत.


मनोरंजन, वृत्तप्रसारण व लोकशिक्षण ही माझी प्रमुख उद्दिष्टे आहेत. आता माझे सप्तरंगी रूपदर्शन तुम्हाला पाहायला मिळतेय. तुमची पिढी खरी भाग्यवान. माझा उपयोग बहुमोल आहे. पण तो नीट समजून करील त्याला. दुरूपयोग केला तर माझ्यामुळे घात होऊ शकतो. 


भस्मासुराचा घात करणारी मोहिनीच होती. अज्ञानासुराचा, अंधारी जीवनाचा नाश करणारा मीच आहे. त्या दृष्टीने माझ्याकडे पाहायला शिका. हं पण लांबूनच हं ! माइया अगदी जवळ येऊन माझ्याकडे हपापलेल्या डोळ्यांनी पाहाल तर तुमचे डोळे कायमचे गमावून बसाल. माझं नावच सूचक आहे-दूरदर्शन ! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद