नवकोटी नारायण पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे मराठी निबंध | Navakoti Narayan Pu. La. Deshpande essay in Marathi

नवकोटी नारायण पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे मराठी निबंध  | Navakoti  Narayan Pu. La. Deshpande essay in Marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे मराठी निबंध बघणार आहोत. पु. लं. देशपांडे हे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व. महाराष्ट्रीयांचं जेवढं प्रेम व कौतक पु.लंच्या वाट्याला आलं, तेवढं कुसुमाग्रजांसारखी काही निवडक माणसं सोडल्यास, कोणाच्या वाट्याला आलं नाही. 


पु.लं. च्या अनेक वैशिष्ट्यातलं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या शाब्दिक कोट्या. त्यांच्या कोट्यांना उपमा द्यायची झालीच तर ती तुकारामादि संतांच्या अभंगांची द्यावी लागेल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जा, त्यातला सामान्यातला सामान्य माणूस शोधा. 


तुकारामादि संतांचे अभंग ज्याच्या जिभेवर नाहीत असा एकही माणूस सापडणार नाही. पु. लंच्या कोट्यांचंही तसंच आहे. सभा-संमेलने असोत, एखाद्या उत्सवातला भाषणासारखा कार्यक्रम असो किंवा चार मंडळी एकत्र बसून चहापान करीत असोत किंवा गप्पागोष्टी करीत असोत, अशा प्रसंगी पुलंची एखादी कोटी कोणी सांगितली नाही असं कधीच होत नाही. 


बरेच वक्ते आपली रटाळ भाषणं, पुलंच्या कोट्या सांगून रंगतदार करीत असतात.पुलंना एकदा विचारलं, 'तुमची सगळ्यात आवडती कोटी कोणती' ? त्यांनी उत्तर दिलं 'मला एकदा युरोपात एकाने विचारले, पौर्वात्य संस्कृती आणि पाश्चिमात्य संस्कृती यात फरक काय ?' मी चटकन उत्तर दिलं, "तुमची द्राक्ष संस्कृती आहे; आमची रुद्राक्ष संस्कृती आहे.


' सहज वापरले जाणारे शब्द किंवा वाक्यप्रचार फोडून पु. लं. गंमत आणतात. नेहमी कंपौडरचं मुंडकंच मला दिसे, त्याचं धड काही दिसायचं नाही. एक दिवस तो कंपौंडर बाहेर आला आणि मला त्याचं धड दिसलं. त्याचं धड इतकं धाकड असेल याची कल्पना नव्हती. 


आपल्या नेहमीच्याच बोलण्यातून असा काही अर्थ हुडकून काढतात, की ऐकणारा थक्क होऊन जातो. आपल्या कसं हे लक्षात आलं नाही, असं वाटून पु. लं.बद्दल कौतुक वाटायला लागतं. एका एकांकिकेत एक पात्र म्हणतं, 'सगळेच काही आजारपणाच्या खोट्या चिठ्या देत नाहीत. 


एक शास्त्रीबुवांचं सोडा.' यावर शास्त्रीबुवा विचारतात, 'माझं का सोडा.?'पु. लं. अत्यंत बुध्दिमान. कोठल्याही गोष्टीतली विसंगती त्यांच्या चटकन लक्षात येते. ती फुलराणीच्या नाटकात, फुलराणी विचारते 'व्हता हा शब्द अशुध्द. मग नव्हता हा शुद्ध का ?' उच्चार  साधर्म्यावर तर ते अफलातून कोटी साधतात, 


विमानातील स्त्रीकर्मचारिणीला हवाई सुंदरी म्हणायचं, तर नर्सला दवाई सुंदरी का म्हणू नये ?' वाढणाऱ्याला जर वाढपी म्हणायचं तर विमानातून हवेत उडणाऱ्याला उडपी का म्हणू नये ? भीमसेन जोशी सतत विमानातून प्रवास करतात, म्हणून त्यांना पु. लं. "हवाई गंधर्व' म्हणत. (सवाई - गंधर्व)


