शेतकऱ्यांच्या दुरवस्थेची कारणे मराठी निबंध | SHETAKARYANCHYA DURAVASTHECHI KARNE ESSAY MARATHI

शेतकऱ्यांच्या दुरवस्थेची कारणे मराठी निबंध | SHETAKARYANCHYA DURAVASTHECHI KARNE ESSAY MARATHI

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण शेतकऱ्यांच्या दुरवस्थेची कारणे मराठी निबंध बघणार आहोत. 

मुद्दे : 

भारत कृषिप्रधान 

शेती हा प्रमुख व्यवसाय 

शेतकऱ्यांची स्थिती कठीण 

 अल्पभूधारक शेतकरी

सोयीसवलती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत

लहरी निसर्गाचे फटके

कष्टाचे चीज होत नाही

मालाला उठाव नसला की शेतकऱ्याचे नुकसान

 शेतकऱ्यांच्या सवयी 

व्यसनाधीनता

 कर्जबाजारीपणा.


आमचा भारत हा कृषिप्रधान देश आहे, असे आपण मोठ्या अभिमानाने सांगतो. आपल्या देशात शेती हाच प्रमुख व्यवसाय. असे असूनही आज शेतकरी आत्महत्या' करीत आहेत. असे का? स्वातंत्र्योत्तर काळात भारतात शेतीसाठी खूप सोयीसवलती दिल्या गेल्या. त्यामुळे भारतात हरित क्रांती झाली. 


त्यापूर्वी भारताला परदेशातून धान्य आयात करावे लागायचे. आता भारत धान्याच्या बाबतीत स्वावलंबी झाला. कालांतराने भारतात 'श्वेत क्रांती' झाली. दूधदुभते विपुल झाले. मग आज शेतकऱ्यांची दुरवस्था का निर्माण झाली आहे ?

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांत आज आपल्याला दोन प्रकार आढळतात. काही शेतकरी बडे शेतकरी आहेत. त्यांच्याकडे भरपूर जमीन आहे. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या साऱ्या सोयीसवलती ते मोठ्या हिकमतीने लाटतात. आणि स्वतःचा फायदा करून घेतात. 


त्यामुळे धनिक शेतकरी अधिक धनिक होतात. पण जे छोटे शेतकरी आहेत म्हणजे ज्यांच्याकडे थोडी जमीन आहे त्यांची स्थिती अवघड होते. पुढे कुटुंब वाढते. जमिनीचे तुकडे होतात; उत्पन्न कमी येऊ लागते. तीच जमीन पुन्हा पुन्हा कसल्यामुळे नापीक होते, पण ती पडीक ठेवता येत नाही. त्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नाही.


निसर्गाचा लहरीपणाही शेतकऱ्याला घातक ठरतो. काही वेळेला पावसाचा अतिशय वर्षाव होतो आणि सगळे पीक कुन जाते; काही वेळा सगळे पीक पुरात वाहून जाते, झाडाला लागलेली फळे कुजून जातात, खराब होतात. काही वेळेला अवर्षण होते. 


लावलेले बी फुकट जाते व काहीच उगवत नाही. काही वेळेला बी-बियाणांत भेसळ असते. केलेली मेहनत फकट जाते.. शेतकऱ्यांच्या दुरवस्थेला आणखी अनेक कारणे आहेत. आपल्याकडील शेतीचा फार मोठा भाग लहान शेतकऱ्यांनी व्यापला आहे. हे लहान शेतकरी आर्थिक मर्यादेमुळे शेतीत नवनवीन प्रयोग करू शकत नाहीत. 


ते पारंपरिक पद्धतीनेच शेती करतात. साहजिकच, शेतमालाचे स्वरूप व उत्पादनाचे एकूण प्रमाण हे जागतिक स्पर्धेला तोंड देण्यास पुरेसे नसते. पारंपरिक उत्पादन पद्धतीमुळे उत्पादनखर्च वाढतो. त्याचाही विपरीत परिणाम होतो.


आपला शेतकरी अशिक्षित, अज्ञानी आहे. त्याला बाजारपेठेचे ज्ञान नाही. आपल्या पिकाला जगात कोठेकोठे व किती मागणी आहे, याची त्याला कल्पनाही नसते. कोणकोणते पीक किती प्रमाणात घ्यायचे, याचा त्याला निर्णय घेता येत नाही. तसे मार्गदर्शन त्याला मिळत नाही. 


शेतमालाच्या खरेदीविक्रीची न्याय्य अशी व्यवस्थाच निर्माण झालेली नाही. त्यामुळे शेतकरी दलालांना बळी पडतात. शेतमालाला योग्य भाव कधीच मिळत नाही. शेतीमालावर प्रक्रिया करून ग्राहकांना आवडेल असे विविध पदार्थ तयार करण्याचा पायंडाही आपल्याकडे पडलेला नाही. 


पदार्थ साठत रेवणे वा दीर्घकाळ टिकण्यासाठी प्रक्रिया करणे यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञानही विकसित होऊन लोकप्रिय झालेले नाही. अनेकदा अतिरिक्त उत्पादन फेकून दयावे लागते किंवा ते कुजून तरी जाते. एकंदरीत, शेतकरी दरिद्री आहे; म्हणून संशोधन, प्रयोगशीलता नाही, बाजारपेठेचे ज्ञान नाही. 


परिणामतः शेतमालाला फायदेशीर किंमत मिळवता येत नाही. फायदेशीर किंमत मिळत नाही, म्हणून तो दरिद्री राहतो. अशी परिणामांची साखळी सुरू होते. या त-हेने एका दुष्टचक्रात शेतकरी अडकला आहे. या दुष्टचक्राचा भेद करणारा एखादा अर्जुन जन्माला यायला हवा । मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद