आमची शाळा मराठी निबंध | AAMCHI SHALA MARATHI NIBANDH

  आमची शाळा मराठी निबंध | AAMCHI SHALA MARATHI NIBANDH 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आमची शाळा मराठी निबंध बघणार आहोत. माझी शाळा शंभर वर्षांपूर्वीची 'आदर्श प्रशाला' आहे. आमच्या शाळेची जुनी इमारत ही दोनमजली दगडी आहे. आता नवीन इमारत ही पाचमजली 'टी' आकारात बांधलेली आहे. 


आमचे वर्ग हे मोठे, हवेशीर आणि भरपूर प्रकाश असलेले आहेत. आमच्या शाळेत आज तीन हजारांहून अधिक विद्यार्थि-विदयार्थिनी शिकत आहेत. पूर्व-प्राथमिक वर्गापासून दहावी इयत्तेपर्यंतचे विदयार्थी येथे शिक्षण घेतात. जुन्या इमारतीत कचेरी, सभागृह आणि व्यायामशाळा आहे. 


नव्या इमारतीत वरच्या मजल्यावर चित्रकला वर्ग, हस्तकला वर्ग, संगीत वर्ग, नृत्य वर्ग व तीन शास्त्रांसाठी तीन प्रयोगशाळा आहेत. शिवाय एका मोठ्या दिवाणखान्यात चाळीस संगणकांची सोय केलेली आहे.


माझ्या आदर्श शाळेला अनेक थोर विदयार्थ्यांची परंपरा आहे. अनेक क्षेत्रांतील थोर व्यक्तींनी येथे आपले शिक्षण घेतले आहे. शालान्त परीक्षेत अनेक विदयार्थ्यांनी बोर्डात पहिला येण्याचा मान मिळवला आहे. आजही ही परंपरा मोडलेली नाही. 


शालान्त परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा आणि इतर अनेक स्पर्धा परीक्षांत आमच्या शाळेतील विद्यार्थी उज्ज्वल यश मिळवत असतात. आज इंग्रजी व मराठी या दोन्ही माध्यमांतून शाळेत शिकवले जाते. विदयार्थी अभ्यासेतर कार्यक्रमांतही सतत भाग घेतात व यशस्वी होतात. 


एकांकिका स्पर्धा, नाट्यवाचन, समूहगायन, काव्यवाचन, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा यांत वेगवेगळे विदयार्थी सहभागी होतात. या स्पर्धांशिवाय क्रीडांगणावरचे खेळ, पोहणे, क्रिकेट व इनडोअर गेम्स यांमध्येही शाळा अग्रभागी असते. '


दोरीवरचा मल्लखांब' ही तर आमच्या शाळेची खासियत आहे. 'प्रत्येक विदयार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे' हे शाळेचे ब्रीद आहे. त्यामुळे या आदर्श शाळेचा विदयार्थी होणे, प्रत्येक विदयार्थ्याचे स्वप्न असते. मी या शाळेचा विदयार्थी आहे, याचा मला अभिमान वाटतो. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


[शब्दार्थ : प्रशाला- high school. माध्यमिड .. हाई स्कूल। शिष्यवृत्ती परीक्षा - scholarship exams. शिष्यवृत्ति भेग माटेनी परीक्षा. छात्रवृत्ति परीक्षा। ब्रीद - motto. उद्देश्य, हेतु. उदेश्य।]