खेळकरपणा मराठी निबंध | Khelikarpna Essay Marathi

खेळकरपणा मराठी निबंध | Khelikarpna Essay Marathi 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण खेळकरपणा मराठी निबंध बघणार आहोत. आज आपण खेळकरपणा असलेले दोन निबंध बघणार आहोत  महिला टेनिसच्या स्पर्धांचा शेवटचा दिवस. मोनिका सेलेस आणि स्टेफीग्राफ यांच्यात अगदी अटीतटीचा सामना खेळला जात होता. प्रत्येकजण प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होती. 


अखेर स्टेफीने विजय मिळविला, अर्थात सेलेसचा पराभव झाला. स्पर्धा म्हटले की कुणीतरी जिंकणार व कुणीतरी हरणारच. स्टेफीच्या भोवती प्रेक्षकांचा गराडा पडला. तिच्यावर अभिनंदनाचा अक्षरश: वर्षाव झाला. मोनिका निराश होऊन हे सर्व बघत होती पण क्षणभरच. तिने धावत जाऊन स्टेफीला आलिंगन दिलं व तिचं अभिनंदन केलं.


त्याचक्षणी तिच्या मनाचा मोठेपणा दिसून आला. याला म्हणतात 'खिलाडूवृत्ती!' जीवन ही एक अशी गोष्ट आहे की तिचे अनेकांनी अनेकप्रकारे वर्णन केलेले आहे. कुणाला जीवन म्हणजे क्रीडा वाटते. कविवर्य केशवसुत गर्वाने म्हणतात,


'आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? आम्ही असू लाडके.

देवाचे दिधले, असे जग तये आम्हांस खेळावया!'


तर कुणाला जीवन म्हणजे समरांगण वाटते, तर कुणाला जीवनप्रवासात काटेच आहेत असे वाटते. असे का होते? तर जीवनाकडे पाहण्याची आपली दृष्टी' जशी असेल तसेच ते आपणाला भासत असते. जीवनातील द:खे. संकटे, अडचणी यांचाच आपण सतत विचार करीत राहिलो तर जीव नकोसा होईल. 


कारण जीवनात सुख जवापाडे आणि दु:ख पर्वताएवढे असते.' अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन आपल्या राजकीय व वैयक्तिक जीवनातील तणाव कमी करण्यासाठी विनोदाचा वापर करीत, त्यांच्या जीवनात विनोदाचे स्थान महत्त्वाचे होते. 


अनेक अडचणींतून वा मतभेदाच्या प्रसंगासून बाहेर पडण्यास त्यांचा विनोदी युक्तिवाद त्यांना साहाय्य करी. त्यामुळे वाद घालावयास आलेले लोक त्यांचा किस्सा ऐकून निरुत्तर होऊन जात. माणसाचं आयुष्य क्षणभंगुर आहे आणि आपल्या आयुष्यात सुख-दुःख यांचा पाठशिवणीचा खेळ चालूच असतो. 


आपल्यापुढे असंख्य समस्या 'आ वासून उभ्या असतात. अफाट लोकसंख्या, दारिद्रय, बेकारी, गुन्हेगारी, गंतागंतीचं राजकारण, निरक्षरता, अंधश्रध्दा या सगळ्या समस्यांतून जाताना मन निराश होतं, वैफल्य येतं पण त्याबद्दल कुरकुरत बसण्यापेक्षा खेळकरपणाने त्या द:खांचा स्वीकार केला पाहिजे, उगीचच जीवाचा संताप करून घेऊ नये; तर विनोदबुध्दीने, खेळकरपणाने ती दु:खं पचवता आली पाहिजेत.


आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारच्या स्वभावाची माणसं असतात. उदा. खाष्ट, रागीट, विक्षिप्त, कंजूष, स्वार्थी, निंदाखोर, अशी माणसं स्वत: तर दु:खी असतातच; पण दुसऱ्यांचेही सुख हिरावून घेतात. ते विघ्नसंतोषी असतात. कावळ्यासारखी त्यांची नजर घाणीवरच असते; 


पण त्याचबरोबर झाडावर उमललेल्या ताज्या फुलांप्रमाणे आनंदी, प्रसन्न, उत्साही व शांत, प्रेमळ स्वभावाचीही माणसं असतात, अशी माणसं दुसऱ्यांना आनंद देतात. दुसऱ्यांच्या दु:खावर हळुवार फुकर घालून ती कमी करतात. अशा माणसांना बालकवीप्रमाणे 'आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहिकडे' आनंद भरलेला दिसतो.


मनातल्या मनात कुढत बसणाऱ्या माणसांचं आयुष्य क्षणाक्षणाला कमी होत जातं, तर - हसतखेळत वावरणाऱ्या माणसांचं आयुष्य वाढत जातं. खेळकर स्वभावाची व्यक्ती जीवनातील कडवट क्षणही गोड मानून घेते. 


