मी शेतकरी बोलतोय मराठी निबंध | Mi Shetkari Boltoy Marathi Nibandh

मी शेतकरी बोलतोय मराठी निबंध | Mi Shetkari Boltoy Marathi Nibandh


आम्ही शनिवार-रविवार खंडाळा-लोणावळ्याला वर्षासहलीला गेलो होतो. पावसात भटकत असताना मळवली-कामशेतजवळ काही शेतकरी पुरुष व बायका शतात काम करात होत्या. मी आज त्यांना बोलते करायचे ठरवले. थोडे पुढे होऊन मी म्हणालो," अहो भाऊ, आमच्याशी बोलता का जरा?" त्यांनी सर्वांनी वर पाहिले. 


मग त्यांच्यातील वयस्कर गृहस्थ पुढे आले. ते म्हणाले, "माझे नाव भाऊराव पाटील. ही 'कराडी' वाडीतील बरीच जमीन आमच्या वाडवडिलांची आहे. आम्ही येथे राबतो आहोत ना ती सगळी आमचीच घरातील माणसे आहेत. आम्हांला या कामाची लहानपणापासून सवय असते. 


लहानपणी दोन-चार वर्षे शाळेत गेलो. त्यामुळे थोडे लिहिता-वाचता येते. “आम्ही कितीही राबलो, तरी त्या लहरी पावसावर पीक अवलंबून असते. आता हेच बघा ना, पावसाची सुरुवात चांगली झाली म्हणून पेरणी केली, रोपे वर आली आणि हा लबाड पाऊस कुठे गेला कुणास ठाऊक?


"आम्ही रेडिओ ऐकतो, दूरदर्शन पाहतो. आमच्या गावात कृषी खात्याची मंडळी येतात. ते पण नवीन नवीन माहिती आम्हांला देतात. आता पेरले ते बीपण त्यांनीच दिले आहे. आम्ही आता जी अवजारे वापरतो, तीपण आम्हांला खात्याच्या मंडळींकडून मिळालीत. 


त्यामुळे आमची कामे सोपी झालीत. पीक तयार झाले की ते किडींपासून कसे वाचवायचे याची माहिती व त्याच्यासाठीची औषधे आम्हांला खात्याकडूनच मिळतात. त्यामुळे हल्ली पीकपाणी चांगले येते.


“हो हो! आमची मुलेबाळे शिकतात ना ! माझा मुलगा बारावीला आहे. माझा पुतण्या कृषी महाविद्यालयात आहे. पण मुलांनीही या मातीत कष्ट करायला हवेत. काही शेतकऱ्यांच्या डोक्यावर ते 'सेझ'चे संकटही ओढवले आहे. त्यामुळे चिंता वाटते." बोलणे आवरते घेत भाऊराव परत आपल्या कामाकडे वळले.

[शब्दार्थ : लहरी-whimsical. त२०, धूनी. मनमौजी। अवजारे-tools, implements. मोरो. औजार।]