प्रयत्नांती परमेश्वर मराठी निबंध | Prayatnanti Parmeshwar Essay in Marathi

  प्रयत्नांती परमेश्वर मराठी निबंध | Prayatnanti Parmeshwar Essay in Marathi 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण प्रयत्नांती परमेश्वर मराठी निबंध बघणार आहोत. 'प्रयत्नांती परमेश्वर' या उक्तीचा अर्थ प्रथम पाया. प्रयत्न केला असता परमेश्वर प्राप्ती होते म्हणजेच यशाची प्राप्ती होते. समर्थ रामदासांनीही सांगितले आहे, 'यत्न तो देव जाणावा'. या देवाची उपासना केल्यावर म्हणजेच प्रयत्न केल्यावर कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही. 'असाध्य ते


साध्य करिता सायास' असे वचन आहे. म्हणजे प्रयत्न केल्याने अशक्य कोटीतील वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतात. कवी म्हणतो - 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे.' समाजाच्या आजवरच्या प्रगतीचा इतिहास पाहिल्यास आपल्याला याचे प्रत्यंतर येते. 


शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कार्यात अनेक अडचणी आल्या, परंतु त्यांनी अथक प्रयत्न चालू ठेवले आणि प्रयत्नांती स्वराज्यरूपी परमेश्वर प्राप्त करून घेतला, हिंदवी स्वराज्य स्थापन केले. आपल्या सततच्या प्रयत्नांनीच 'रामशास्त्री' म्हणून प्रसिद्ध झाला. 


आधुनिक काळात लो. टिळक, महात्मा गांधी यांनीही सतत प्रयत्नांनी निद्रिस्त समाजाला जाग आणली, अनेक अडथळे आले तरी त्यांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत. आपल्याला हे काम जमणारच नाही, आपल्याला अपयशच येईल असा विचार भित्रे लोक करतात आणि कोणतेही काम हाती घेतच नाहीत. 


काही महाभाग आरंभशूर असतात. ते कामाला सुरुवात करतात, पण अर्धवटच टाकून देतात. म्हणून एक बोधवाक्य आहे, 'हाती घ्याल ते तडीस न्या.' तेव्हा कितीही अडचणी आल्या, सुरुवातीला अपयश आले तरी खचून न जाता आपले प्रयत्न चालूच ठेवले पाहिजेत.


आपल्या सततच्या प्रयत्नांनीच 'रामशास्त्री' म्हणून प्रसिद्ध झाला. आधुनिक काळात लो. टिळक, महात्मा गांधी यांनीही सतत प्रयत्नांनी निद्रिस्त समाजाला जाग आणली, अनेक अडथळे आले तरी त्यांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत.


आपल्याला हे काम जमणारच नाही, आपल्याला अपयशच येईल असा विचार भित्रे लोक करतात आणि कोणतेही काम हाती घेतच नाहीत. काही महाभाग आरंभशूर असतात. ते कामाला सुरुवात करतात, पण अर्धवटच टाकून देतात. 


म्हणून एक बोधवाक्य आहे, 'हाती घ्याल ते तडीस न्या.' तेव्हा कितीही अडचणी आल्या, सुरुवातीला अपयश आले तरी खचून न जाता आपले प्रयत्न चालूच ठेवले पाहिजेत.'धावत्याला शक्ति येई आणि रस्ता सापडे, उलट 'थांबला तो संपला. 


तेव्हा या सर्व विवेचनाचे सार काय की प्रयत्न मग ते कोणत्याही कारणासाठी केलेले असोत, कधीही सोडता कामा नयेत. प्रयत्नांची पराकाष्ठा केली असता, कठीण कातळ फोडून स्वच्छ पाणी पुरवणाऱ्या विहिरींची निर्मिती करता येते, 


खोल खाणीतील खनिजे मिळवता येतात, डोंगर खोदून कोकण रेल्वेसाठी मोठे मोठे बोगदे बांधता येतात. तेव्हा प्रयत्नांची पराकाष्ठा परमेश्वर प्राप्तीकडे नेते हेच महान सत्य आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद