माझा आवडता नेता मराठी निबंध | Maza Avadta Neta Nibandh In Marathi

 माझा आवडता नेता मराठी निबंध | Maza Avadta Neta Nibandh In Marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा आवडता नेता मराठी निबंध बघणार आहोत. इ. स. १८६९ मध्ये गुजरातमधील पोरबंदर गावी मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म झाला. विदयार्थिदशेत गांधीजी फारसे चमकदार ठरले नव्हते. 


त्या वयात इतर मुलांप्रमाणे त्यांच्याही हातून काही चुका झाल्या. पण त्या त्यांनी प्रामाणिकपणे आपल्या वडिलांजवळ कबूल केल्या. आईसमोर घेतलेली प्रतिज्ञा त्यांनी आयुष्यभर पाळली. दक्षिण आफ्रिकेत वकिली करायला गेलेल्या गांधीजींना अन्याय सहन झाला नाही व त्यांनी अहिंसक लढा सुरू केला. 


तेथेच टॉलस्टॉय यांचे विचार स्वीकारून गांधीजींनी 'टॉलस्टॉय फार्म'चा प्रयोग केला. भरपूर श्रम आणि साधेपणाची राहणी यांचा आदर्श त्यांनी निर्माण केला. गांधीजींनी सर्व धर्मांच्या लोकांना एकत्र आणून जणू एक कुटुंबच तयार केले होते.


भारतात आल्यावर गांधीजींनी प्रथमतः संपूर्ण भारताचा प्रवास केला. त्यानंतर त्यांनी अहिंसा व सत्याग्रह या मार्गांनी ब्रिटिश सरकारशी लढा दिला. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा केली नाही. दुःखी निर्वासितांचे अश्रू पुसायला ते नौखालीला गेले. म्हणूनच जनतेने त्यांना 'महात्मा' व आपले 'बापू' ठरवले.


झालेल्या चुका कबूल करणे, आपल्या मतांवर ठाम राहणे, पीडितांचा विचार व सेवा करणे आणि कोणत्याही सत्तापदाची अपेक्षा न करणे या गुणांमुळेच मला महात्मा गांधी हे नेते म्हणून खूप आवडतात. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


[शब्दार्थ : प्रतिज्ञा - pledge. प्रतिज्ञा. प्रतिज्ञा, दृढ़ संकल्प। अहिंसा-nonviolence. असि . किसी प्राणी को न मारना, अहिंसा। सत्याग्रह - fighting for the truth or against injustice in a peaceful way. SIS H4 24491 relleus 44-2414HL HÈ शांतिपूर्ण मा. किसी सत्य या न्यायपूर्ण पक्ष की स्थापना के लिए शांतिपूर्ण हठ। पद-post. ५६. ओहदा, पद। निर्वासित-refugees. ॥२५॥था. निष्कासित, शरणार्थी।]