फॅशन्स मराठी निबंध | Fashion Essay Marathi

 फॅशन्स मराठी निबंध | Fashion Essay Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण फॅशन्स मराठी निबंध बघणार आहोत. आज आपण  फॅशन्स शीर्षक असलेले दोन निबंध बघणार आहोत  कोणत्याही आवडीचा अतिरेक झाला की, तिची वेडात गणना होते. फॅशनचेही आज तेच आहे. 'फॅशन' या इंग्रजी शब्दाचा साधा सरळ अर्थ 'पद्धत' किंवा 'चालरीत' असा आहे. 


जशी एखादयाची बोलण्याची फॅशन, एखादया देशातील शिष्टाचारांची फॅशन तशी वेषभूषेची फॅशन ! परंतु 'फॅशन' या शब्दात कुठेतरी नखरा मिसळला आहे. तोच आपल्याला फॅशन कशी असावी आणि कशी नसावी, हा विचार करायला लावतो.


'फॅशन' हा शब्द जरी इंग्रजीतून आला असला, तरी नटण्याची वृत्ती माणसाबरोबर साऱ्या जगभर जन्माला आली आहे. अनेक वेळा उत्खननात सापडणाऱ्या वस्तूंत, अलंकारांत आपल्याला फॅशनचे मूळ आढळते. जुन्या काळातही फॅशनचे खूप प्रकार होते. 


डोळ्यांत काजळ घातले जाई, ओठ रंगवण्यासाठी विडा खात असत, तर त्वचेसाठी हळदी-चंदनाचा उपयोग केला जाई. अत्तरेसुद्धा अस्सल असत. याचा अर्थ असा की, त्या काळातही मनापासून फॅशन केली जाई.


नीटनेटकी राहणी, आकर्षक कपडे या गोष्टी माणसाच्या दर्शनी व्यक्तिमत्त्वाला उठावच आणत असतात. 'A thing of beauty is joy for ever' हे एक सार्थ विधान आहे. आरोग्यसंपन्न शरीर, स्वच्छतेच्या सवयी, नियमित आहारविहार एवढे असेल, तर फॅशनवाचूनही माणूस आकर्षक व सुंदर दिसतो. 


फॅशन पसरवायला विशेषकरून सिनेमातील नटनट्या कारणीभूत ठरतात. त्यांच्या वेषभूषेचे व केशभूषेचे अतोनात अंधानुकरण केले जाते. मग फॅशन ही सौंदर्यात भर घालण्यासाठी आहे की विचित्र दिसण्यासाठी आहे, हेच कळत नाही.


फॅशन कालचक्राबरोबर सारखी फिरत असते, म्हणूनच ती सारखी बदलत असते. परंतु हे वर्तुळ फिरून फिरणार किती? तिथेही पुनरावृत्ती दिसतेच. एखादया फॅशनचा इतका कंटाळा येतो की लगेच त्याच्या विरुद्ध टोकाची फॅशन सुरू होते. तंग, तोकडे कपडे घालून कंटाळा आला की एकदम ढगळ कपड्यांची फॅशन येते.


स्त्री आणि पुरुष, तरुण आणि तरुणी यांच्या फॅशनमध्ये निश्चितच वेगळेपणा हवा. अलीकडे मुलींनी मुलांचे कपडे घालणे अन् मुलांनी केस वाढवून त्याची पोनी बांधणे अशी फॅशन सर्वत्र आढळते. यांतून फॅशनपेक्षा विकृतीचेच दर्शन घडते. वारंवार ब्युटी पार्लरमध्ये जाणे किंवा सतत नवनवीन क्रीम-पावडरी वापरणे हा एक हव्यासच होऊन बसला आहे.