एकदा व्याख्यानाला आलेल्या पुलंचं स्वागत करण्यासाठी म्हणून काही शाळकरी मुलं हातात पुष्पगुच्छ घेऊन दुतर्फा उभी होती. त्यांच्या रांगेतून जाता जाता, पु. लं. नी एका मुलीच्या हातातला गुच्छच पळवला पुढे गेले आणि परत मागे येऊन तिला गुच्छ दिला आणि तिला नमस्कार केला. हा त्यांच्या वागण्यातला खट्याळपणा लिहिण्यातही दिसतो. अखेर तो आला


असं सरळ न लिहिता, तो कानावरचं जानवं खाली करीत आला,' असं लिहितील, तुम्ही आम्ही म्हणतो, एक डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरकडून फी घेत नाही, पण खोडकर पुल, ना आठवता तो डॉक्टर नाही, न्हावी. 


'एक न्हावी दुसऱ्या न्हाव्याच्या दाढीचे पैसे घेत नाही असं महणतात, पु. लं. महाराष्ट्राचे लाडके बनले ते त्यांच्या या खोड्याळ आणि खट्याळ लिखाणामुळे, बोलण्यामुळे, सर्व व्यापून पु. लं. दशांगुळं उरले आहेत. ३० ओळीच काय, २०० पानं लिहिली तरी पु, ले, उरणारच.

टीप:

काही वर्षापूर्वी एखाद्या श्रीमंताचा उल्लेख करायचा असला की तो 'नवकोटनारायण' आहे असं म्हणत. सध्याच्या जगात 'कोटी' या संख्येला फारसं महत्त्व राहिलेलं नाही, त्या संख्यचं अवमूल्यन झालंय, कोटी - अर्थ दोन - १) संख्या, २) शब्द, अर्थ, अक्षर यावर श्लेष साधणे, त्यातून दोन अर्थ काढणे, 


मी नवकोट म्हणण्याऐवजी 'नवकोटी म्हटलंय,'नारायण' या नावाचं नितांतसुंदर शब्दचित्र पु.लं.नी चितारलेलं आहे. त्यामुळे 'नारायण' हा शब्दही चपखल बसला, ३३ कोटी देव, यातल्या कोटी या शब्दाचा अर्थ 'प्रकार' असा आहे.


एका बृहस्पतीवारी एके शिष्ये स्वामियाचे मुखी कुकुटाचे अंडे ओतले, ते स्वामिये भक्षिले, शिष्ये पुशिले, 'स्वामी हा धर्मू कोणता ?' स्वामियें भणितले, 'रे रे मूढा ! हा आश्रमू धर्मू, का की येथे आ करण्याचेची श्रमू। तस्मातहः आ - अमू धर्म,


एकदा पु.ल. गिरगावातील साहित्य संघात बसले होते. त्यांच्या समोरून एकवेळची अभिनेत्री (आताची हृदयनाथ मंगेशकर यांची पत्नी) तिरळ्या दामुअण्णा मालवणकर यांची मुलगी भारती मालवणकर गेली. पुलंनी कुतुहलाने विचारले, 'ही कोण रे ?' कुणीतरी सांगितलं, 'दामूअण्णा मालवणकरांची मुलगी. 'पु. ल. चटकन उद्गारले, 'दामूअण्णांचा डोळा चुकवून जन्माला आलीय.'


या थोर विनोदमहात्म्याला त्याच्या विनोदबुद्धीने एखाद्या पतिव्रतेप्रमाणे अखेरपर्यंत साथ दिली. अखेरच्या आजारात एका सकाळी त्याच्या पत्नीने विचारले, 'झोप आली की नाही काल?'


'छे गं, रात्रभर जागा आहे.' 'काहीतरीच.' पत्नी म्हणाली, 'चांगला घोरत तर होतास. त्यांची पत्नी त्यांना 'अरे भाई असे म्हणे. हां! हा!' पु. ल. म्हणाले, 'म्हणजे मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद