फुले बोलू लागली तर मराठी निबंध | PHULE BOLU LAGLI TAR NIBANDH IN MARATHI

 फुले बोलू लागली तर मराठी निबंध | PHULE BOLU LAGLI TAR NIBANDH IN MARATHI 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण फुले बोलू लागली तर मराठी निबंध बघणार आहोत. खरंच फुलांना बोलता आले असते तर... ती माणसांशी काय बोलतील? माणसांचे आभार मानतील की त्यांना दोष देतील? माणसे फुलांना जोपासतात. 


त्यांचे रोगांपासून रक्षण करतात. गुलाबांसारख्या फुलांची कलमे तयार करतात. विविध रंगांचे गुलाब तयार करतात. गुलाबांची आणि विविध फुलांची प्रदर्शने भरवतात. आंधळ्या मुलांना काटे टोचू नयेत म्हणून पु. ल. देशपांडे यांनी बिनकाट्याचा गुलाब शोधून काढला होता. मग ही फुले बोलू लागली तर ती माणसांचे आभारच मानतील.


याच फुलांना कधी कधी माणसांचा निर्दयपणाही अनुभवायला मिळतो. काही माणसे दुसऱ्यांच्या बागेतील फुले चोरतात आणि आपल्या देवांची पूजा करतात. फुले बोलायला लागली तर ती माणसांना सरळ सरळ विचारतील की, 'का हो ! चोरून आणलेल्या फुलांनी देवांची पूजा होऊ शकते का?'


फुलांचे आयुष्य एका दिवसाचे असते. आपल्या जीवनाचा उपयोग दुसऱ्यांसाठी व्हावा, हीच त्यांची इच्छा असते. देवपूजेसाठी फुले वापरली जावोत, कुणाच्या सत्कारासाठी वा एखादया प्रेतावरील हारात, फुलांना त्याचे सुखदु:ख नसते. फुले सांगतात, आपल्या वाटेला आलेले आयुष्य आपण कुणासाठी तरी वेचायचे. 


काही वेळेला झाडावरच सुकून जावे लागते. पण त्यापूर्वी आम्ही फुलपाखरे, पक्षी यांना आनंद देतो. त्यांच्यामुळे आमच्या पुंकेसरांचा प्रसार होतो. फुले पुढे सांगतील की, आमच्यातील काहीजणांचा औषधांसाठी उपयोग होतो. तर काहीजणांपासून 'सुगंध' निर्माण केला जातो. 


तुम्ही तुमच्या भावना आमच्यामार्फत व्यक्त करता. शब्दापलीकडचे जे काही आहे ते आम्ही व्यक्त करतो. म्हणून तर कॉलेजात 'रोझ डे' रंगतो आणि कुणाच्या वाढदिवसाला आमचा गुच्छ तुमचे मनोगत व्यक्त करतो. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

[शब्दार्थ : निर्दयपणा- cruelty. निय५j. बेरहमी, क्रूरता। प्रेत-a dead body. Cu, . लाश, मुर्दा। पुंकेसर - pollen grain. पुस२. पराग-कण।]