अशी व्यक्ती आपल्या दु:खाचा गाजावाजा न करता दु:ख मनात लपवून आनंदी राहते; आणि दुसऱ्यांच्या दु:खात सहभागी होऊन त्यांची दु:खं हलकी करण्याचा प्रयत्न करते. म्हणूनच संतश्रेष्ठ तुकाराम संदेश देतात, मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.   पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


मन करा रे प्रसन्न। सर्व सिध्दीचे कारण। 

प्रसन्न आपआपणास। गति अथवा अधोगती।


निबंध  2 

खेळकरपणा मराठी निबंध | Khelikarpna Essay Marathi 


क्रांतिसिंह नाना पाटलांच्या जीवनातला एक प्रसंग. त्यांचा एक पाय डॉक्टरांना नाइलाजाने कापून टाकावा लागला. तेव्हा भेटायला येणाऱ्या चाहत्यांना ते पाहून वाईट वाटले. परंतु नाना पाटील म्हणाले, 'आता उरलेले आयुष्य एका पायावर ह्यो गडी काढायला तयार आहे. स्वत:च्या द:खातही खेळकरपणा दाखविणारी अशी माणसे विरळाच.


आयुष्य हे सुखदु:खाच्या धाग्यांनी विणलेलं वस्त्र आहे. त्यामुळे दु:ख, कटकटी आयुष्यात असणारच; परंतु या दु:खाने खचून न जाता धीरोदात्तपणे त्याला तोंड दिले पाहिजे. त्यातही खिलाडूपणा दाखविला तर त्या दु:खाची, संकटाची तीव्रता कमी होते.


आपण प्रवासाला निघतो. गाडीत खचाखच गर्दी असते. उभे राह्यलाही * धड जागा नसते, पण प्रवास करणे तर अटळ असते. अशा वेळी एकमेकांना पुढेमागे सरकायला सांगून त्यातल्यात्यात सर्वांची सोय एकमेकांनी पाहिली तर ताण कमी होतो. 


उभ्या उभ्याही एकमेकांशी गप्पागोष्टी करीत राहिले की वेळही जातो आणि मनात दाटलेली चीड, राग आपोआप कमी होतो. प्रवासात अशी खिलाडू माणसे मला अनेकदा भेटली आहेत. मृच्छकटिक' नाटकातला प्रसंग. वसंतसेनेने चारुदत्ताकडे दागिने ठेवायला दिलेले असतात. 


चोर ते दागिने चोरायला येतो. घरात राजमार्गाने प्रवेश शक्य नसतोच. तेव्हा तो भिंतीला मोठे भगदाड पाडून आत प्रवेश करतो व दागिने चोरून नेतो. दुसऱ्या दिवशी सकाळी चारुदत्त ते भगदाड पाहतो. दागिने गेल्याचे दु:ख बाजूला ठेवून तो म्हणतो, 'वा! किती सुंदर भगदाड पाडले आहे चोराने!' 


वास्तविक दुसऱ्याची ठेव आपल्या घरातून चोरीला गेलेली. पण चारुदत्ताने खिलाडूपणे तो प्रसंग निभावून नेला. सकाळची वेळ. घरात आईची कामाची धांदल उडालेली असते. बाबा आरामशीरपणे पेपर वाचीत बसलेले असतात. त्यांना चहा हवा असतो. 


स्वयंपाकाची कसरत करता करता आई त्यांना चहा उकळवून देते. गडबडीत ती साखर टाकायला विसरते पण बाबा चिडत नाही. ते हसून म्हणतात, 'अग, मला डायबेटीस व्हायला वेळ आहे अजन. साखर घाल थोडी चहात. त्यांच्या या खेळकरपणाने आईलाही हसू आलं.


शाळेत मुले खेळत असतात. सामने खेळतात. कधी जिंकतात. कधी हरतात. जय-पराजयाच्या या चक्रातून ते पुढे सरकत असतात. याच पायरीवर त्यांना खिलाडूपणा शिकवायला हवा. पराभवसुद्धा हसतहसत झेलावा हे त्यांच्या मनावर बिंबवले पाहिजे.


दैनंदिन जीवनात आपल्याला राग येईल, संताप होईल असे प्रसंग नित्य उद्भवतात. अशा वेळी डोके शांत ठेवून सगळ्या गोष्टी खेळकरपणे स्वीकारल्या पाहिजेत. बस चुकणे, सिनेमाची तिकिटे न मिळणे, जेवायला उशिरा मिळणे, भाजीवालीने खराब भाजी देऊन फसविणे, असे एक ना दोन प्रसंग असतात. रागून, संतापून उपयोग नाही.


जीवनात सुख मिळवणे हे सापेक्ष आहे. मानावे त्यात सुख, आनंद आहे. अर्धा भरलेला पेला माणसाला दिलासा देतो. म्हणूनच विनोद, खेळकरपणा, जीवनाला खुमारी आणतात. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद