निसर्ग माझा सोबती मराठी निबंध । Essay On Nisarg Maza Sobati in Marathi

 निसर्ग माझा सोबती मराठी निबंध । Essay On Nisarg Maza Sobati in Marathi 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण निसर्ग माझा सोबती मराठी निबंध बघणार आहोत. लहानपणापासून माझे सवंगडी म्हणजे अंगणातील झाडे, वेली, पाने, फुले. अंगणातली चिऊ दाखवून आई मला घास भरवत असे. काऊशी गप्पा मारत मारत मी मोठा झालो. 


कितीही रडत असलो, तरी आभाळातील चांदोबा पाहिला की, माझे रडू थांबत असे. मी थोडा मोठा झाल्यावर माझे आजोबा मला सूर्य दाखवत आणि त्याला नमस्कार करायला लावत. बाबांच्या फिरतीच्या नोकरीमुळे आमचे घर गावाबाहेरच असे. खेळायला सोबत मुले नसत. 


त्यामुळे माझा वेळ घराबाहेरच्या बागेत जात असे. आजोबांनी मला झाडे कशी लावायची, कशी वाढवायची यांचे शिक्षण दिले. मग मी पण त्यात रंगून जात असे. लावलेले रोप मोठे झाले की, मला आनंद होत असे. मला आठवतंय आमच्या बागेतील माळ्याकडून मी गुलाबाचे कलम करायला शिकलो. 


मी कलम केलेल्या गुलाबाला जेव्हा प्रथम कळी आली, तेव्हा मी एवढा आनंदित झालो होतो की, मला एक कविताच सुचली! या बागेत मला नवीन सोबती भेटले. कोण माहीत आहे? फुलांवर भिरभिरणारी फुलपाखरे. या फुलपाखरांचे रंग तरी किती विविध असतात ! 


प्रत्येक फुलपाखरू वेगळी नक्षी (डिझाईन) घेऊन येते. मला खात्री आहे की, कितीही हुशार चित्रकार असला, तरी तो कागदावर एवढे रंग, एवढी कलाकुसर उतरवू शकणार नाही! आईने मला या फुलपाखरांवरची एक सुंदर कविता शिकवली होती.


हा माझा दोस्त, मला केव्हाही एकटे पडू देत नाही. उलट अगदी एकट्याने हिंडायला जायला मला आवडते. पक्षिमित्र सलीम अली यांची पुस्तके वाचून मी पक्षी अभयारण्यात जातो. मला तेथे त-हेत हेचे पक्षी पाहायला मिळतात. झाडांवरून सुर्रकन पळणाऱ्या खारीतही केवढी विविधता असते!


नदीचा खळखळाट, सागराची भरती-ओहोटी, धबधब्याचे कोसळणे पाहून मी खूश होतो. कोसळणाऱ्या पावसात भटकायला जसे मला आवडते, तसेच धुक्यात लपेटलेला डोंगर चढतानाही मी खूश होतो. असे आहेत हे माझे सोबती! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


[शब्दार्थ : चिऊ-a hen-sparrow. यदी, झूठी. गौरैया। कलम-araft. असम (छोउनी). कलम (पौधे का एक टुकड़ा दूसरे पर लगाना)। भिरभिरणारी-whirling. धूमतi, भासपास ३२त. मंडराने वाली। गर्द-thick, dense. [ीय. घनी। सुर्रकन-briskly, quickly. तरत ४. तेजी से।]