शरीर नटवणे ही गोष्ट मुळीच वाईट नाही, पण त्याबरोबर मनही सजवता आले पाहिजे. तनही सुंदर मनही सुंदर अशी व्यक्ती कोणाला आवडणार नाही? म्हणूनच शरीर सजवता सजवता 'चातुर्ये शृंगारे अंतर...' हे रामदासांचे वचनही लक्षात ठेवावे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका 



निबंध 2

फॅशन्स मराठी निबंध | Fashion Essay Marathi


'साहेब, क्रू कट केस कापायचे का? सध्याची नवी फॅशन आहे ती !' 'नको, नको, आपला नेहमीचाच 'जनरल कट' ठेव', मी उत्तर दिले. पायातल्या बुटांपासून डोक्यावरच्या केसांपर्यंत या फॅशनचा आपादमस्तक संचार झालेला पाहून ब्रह्मदेवदेखील तोंडात बोट घालील !


गाठ मारलेल्या शेंडी घेऱ्यापासून कपाळावर केसांचा कोंबडा आणण्याइतक्या पुरुषांच्या केसांच्या तहा आतापर्यंत काय कमी झाल्या ? धोतर बाराबंदी जाऊन पँट कोट झाले. कोट गेले बुशकोट आले. बुशकोट गेले, बुशर्शट....आणि कोणाच्या तरी बुशर्शटवर चहा सांडल्यामुळे त्याची पुढली अर्धी बटणे उडाली....पुढे बुशशर्टच्या जागी 'टी' शर्ट आले. 'सफारीचा जमाना' मध्यंतरी येऊन गेला. 


धोतराच्या जागी लेंगा पँटचे बस्तान ! पूर्वी एकदा पँट एवढ्या आवळत्या चिंचोळ्या झाल्या की उशीवर अभ्रा चढवावा त्याप्रमाणे पँट पायातून वर चढवावी लागे. नंतर बेल बॉटम, एलिफंटबॉटम पँट आल्या. पुढे बूट, नंतर सँडल्स, प्रकार किती वणवित ?


आता ताडपत्रीसारख्या जाड कापडाची जिनची पँट आली आहे. तिचा रंग जितका विटेल तितकी ती फॅशनेबल. मुलगे-मुली दोघेही वापरतात. मुलींच्या फॅशनच्या तव्हा काय वर्णाव्यात? परकर-पोलका ही संस्था हळूहळू नामशेष होऊ लागली आहे. 


मुलगी वीस वर्षांची झाली तरी स्कर्ट ब्लाऊझ वापरते व हौशी, आवडीनुसार मॅक्सी, मिनी, मिडी, जिन तयार आहेतच. पोलक्याचे हात कमी होत खांद्यापर्यंत गेले. आता, उतरत कोपरापर्यंत खाली उतरले आहेत. वेशभूषेप्रमाणे केशभूषेतही केसा केसागणिक नवीन वळणे आहेत. शेपटे गेले शेपुटे आली ! चुकलो...टेल आली ! 


याशिवाय बॉबकट, साधना कट यासारख्या कटकटी आहेतच. पुरुष केस वाढिवताहेत, तर स्त्रिया बॉयकट करताहेत. वस्तुतः सौंदर्य खुलविणे, कुरूपता लपविणे, विविध ढंगानी आकर्षकता निर्माण करणे हे फॅशनचे मुख्य उद्देश आहेत. अर्थात उपयुक्तता व सोयही हवीच म्हणून तर सुती कापडाच्या जागी नायलॉन, रेयॉन, टेरिन, पॉलिएस्टर कपडे आलेत ! 


असे कपडे धुवायला त्रास कमी, वाळतातही लवकर, शिवाय परत परत इस्त्री करावी लागत नाही. पण कधी कधी 'फॅशन' म्हणजे वेड बनते. अंधानुकरण होते. गणपती उत्सवात डिस्को नृत्य करणे ही काय फॅशन म्हणावयाची ? मुलाने आईवडिलांना मम्मी, डॅडी म्हणायचे, वडिलांनी पोराला 'सनी' 'मनी' म्हणायचे...


भारताबद्दल सतत तुच्छतेने बोलायचे, परदेशी वस्तूंचा सतत वापर करायचा...ही पण एक फॅशनच ! एवढे कशाला ? एरवी ऊठसूट लोकांना भारतीय संस्कृतीचे डोस पाजणारे जनतेचे मराठी  मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद