फुलांचे आत्मवृत्त आत्मकथा मराठी निबंध | Autobiography of Flower in Marathi

 फुलांचे आत्मवृत्त मराठी निबंध  | Autobiography of Flower in Marathi 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  फुलांचे आत्मवृत्त  मराठी निबंध बघणार आहोत. शाळेतून घरी येताना रस्त्यावरील कचराकुंडीकडे लक्ष गेले. कचऱ्याच्या ढिगावर गुलाबाचे एक सुंदर फूल होते. ते फूल माझ्याशी बोलू लागले


"अरे मुला, मला येथे पाहून तुला नवल वाटले ना! पण पाहा ना ! माझ्या नशिबात काय आले ते! अरे सकाळपर्यंत तर मी त्या 'आशीर्वाद' बंगल्याच्या बागेत होतो आणि आता येथे कचराकुंडीत.


"अरे, या बंगल्याच्या मालकांना झाडा-पाना-फुलांची मोठी आवड ! त्यांनी बंगल्यापुढे एक सुंदर बगिचा तयार करून घेतला.  त्या कळीच्या रूपात मी त्या बागेत रुबाबात डोलत असे. तेव्हा सकाळचा वारा माझ्याशी हळुवारपणे खेळत असे.


"अखेर आज मी पूर्ण उमलले होते. कळीचे फूल झाले होते. एक टपोरा पिवळा गुलाब ! मला माझ्या रूपाचा अभिमान वाटत होता. आपल्याला पाहून मालक-मालकीण नक्की खूश होतील, असे वाटत होते. पण आज बंगल्यात कोणीच नव्हते. माळीबाबांचेही माझ्याकडे दुर्लक्ष झाले. मनात विचार आला की मी देवाच्या मस्तकावर चढणार की येथेच सुकून जाणार?


“बगिच्यात माळीबाबा नाहीत हे पाहून एक खोडकर मुलगा बंगल्याच्या आवारात शिरला. त्याचे माझ्याकडे लक्ष गेले. त्याने चटकन मला खुडले. केवढ्या वेदना झाल्या तेव्हा मला ! इतक्यात पोरांची एक टोळी आरडाओरड करीत येथे आली. 


त्या सर्वांचे लक्ष आकाशाकडे होते; कारण एक पतंग काटला गेला होता. त्या मुलाचे लक्ष आता त्या पतंगाकडे गेले होते. तेव्हा त्याने झटकन मला या कचराकुंडीत टाकले आणि तो त्या पतंगामागे धावला. देवळात जाण्याची स्वप्ने पाहणारा मी येथे आता या कचराकुंडीत आहे." मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद



[शब्दार्थ : कचराकुंडी-garbage bin. ध्यरानी टोपली. कचरे का डिब्बा। खुडले- plucked. यूंटयु. तोड़ लिया।]