आई संपावर गेली तर निबंध | Aai Sampavar Geli Tar Essay in Marathi

 आई संपावर गेली तर निबंध | Aai Sampavar Geli Tar Essay in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आई संपावर गेली तर मराठी निबंध बघणार आहोत. सगळे जण आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी संपावर जातात. आई संपावर गेली, तर आमचे सारे घर कोलमडून पडेल. कारण घरातील सर्व कामे आईच करीत असते. 


आई सकाळी लवकर उठते. सकाळचा चहा, आमचे दोघांचे दूध आणि नंतरचा स्वयंपाक हे सारे आईच करते. धान्य आणणे, भाजी, फळे आणणे ही कामेसुद्धा आईच करते. आमच्या डब्यात काय दयायचे, हे देखील आईच ठरवते. असे असताना, आई संपावर गेली तर...


आमच्या शाळेची सारी तयारी आईच करते. गणवेश शिवून आणायचे, रोज कपड्यांना इस्त्री करायची, खेळायला जाण्यासाठी वेगळा पोशाख घालायचा, हे सर्व तिच्याच ध्यानात असते. आमचा अभ्यास करून घेण्याची पूर्ण जबाबदारी तिनेच स्वीकारली आहे. आमची परीक्षा असली की, तिचीच धावपळ उडते. मग आई संपावर जाऊन कसे चालेल?


बाबांच्या कपड्यांची देखभाल, बाबांना आवडणारी न्याहारी, बाबा गावाला जाणार असतील तर त्यांची बॅग भरणे, पाहुणे येणार असले की, त्यांच्या स्वागताची तयारी, सणवार आणि कुटुंबातल्या सर्व जबाबदाऱ्या हे आईच पार पाडत असते. शिवाय कुणी आजारी पडले तर त्याचे औषधपाणी करणे, त्याची काळजी घेणे ही सर्व कामे आईच करते.


शिवाय घरासंबंधीची बाहेरची सर्व कामे पत्रव्यवहार पाहणे, बँकेत जाणे वगैरे सर्व जबाबदाऱ्या आईच पार पाडते. आई संपावर गेली तर... हे सर्व कोण करील? आम्हांला शाळेत जाणे अवघड होईल. घरात नको तेवढा पसारा पडेल. बाबांना स्वयंपाक करावा लागेल. 


घरातील महत्त्वाची कामे वेळेवर होणार नाहीत. आम्हां बहीणभावांची भांडणे मग कोण सोडवणार? शिवाय आमच्याशी प्रेमाचे शब्द कोण बोलणार ? आम्हांला शाबासकी कोण देणार? आमचे वाढदिवस कोण साजरे करणार? आणि आमचा अभ्यास कोण घेणार? 


या साऱ्या कल्पनांनीच मी गोंधळून गेलो आणि परमेश्वराला प्रार्थना केली, " आईला संपावर कधीच जाऊ देऊ नकोस." मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद



[शब्दार्थ : कोलमडून पडणे- collapse. उथपाथल थxj, मी ५७j. ढह जाना, लड़खड़ा जाना। पसारा-mess, disorder. ५सारो. फैलाव, तितर-बितर होना।]