मी अंतरिक्षयानचालक झालो मराठी निबंध | ME ANTRIKSHYANCHALK ZALO ESSAY MARATHI

 मी अंतरिक्षयानचालक झालो मराठी निबंध | ANTRIKSHYANCHALK ZALO ESSAY MARATHI

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी अंतरिक्षयानचालक झालो मराठी निबंध बघणार आहोत. मी दहावीत गेलो म्हणून मला सुट्टीतच बाबांनी सायकल घेऊन दिली. रस्त्यावरून सायकलने जाताना केवढा अभिमान वाटत होता ! कॉलेजात गेल्यावर स्कूटर किंवा बाईक, नोकरी लागल्यावर चार चाकी मी अशीच झोकात चालवीन ! 


तेव्हा मनात आले, मग विमान व अंतरिक्षयान चालवायला मिळाले तर  ? ते २०१० साल असावे. सर्व जगाने - म्हणजे जगातील सर्व राष्ट्रांनी मिळून एक सांघिक अंतरिक्ष मोहीम हाती घेतली होती. पृथ्वीवर फार गर्दी झाल्याने आता अंतरिक्षात वसाहत करायची होती. 


भारतातून या मोहिमेसाठी माझी निवड झाली होती आणि पृथ्वीवरून अंतरिक्षात अंतरिक्षयान नेण्याची कामगिरी माझ्यावर सोपवण्यात आली होती! ठरलेली वेळ झाली. यान सुटले. पाहता पाहता ते पृथ्वीपासून अलग झाले. अंतरिक्षात गेल्यावर सर्व शरीर हलके हलके वाटू लागले! ताठ उभेही राहता येईना! 


यानाच्या खिडकीतून बाहेर पाहिल्यावर आपली पृथ्वीसुद्धा अगदी खेळण्यातल्या गोलासारखी चिमुकली दिसत होती मात्र एक गोष्ट छान होती की, त्या अंतरिक्षात भूक आणि तहान अजिबात लागत नव्हती. मी अंतरिक्षयान चालवत असताना मध्येच अचानक बिघाड झाला. 


हृदयात क्षणभर चलबिचल झाली. मी माझ्या तीन सहकाऱ्यांना जागृत केले. यापूर्वी अंतरिक्षात जाऊन आलेल्या मंडळींची चरित्रे आठवली. त्यांनी लिहून ठेवलेले अनुभव मी वाचले होते. आमचे प्रयत्न चालू होते आणि यानातील बिघाड सापडला ! 


पुन्हा ते आपल्या मार्गावर आले ! ठरलेली कामे पुन्हा पार पडू लागली. आमची कामे पूर्ण करून तीन महिन्यांनी यान परतले. आता आपण पृथ्वीवर पोहोचणार, घरी जाणार या विचाराने मन आनंदले. घरी पोहोचलो, तेव्हा माझ्या घरासमोर प्रचंड गर्दी उसळली होती. 


माझ्या मित्रांनी तर मला खांदयावरच उचलून घेतले! आता खांदयावरून पडतो की काय, असे मला वाटू लागले ! "अरे थांबा, थांबा!" असे मी घाबरून त्यांना जोरजोरात सांगत होतो. तेवढ्यात... तेवढ्यात मला जाग आली ! मी पलंगावरून खाली पडत होतो ! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


[शब्दार्थ : सांघिक-common, collective. सामूडिड. सामूहिक। चिमुकलीtiny. ना४७. नन्ही, छोटी। बिघाड-a mistake, a hurdle in working. आममा विन. खराबी आना। चलबिचल- uneasiness, hesitation. अयेना. असमंजस, घबराहट।]