मला परमेश्वर भेटला तर मराठी निबंध | Mla parmeshvar bhetla tar Marathi nibandh

मला परमेश्वर भेटला तर मराठी निबंध |  Mla parmeshvar bhetla tar Marathi nibandh

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मला परमेश्वर भेटला तर मराठी निबंध बघणार आहोत. माणसे परमेश्वराकडे स्वतःच्या फायदयाचे मागतात. केवळ मागून ती थांबत नाहीत, तर त्यासाठी माणसे देवाला काहीतरी देतात. 


तू मला परीक्षेत उत्तम यश दिलेस, तर मी तुला पाच नारळांचे तोरण बांधीन. म्हणजे नवस करणे हे परमेश्वराला कामाला लावण्यासाठी दाखवलेले प्रलोभनच नाही का? मला वाटते, परमेश्वर माणसाच्या या स्वार्थी वृत्तीमुळे दु:खी झाला असावा आणि म्हणूनच तो हल्ली या जगात अवतार घेत नसावा.


असा हा परमेश्वर पूर्वी आपल्या भक्तांसाठी अवतार घेत असे. जनाबाईचे जाते फिरवायला हाच देव हातभार लावत असे. सावतामाळ्याबरोबर हा त्याच्या मळ्यात खपत असे. एकनाथांच्या घरी तर याने श्रीखंड्या बनून पाणी भरले. अशा कथाही आम्ही ऐकतो. 


परमेश्वराने माणसांना जन्म दिला. हे जग निर्माण केले. तरी अजूनही आपण परमेश्वराकडून अपेक्षा करतो. परमेश्वर तुमच्याकडून कोणत्या अपेक्षा करतो, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तुमची भांडणे परमेश्वराला आवडत असतील का? सर्व माणसे ही परमेश्वराची लेकरे आहेत. 


परमेश्वराने माणसांना निर्माण करताना भेदभाव केला नाही. पण हे भेदभाव माणसाने केले आहेत. एवढेच करून माणसे थांबली नाहीत, तर खून, चोय असे गुन्हे माणसे करतात. केवळ सत्तेच्या लोभाने माणसे युद्ध करतात. आपल्या या कर्तृत्वाबद्दल परमेश्वराला काय वाटत असेल, याचा माणूस कधी विचार करीत नाही.


हे आळशी, स्वार्थी माणसा ! स्वार्थ सोडून दे. ज्ञानेश्वरांनी परमेश्वराकडे 'खळांची व्यंकटी सांडो' हेच मागितले होते. मला परमेश्वर भेटला तर मी त्याला सांगेन की, 'हे देवा, या जगातील स्वार्थी, दुष्ट, पापी वृत्ती नष्ट होऊ दे.' तसे झाल्यास या जगात खरोखर नंदनवन निर्माण होईल. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद[शब्दार्थ : प्रलोभन- temptation, bait, lure. प्रलोभन. लालच देना। खळ - evildoers. हुष्ट. बुरे काम करने वाला। व्यंकटी- evil, wickedness. जुराई, हुष्टता. बुराई। सांडो- be destroyed. ना. थामो. नष्ट हो। नंदनवन - paradise. नंहनवन, स्वर्ग. स्वर्ग। जाते- stone, grinder. घंटी. जाँता।]