वृद्धाश्रमाला भेट, मराठी निबंध | Vrudhashramla Bhet Essay in Marathi

 वृद्धाश्रमाला भेट, मराठी निबंध | Vrudhashramla Bhet Essay in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण वृद्धाश्रमाला भेट मराठी निबंध बघणार आहोत. आज आम्ही मैत्रिणींनी वृद्धाश्रमास भेट देण्याचे ठरवले. त्यानुसार सकाळी अकरा वाजताच आम्ही नदीकाठावरील 'निवारा' या वृद्धाश्रमात गेलो. 


वृद्धाश्रमाचे आवार मोठे आहे. भरपूर झाडे आहेत. त्या आवारात चार-पाच बैठ्या इमारती आहेत. त्या आवारात काही आजोबा-आजी फिरत होते. काहीजण बाकांवर बसून गप्पा मारत होते. प्रथम आम्ही संस्थाचालकांना भेटून त्यांची परवानगी घेतली. त्यांनी 'निवारा' पाहण्याची परवानगी दिली.


वृद्धाश्रमावर देखरेख करणारे नाना आजोबा आमच्याबरोबर निघाले. त्यांनी आम्हांला वृद्धाश्रमाची माहिती सांगितली. वृद्धाश्रमात चहापाणी, न्याहारी, भोजन, औषधपाणी अशा सर्व गोष्टी समानरीत्या दिल्या जातात. 


शहरातील काही डॉक्टर दिवसातील काही तास आपली विनामूल्य सेवा येथे देतात. एखादया वृद्धाला अधिक बरे नसेल, तर शहरातील एका रुग्णालयात त्याची व्यवस्था केली जाते. वृद्धाश्रमातील दिवस सकाळी सातला सुरू होतो. चहापानानंतर अर्धा तास व्यायामासाठी दिला जातो. 


आठला न्याहारी अगदी हसतखेळत चालते. त्यानंतर तीन तास आजोबा-आजी आपल्या मनाप्रमाणे सर्व कामे करतात. ठीक बारा वाजता भोजन, दुपारी थोडीशी झोप, दूरदर्शन, वाचन, गप्पाटप्पा यांत वेळ जातो. चार वाजता दुपारचा चहा व फराळ. ठीक पाच ते सहा काहीतरी सामुदायिक कार्यक्रम होतात. सातला रात्रीचे साधे भोजन होते.


संध्याकाळपर्यंत वृद्धाश्रमातील वेळ आजोबा-आजींच्या संगतीत कसा गेला ते कळलेच नाही. फार थोडे वृद्ध आपल्या नातलगांच्या आठवणींनी दुःखी होते. पण बहुसंख्य आजोबा वा आजी त्या वातावरणात रमले होते. आपल्याला हवे ते, आवडेल ते काम करीत होते आणि आपले म्हातारपण एकमेकांच्या संगतीत आनंदात घालवीत होते. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद



[शब्दार्थ : वृद्धाश्रम- home for the aged. वृद्धाश्रम. वृद्धाश्रम। बैठ्या - single storeyed. भोयताणयावाणु भान.. केवल तल मंजिल वाली (इमारत)। न्याहारी- breakfast. नातो. नाश्ता। विनामूल्य-free of charge. भइत. मुफ्त। सामुदायिक- common. सामु1ि5. सामूहिक।]